![]() |
धोंडोपंत नानासाहेब पेशवे |
एक साधा प्रश्न
लेखाचा विषय बनू
शकतो याचे प्रत्यंतर
मला नुकतेच आले.
अलीकडे मी बाळाजी
बाजीराव उर्फ नानासाहेब
पेशव्याच्या चरित्रलेखनाचे कार्य शिरावर घेतल्याचे
माझ्या अनेक मित्रांना
- परिचितांना माहिती आहेच. त्याचप्रमाणे
माझे डॉक्टर मित्र
श्री. अनिल हब्बू
यांना देखील याची
कल्पना आहे. तर
असेच एकदा त्यांनी
सहजपणे मला प्रश्न
विचारला कि, ' ब्रम्हावर्तच्या नानासाहेब
पेशव्याचे पुढे काय
झाले ? ' अन माझी
बोलती बंद झाली.
कारण, बंडवाल्या नानाच्या
अखेरीची विश्वसनीय माहिती फारशी
मिळत नाही एवढेच
मला माहित होते.
अर्थात, माझ्या जवळील ग्रंथखजिना
पाहता हि माहिती
त्यात मला मिळेल
असा भलताच आत्मविश्वास
माझ्या मनात संचारला
व ' लवकरच तुम्हांला
हवी ती माहिती
देतो ' असे म्हणून
मी बंडवाल्या नानाच्या
शेवटच्या दिवसांची माहिती गोळा
करण्याचा प्रयत्न करू लागलो.
या शोधमोहिमेत मला
जी काही माहिती
मिळाली ती मर्यादित
न राहावी आणि
सर्वसामान्य वाचकांनाही तिचा लाभ
व्हावा यासाठी लेखरूपाने ती
माहिती मी येथे
देत आहे.
स. १८१८ मध्ये
पेशवाईचा राजीनामा देऊन दुसरा
बाजीराव पेशवा इंग्रज अधिकारी
माल्कमच्या स्वाधीन झाला. त्याला
वार्षिक आठ लाख
रुपये तनखा देऊन
कानपूर जवळ बिठूर
उर्फ ब्रम्हावर्त येथे
ठेवण्यात आले. त्या
ठिकाणी सुमारे
३३ वर्षे वास्तव्य
करून स. १८५१
मध्ये रावबाजींनी आपला
देह ठेवला. बाजीरावास
लग्नाच्या एकूण ११
स्त्रिया असून संततीही
होती परंतु पुत्र
मात्र नव्हता. तेव्हा
त्याने आपल्या सगोत्र भट
वंशीय कुटुंबातील ३
मुले दत्तक घेतली.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे
:- धोंडोपंत नानासाहेब, गंगाधर बाळासाहेब
व सदाशिव दादासाहेब.
पैकी धोंडोपंत व
गंगाधर हे दोघे
सख्खे भाऊ असून
सदाशिव हा त्यांचा
चुलतबंधू होय. धोंडोपंतचे
मूळ गाव माथेरान
जवळील वेणगाव हे
असून बाजीराव जेव्हा
दक्षिणेतून उत्तरेत रवाना झाला
त्यावेळी धोंडोपंताचे वडील माधवराव
भट हे सहपरिवार
त्याच्यासोबत गेले होते.
असो, धोंडोपंताचा जन्म
स. १८२४ चा
असून ता. ७-६-१८२७
रोजी बाजीरावाने त्यास
दत्तक घेतले. त्याच्या भावांचे दत्तविधान
कधी झाले त्याची
माहिती मला मिळाली
नाही. तीन मुले
दत्तक घेऊन बाजीरावाने
वंशक्षयाचा प्रश्न निकाली काढला.
असो, बाजीरावास गंगाबाई
नामक पत्नीपासून ता.
१६-१-१८४७
रोजी कन्यारत्न लाभले.
तिचे नाव कुसुमबाई
उर्फ सरस्वतीबाई उर्फ
बयाबाई. हिचा विवाह
ग्वाल्हेर संस्थानातील आपट्यांशी स.
१८५५ मध्ये झाला.
ज्यावेळी स. १८५७
चा वणवा पेटला
तेव्हा ती धोंडोपंत
उर्फ नानासाहेब पेशव्यासोबत
होती. पेशवे घराण्याची
अखेरची हालहवाल याच बाईकडून
नंतर सर्वांस समजली.
असो, उपलब्ध इतिहास
व बयाबाई आपटे
यांची माहिती यातून
आपण नानासाहेब पेशव्याचे
नेमके काय झाले
ते पाहू :-
ता. २९
मार्च १८५७ रोजी
बराकपूर येथे मंगल
पांडेने १८५७ च्या
बंडाचा वन्ही चेतवला. बराकपूरच्या
क्रांतीचे लोण आसपासच्या
भागात पसरत कानपुरास
पोहोचले. तेथील ब्रिटिशांनी स्फोटक
परिस्थिती लक्षात घेऊन नानासाहेब
पेशव्यास आपल्या संरक्षणास्तव पाचारण
केले. यावेळी नानाजवळ
सुमारे ५०० पायदळ,
घोडदळ व ३ तोफा होत्या.
एवढेच लष्कर बाळगण्याची
त्यास इंग्रजांनी परवानगी
दिली होती. ता.
२२ मे रोजी
नानासाहेब बिठूरहून कानपूरास पोहोचला.
ता. २२ मे
ते ४ जूनपर्यंतचा
काळ जसा तसा
गेला व ४ जूनच्या रात्री ब्रिटीशांच्या
हाताखालील हिंदी पलटणींनी बंड
पुकारले. त्यात नानासाहेबाचे शिपाई
देखील सहभागी झाले.
बंडवाल्यांनी नानासाहेबास आपले नेतृत्व
करण्याची धमकीवजा गळ घातल्याने
नानाने त्यांच्या नेतेपदाचा स्वीकार
केला. यास तात्या
टोपेची साक्ष आहे. कानपूरच्या
इंग्रजांनी ता. २६
जूनपर्यंत नानाच्या नेतृत्वाखालील बंडवाल्यांचा
सामना करून अखेर
शरणागती पत्करली. शरण आलेल्या
इंग्रजांना जलमार्गाने अलाहाबादला पाठवण्याचे
ठरवले पण शरणार्थी
नावेत बसल्यावर बंडखोरांनी
स्वयंस्फूर्तीने त्यांच्यावर गोळीबार केला
तेव्हा नानासाहेबाने गोळीबार थांबवण्याचा आदेश
दिला खरा पण
तोवर कित्येक इंग्रज
मारले गेले होते.
( ता. २७ जून
१८५७ ) नानासाहेबाने उर्वरित इंग्रजांची व
त्यांच्या बायका - मुलांची कत्तल
न करण्याची आज्ञा
दिली. परंतु त्यास
न जुमानता ता.
१५ जुलै रोजी
बंडवाल्यांनी आश्रित इंग्रज बायका
- मुलांची कानपूर येथील बिबिघरात
कत्तल केली. असो,
इकडे दि. १
जुलै रोजी बिठूरला
नानासाहेबाचा राज्याभिषेक सोहळा पार
पडला. दरम्यान बंडाचा बिमोड करण्यासाठी
इंग्रज सरकारने देशभरातील विविध ठिकाणांहून बंड झालेल्या ठिकाणी लष्करी पलटणी पाठवल्या.
त्यांपैकी सेनापती हॅवलॉक हा कानपुरावर चालून येऊ लागला. हॅवलॉकला रोखण्यासाठी नानासाहेबाने
सेनापती ज्वालाप्रसाद यांस साडेतीन हजार सैन्य व १२ तोफांसह रवाना केले. परंतु ज्वालाप्रसादला
न जुमानता हॅवलॉक पुढे येऊ लागला तेव्हा खुद्द नानासाहेब ५००० सैन्यासह शत्रूवर चालून
गेला. ता. १६ जुलै रोजी कानपूर नजीक झालेल्या संग्रामात हॅवलॉकने नानासाहेब पेशव्याचा
संपूर्ण पराभव केला. तेव्हा नानासाहेब कानपूर सोडून बिठूरला रवाना झाला. तेथून ता.
१ ऑगस्ट १८५७ रोजी तो सहपरिवार अयोध्येस पोहोचला. तेथील बेगमेने नानाचे स्वागत केले
खरे पण अयोध्येत फार काळ मुक्काम न करता त्याने नेपाळची सरहद्द गाठली. अयोध्येहून नानाचा
मुक्काम हलल्यानंतर त्याच्या विषयी फक्त बातम्याच लोकांना ऐकायला मिळाल्या. त्यानंतर
त्यास कोणी हिंदुस्थानात पाहिले नाही. नानाच्या अनुपस्थितीत त्याचा पुतण्या पांडुरंग
रावसाहेब हा काही काळ बंडखोरांचा नेता बनला परंतु लवकरच इंग्रजांनी बंडाचा नायनाट केल्याने
त्यालाही नेपाळात धाव घ्यावी लागली. पुढे तिकडे काही वर्षे घालवल्यावर तो हिंदुस्थानात
परत येत असताना सियालकोट येथे इंग्रजांनी त्यास कैद करून त्याच्यावर बंडात सहभागी असल्याबद्दल
खटला भरून ता. २० ऑगस्ट १८६२ रोजी ब्रम्हावर्त येथे फाशी दिली. असो, प्रस्तुत लेखाचा प्रतिपाद्य विषय आहे की, नानासाहेब पेशव्याचे १८५७
नंतर काय झाले ? आपण त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू.
दुसऱ्या बाजीरावाची मुलगी
-- बयाबाई हि बंडाच्या
वेळी १० वर्षांची
होती. स. १९१३
मध्ये ती जेव्हा
महाराष्ट्रात आली तेव्हा
इतिहासकार राजवाड्यांनी बयाबाईची समक्ष भेट
घेऊन स. १८५७
च्या बंडानंतर नानासाहेब
पेशव्याच्या हकीकतीची विचारणा केली.
त्यावेळी बयाबाईने सांगितलेली हकीकत
अशी :-
" नानासाहेब
नेपाळकडे गेले खरे,
पण तेथे त्यांस
कोणी आश्रय देईना
! नेपाळच्या हद्दीत शिरावे तर
तेथील राजाने त्यांना
हुसकावून लावावे ! बरे परत
इंग्रजी हद्दीत यावे तर
इंग्रजांचे सुदर्शनचक्र रात्रंदिवस नानांच्या
पाहाऱ्यावरच असे ! नानांच्या जीवास
अहोरात्र चैन म्हणून
नसे. सुमारे चौदा महिनेपर्यंत त्यांना
या
हद्दीतून
त्या
हद्दीत
व
त्या
हद्दीतून
या
हद्दीत
असे
सारखे
गोते
खात
राहावे
लागले.
शेवटी
या
श्रमांनी
व
हालअपेष्टांनी
त्यांना
ताप
आला
व
तो
दोषी
ठरला.
नानासाहेब तापाने बेशुद्ध
होऊन
पडले
तरी
नेपाळकरांनी
त्यांची
गय
न
करता
आपल्या
सीमेतून
निघून
जाण्याची
आमच्या
मागे
तंगी
लावली
! तेव्हा
जवळच्या
लोकांनी
आम्हा
बायकांची
रवानगी
शेजारच्या
खेड्यात
केली,
व
नानासाहेब
यांस
दिवखरी
गावाजवळच्या
रानात
एका
लहानशा
ओढ्याच्या
जवळ
चारपाच
शेलक्या
स्वारांनिशी
पाठवून
दिले.
त्या
ठिकाणी
थोड्याशा
वेळाने
नानासाहेबांनी
आपला
देह
ठेविला
! भोवतालच्या
मंडळींनी
त्यांच्या
शवाचे
यथाविधी
दहन
केले
व
अस्थी
घेऊन
ती
मंडळी,
आम्ही
बायकामंडळी
होतो
तेथे
आली.
मी
तेथे
त्या
मंडळीत
होतेच.
नानासाहेबांची
उत्तरक्रिया
माझ्या
देखतच
झाली.
त्यावेळी
माझे
वय
बारा
वर्षांचे
होते.
नानासाहेबांचा असा शोचनीय
अंत झाला. पुढे रावसाहेब
( नानासाहेबांचे पुतणे व दादासाहेबांच्या
पत्नी रोहिणीबाई यांनी
घेतलेले दत्तक चिरंजीव
) आपला परिवार सोडून ग्वाल्हेरकडे
चालते झाले. पण
ते सियालकोटच्या जवळपास
असताना एका मराठा
जातीच्या इसमाने इंग्रजांस त्यांची
बातमी दिली! ती
लागताच त्यांस पकडण्यात येऊन
फासावर
चढविण्यात आले. त्यांच्या
पत्नीचीही अशीच काही
गत झाल्याचे ऐकिवात
आले. पण नक्की
काही कळत
नाही."
( संदर्भ ग्रंथ : - सन अठराशे
सत्तावन्न. लेखक
- श्री. नारायण केशव बेहेरे
)
विश्लेषण :- बयाबाई आपटेची हकीकत
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या नात्याने
विश्वसनीय मानता येईल खरी
परंतु चिकित्सक इतिहासकार
श्री. शेषराव मोरे
यांनी आपल्या ' १८५७
चा जिहाद ' या
ग्रंथात बयाबाईच्या हकीकतीला छेद
देणारी माहिती दिली आहे.
त्यानुसार ता.
२०
एप्रिल
१८५९
रोजी
नानासाहेब
पेशव्याने
ब्रिटीश
सरकारला
एक
निवेदन
पाठवले
होते.
त्यामध्ये " (१) आपल्यावर
बंडखोर
सैनिकांनी
नेतृत्व
स्वीकारण्याची
सक्ती
केली
(२)
कानपूर
येथील
इंग्रजांच्या
कत्तलीचा
आदेश
आपण
दिला
नाही
(३)
दोन
- तीन
वर्षे
आपण
शासनाकडे
अर्ज
विनंत्या
पाठवीत
आहोत
" हे तीन प्रमुख
मुद्दे मांडले आहेत.
या ठिकाणी प्रथम बयाबाई
आपटे व मोरे
यांनी दिलेल्या माहितीचा
विचार करू. बयाबाई
सांगते त्यानुसार १४ महिने
हिंदुस्थान - नेपाळच्या सरहद्दीत धावपळीचे
जीवन जगल्यावर नानासाहेब
पेशवा दोषी ज्वराने
आजारी पडला व
त्यातच त्याचा अंत झाला.
जर हे खरे
मानायचे झाले तर
नानासाहेब स. १८५७
च्या अखेरीस नेपाळ
जवळ गेला असे
गृहीत धरावे लागेल
व तेथून १४
महिने मिळवले तर
कोणत्याही परिस्थितीत नानाच्या मृत्यूची
तारीख स. १८५९
च्या मार्चच्या पुढे
जाऊ शकत नाही.
परंतु शेषराव मोरेंनी
दिलेल्या माहितीनुसार नानाचे ब्रिटीश
सरकारला उद्देशून काढलेले निवेदन
२० एप्रिलचे आहे. कसा
बसवायचा ? त्यात आणखी एक
मौजेची बाब म्हणजे
नानासाहेब पेशव्याच्या मृत्यूची अधिकृत
तारीख ६ ऑक्टोबर
१७५८ मानली जाते.
खुद्द रियासतकार सरदेसाई
देखील हीच तारीख
खरी मानतात. माझ्या
मते, बयाबाई आपटेने
सांगितलेल्या हकीकतीनुसार नानाच्या मृत्यूची
तारीख ठरवण्यात आली
असावी किंवा नाना
मेल्याचे त्यावेळी जेव्हा सर्वत्र
सांगण्यात आले तेव्हाच
ती तारीख निश्चित
करण्यात आली असावी.
कारण काहीही असो,
पण नानाच्या निधनाची
अधिकृतरित्या ठरवण्यात आलेली तारीख
चुकीचे असल्याचे दिसून येते.
ते कसे आपण
पुढे पाहणार आहोतच.
असो, सर्वप्रथम आपण
नानाच्या निवेदनाचा विचार करू.
त्याने हे निवेदन
का काढले असावे
? त्यासाठी आपल्याला स. १८५७
च्या बंडा नंतर
इंग्लंडच्या राणीने हिंदुस्थानी जनतेस
उद्देशून काढलेल्या जाहीरनाम्यातील एक
विशिष्ट भाग अभ्यासावा
लागेल. तो खालीलप्रमाणे
:-
“ ……. राज्यलोभी
मनुष्यांनी स्वदेशीय लोकांस खोटे
मजकूर समजावून फसविले,
आणि दंग करण्यास
प्रवृत्त केले; अशा त्यांच्या
कृत्यांनी हिंदुस्तानांतील लोकांस इजा आणि
दुःखे प्राप्त झाली,
येणेकरून आम्हांस फार दुःख
झाले आहे. दंगा
करणारांचा पराजय करून दंग्यांचा
मोड केला, यावरून
आमचे सामर्थ्य सर्वांस
जाहीर झाले आहे.
परंतु सदर्हूप्रमाणे फसलेल्या
लोकांपैकी जे पुनः
योग्य रीतीने चालू
इच्छितात त्यांवर दया करून,
त्यांच्या अपराधांची क्षमा करावी
अशी आमची मर्जी
आहे.
अधिक रक्तस्त्राव
न व्हावा व
हिंदुस्तानांतील आमच्या मुलखांत स्वस्थता
लवकर व्हावी या
उद्देशाने एका प्रांतात
तर आमचे व्हाईसरॉय
व गव्हर्नर जनरल
यांणी मागे जे
दुःखकारक दंगे झाले
त्यांत ज्या लोकांनी
सरकारच्या विरुध्द गुन्हे केलेल्या
बहुतेक लोकांस, काही अटी
ठरवून अपराधांची क्षमा
होईल अशी आशा
दाखविली आहे ; आणि
ज्यांचे अपराध क्षमेस पात्र
नाहीत अशा गुन्हेगारांस
काय काय शिक्षा
होईल हेही त्यांणी
ठरविले आहे. सदर्हू
तजवीज आमचे व्हाईसरॉय
व गव्हर्नर जनरल
यांणी केली ती
आम्हांस मंजूर व कबूल
आहे. व याशिवाय
आम्ही आणखी जाहीर
करतो तें येणेप्रमाणे.
इंग्रज सरकारच्या
रयतेचे
खून
करण्यांत
प्रत्यक्ष
संबंध
असल्याची
ज्यांवर
शबिती
झाली
असेल,
किंवा
होईल
त्या
गुन्हेगारांवर
दया
करणे
न्यायाविरुद्ध
आहे;
परंतु
यां
खेरीज
बाकीच्या
सर्व
गुन्हेगारांवर
दया
केली जाईल.
खुनी
गुन्हेगारांस ज्या लोकांनी
समजून उमजून आश्रय
दिला असेल, किंवा
जे दंग्यास पुढारी
किंवा प्रवर्तक झाले
असतील त्यांस जीवदानाखेरीज
दुसरे काही आश्वासन
देववत नाही. परंतु
अशा मनुष्यांस शिक्षा
ठरविताना ते सरकाराशी
बेईमान होण्यास कोणत्या कारणावरून
प्रवृत्त झाले, याचा पूर्ण
विचार केला जाईल;
आणि मतलबी लोकांनी
उठवलेल्या खोट्या बातम्या केवळ
अविचाराने खऱ्या समजून ज्या
लोकांनी गुन्हे केले असे
दिसून येईल त्या
लोकांविषयी पुष्कळ मेहेरबानीची नजर
ठेवण्यांत येईल.
सदर्हू मनुष्यांखेरीज
जे
लोक
दंग्यात
असून
लढाई
करीत
असतील
ते
जर
आपल्या
घरास
परत
येउन
स्वस्थ
आपापले
कामधंदे
करू
लागतील
तर
त्यांणी
आमच्याविरुद्ध
व
आमच्या
राज्याविरुद्ध
व
आमच्या
दर्जाविरूद्ध
केलेले
सर्व
गुन्हे
विसरून
कोणतीही
अट
न
लावता
त्यांस
माफी
व
क्षमा
मिळेल
असे
आम्ही
या
जाहीरनाम्याचे
द्वारे
आश्वासन
देतो.
अपराधाची क्षमा व
मेहेरबानी करण्या प्रकरणी जे
नियम वर लिहिले
आहेत त्या अन्वये
पुढील जान्युआरी महिन्याच्या
पहिले तारखेपुर्वी जे
वर्तन करतील त्या
सर्वांस माफीचे व मेहेरबानीचे
सदर्हू ठराव
लागू करावे अशी
आमची आज्ञा आहे.
“
टीप :- हा
जाहीरनामा इंग्लंडमध्ये ता. १५
ऑगस्ट १८५८ रोजी
प्रकाशित झाला तर
हिंदुस्थानात ता. १
नोव्हेंबर १८५८ रोजी.
( संदर्भ ग्रंथ :- ब्रिटीश रियासत
खंड - २. लेखक
:- श्री. गो. स.
सरदेसाई )
विश्लेषण :- इंग्लंडच्या
राणीने हिंदुस्थानी जनतेस व
बंडातील सहभागी लोकांना उद्देशून
जो जाहीरनामा काढला
होता त्याचा व
नानाच्या स. १८५९
च्या निवेदनाचा फारच
जवळचा संबंध आहे.
वस्तुतः नानाच्या निवेदनानुसार राणीचा
जाहीरनामा प्रसिद्ध होण्यापूर्वीच -- किंबहुना
असेही म्हणता येईल
कि, अयोध्येहून त्याने
नेपाळकडे प्रस्थान ठेवले त्याच
वेळी इंग्रजांकडे अर्ज
विनंत्या पाठवण्यास आरंभ केला
होता. परंतु इंग्रज
सरकारने जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी
म्हणा तिकडे दुर्लक्ष
केले. त्या वादात
आपणांस शिरायचे नाही. मुद्दा
हा आहे कि,
नाना स. १८५७
पासून इंग्रजांकडे निवेदने
पाठवत होता. परंतु
इंग्लंडच्या राणीने काढलेल्या जाहीरनाम्याने
त्याची नाही म्हटले
तरी बऱ्यापैकी साफ
निराशा झाल्याचे दिसून येते.
यासाठी जाहिरनाम्यातील ठळक केलेला
भाग वाचकांनी पहावा.
त्यानुसार " इंग्रज सरकारच्या रयतेचे
खून करण्यांत प्रत्यक्ष
संबंध असल्याची ज्यांवर
शबिती झाली असेल,
किंवा होईल त्या
गुन्हेगारांवर दया करणे
न्यायाविरुद्ध आहे; परंतु
यां खेरीज बाकीच्या
सर्व गुन्हेगारांवर दया
केली जाईल.
" हे कलम नानासाहेबाच्या
शिक्षामाफीच्या विरोधात जाणारे होते.
कारण, कानपूरला जेव्हा
सतीचौरा घाटावर इंग्रजांची बंडखोरांनी
कत्तल केली त्यावेळी
नावाला का होईना
पण त्या सैन्याचे
नेतेपद नानासाहेबाकडे होते. त्यामुळे इंग्रज
सरकारच्या ताब्यात आपण सापडलो
तर आपणांस मृत्यू
खेरीज इतर कसलीही
शिक्षा मिळणार नाही याची
नानाला खात्री होती. कारण,
बंडखोर सैनिक कोणाचे ऐकत
होते वा नव्हते
याच्याशी इंग्रजांना काही देणे
- घेणे नव्हते. त्यांच्या दृष्टीने
मोगल बादशहा बहादुरशहा
जफर प्रमाणे नानासाहेब
पेशवे हे एक
चालते बोलते सत्तेचे
प्रतिक / सत्ताकेंद्र होते. स.
१८५७ च्या उठावानंतर
अशा सत्ताकेंद्रांना माफी
देऊन आपल्या ठिकाणी
सुखाने नांदू देण्याची इंग्रजांची
अजिबात इच्छा नव्हती व
याची नानालाही जाणीव
होती. मग
प्रश्न पडतो कि,
नानाने ते निवेदन
का प्रसिद्ध केले
? माझ्या मते, आपली
बाजू इंग्रजांपुढे नाही
तर जगापुढे मांडण्याचा
नानाचा प्रयत्न व हेतू
होता अन त्याच
हेतूने प्रेरित होऊन त्याने
हे निवेदन प्रकाशित
केले असावे.
राणीचा जाहीरनामा, नानाचे
निवेदन व बयाबाई
आपटेची हकीकत एकत्रितपणे
विचार केला असता
असे लक्षात येते
की, आपट्यांची कहाणी
पूर्णतः
विश्वसनीय
नाही.
बयाबाई
सांगते
त्यानुसार
नेपाळात
गेल्यावर
सुमारे
१४
महिन्यांनी
नाना
दोषी
तापाने
आजारी
पडला.
त्यावेळी
नेपाळ
सरकारने
तगादा
लावल्याने
नानाला
त्याच्या
परिवारासोबतच्या
लोकांनी
एका
खेड्यात
नेले.
तेथून
नानाला
चार
- पाच
विश्वासू
स्वारांनी
दिवखरी
गावाजवळच्या
रानात
नेले
अन
त्याच
ठिकाणी
नानाचे
निधन
झाले.
परंतु,
मृत
नानाचे
कलेवर
त्याच्या
परिवाराकडे
न
आणता
त्याचे
दहन
करून
व
अस्थि
घेऊन
सोबतची
मंडळी
परतल्याची
जी
हकीकत
सांगितली
जाते
ती
संशयास्पद
आहे.
स.
१८५७
च्या
उठावापासून
ते
नेपाळ
पर्यंतच्या
संकटमय
प्रवासात
नानाच्या
ज्या
पत्नींनी
त्याची
सोबत
केली,
त्या
-- नानासाहेब
मरणासन्न
असताना
त्यास
सोडून
राहतील
काय
? तसेच
नाना
जरी
इंग्रजांचा
-- नेपाळ
इंग्रजांचा
मित्र
असल्याने
लौकिकात
नेपाळचा
-- शत्रू
असला
तरी
तो
मेला
होता
व
मृतदेहाला
कोणी
कैद
वा
फाशी
देऊ
शकत
नाही.
मग
नानाच्या
मृतदेहाचे
त्याच्या
परिवारास
अंतिम
दर्शन
घेण्याची
संधी
न
देता
इतक्या
तातडीने
दहन
का
करण्यात
आले
असावे
? बयाबाईने
नानाची
उत्तरक्रिया
होताना
पाहिली
पण
त्याचे
प्रेत
काही
पाहिलेलं
नाही.
त्यामुळेच
नानाच्या
निधनाची
जी
माहिती
बयाबाईस
सांगण्यात
आली
ती
बनावट
असावी
असा
दाट
संशय
येतो.
माझ्या मते, नानासाहेब
मरण पावल्याची बातमी
उठवून व त्याची
उत्तरक्रिया करून इंग्रज
सरकारचा नाना व
त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे लागलेला ससेमिरा
चुकवण्याची ती एक
खेळी होती. कसे
ते मी आता
स्पष्ट करतो.
नानाच्या मृत्यूची बातमी
जाहीर झाल्यावर आणि
बंडाचा वणवा पूर्णतः
शमल्यावर बयाबाई व कित्येक
मंडळी हिंदुस्थानात परतली.
नानाच्या स्त्रिया मात्र काठमांडू
येथे राहिल्या. तिकडे
त्यांनी वाडा बांधून
उत्पन्नासाठी काही गावे
खरेदी केली. तसेच
राणीगंज नावाचे नवीन गाव
वसवून तिथे एक
रामाचे व एक
लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले. त्या
मंदिरात मराठी राज्याचे निशाण
- भगवा झेंडा व पेशव्यांची
मसनद / गादी ठेवण्यात
आली. नानासाहेब नेपाळात
आला तेव्हा त्याच्या
सोबत बाजीरावाची पत्नी
सईबाई सोबत होती.
तिला नेपाळ सरकारने
जहागीर दिली. पण ती
नानाच्या मृत्युच्या आधी कि
नंतर याची मला
माहिती मिळाली नाही परंतु
स. १८९६ मध्ये
तिचे निधन झाल्यावर
नेपाळ सरकारने ती
जहागीर खालसा केली. इकडे
हिंदुस्थानात बंड अखेरच्या
टप्प्यात आले तेव्हा
तात्या टोपे, नानासाहेबाचा पुतण्या
रावसाहेब पेशवे आणि मोगल
शहजादा फिरोजशहा यांनी ता.
२१ जानेवारी १८५९
रोजी इंग्रजांशी एक
लढाई दिली पण
त्यात या त्रिकुटाचा
पराभव झाल्यावर रावसाहेब
नेपाळात निघून गेला आणि
स. १८६२ मध्ये
बयाबाई सांगते त्यानुसार ग्वाल्हेरकडे
येताना सियालकोट येथे त्यास
अटक झाली व
ब्रम्हावर्त येथेच त्यास फासावर
चढवण्यात आले.
नानाच्या सरकार घोषित
मृत्युच्या तारखेनंतरच्या या घटना
आहेत. पैकी रावसाहेबाच्या
प्रकरणाचा आपण नंतर
विचार करू. नाना
मरण पावताच जे
नेपाळ सरकार पेशवे
परिवारास उघड आश्रय
देत नव्हते ते
आता त्याच्या स्त्रियांना
राजरोसपणे राहू देऊ
लागले. इतकेच नव्हे तर
पेशव्यांच्या स्त्रिया तिथे गावं
खरेदी करून आणि
वाडे बांधून राहू
लागल्या. बाजीरावाच्या पत्नीस जहागीर देण्यात
आली. बयाबाई व
इतर मंडळींना सुरक्षितपणे स्थळी
परत जाता आले.
हे सर्व नानासाहेब
मेल्याची बातमी समजल्यावर घडले.
पण या सर्वांशी
रावसाहेब पेशव्याची बातमी विसंगत
आहे.
रावसाहेब पेशवा स.
१८५९ च्या आरंभी
इंग्रजांकडून पराभूत होऊन नेपाळात
गेला. तिथे तो
स. १८६२ पर्यंत
राहिला आणि ग्वाल्हेरकडे
येण्यासाठी जेव्हा निघाला तेव्हा
त्याला सियालकोट येथे जाण्याची
गरज काय ? याचा
उलगडा होत नाही
पण हा तितकासा
महत्त्वाचा मुद्दा नाही तर
स. १८६२ पर्यंत
नेपाळांत राहिल्यावर रावसाहेबास हिंदुस्थानात
येण्याचे का सुचले
असावे हा महत्त्वाचा
प्रश्न आहे. माझ्या
मते या प्रश्नाचे
उत्तर नानासाहेबाच्या तथाकथित
मृत्यूशी निगडीत आहे. नेपाळात
जेव्हा रावसाहेब गेला तेव्हा
त्याची व पेशवे
परिवाराची भेट झाल्याची
माहिती मला मिळू
शकली नाही पण
त्याचे नेपाळांत जाणे व
परत येणे या
गोष्टी तर्कसंगत वाटत नाहीत.
माझ्या मते, बयाबाई
किंवा सरदेसाई प्रभूती
इतिहासकार नानासाहेब पेशवा स.
१८५८ च्या सुमारास
मेला म्हणून सांगतात
तर ते चुकीचे
असल्याचे दोन प्रमुख
पुरावे म्हणजे -- (१) नानाचे
दि. २० एप्रिल
१८५९ चे निवेदन
आणि (२) स.
१८६२ मध्ये रावसाहेब
पेशव्याचे नेपाळातून हिंदुस्थानात परत
येणे.
रावसाहेब पेशवा परत येण्यामागे
नानासाहेबाचा सल्ला कारणीभूत
होता का ? इंग्लंडच्या राणीचा जाहीरनामा
पाहिला असता असे
दिसून येते कि,
स. १८५९ च्या
जानेवारी पर्यंत जे शरण
येतील तसेच ज्यांनी
इंग्रज लोकांची हत्या केली
नाही त्यांना माफी
देण्याचे आश्वासन आहे. या
पार्श्वभूमीवर राव्साहेबाचा विचार केला असता
तर असे लक्षात
येते कि, जाहीरनामा
प्रसिद्ध झाल्यावर देखील ता.
२१ जानेवारी १८५९
पर्यंत रावसाहेब इंग्रजांच्या विरोधात
लढत होता. त्यानंतर
तो नेपाळात गेला.
तिकडे तोवर नानासाहेबाच्या
मृत्यूची बातमी उठली होती.
तर इकडे
स. १८५९ च्या
एप्रिलांत तात्या टोपेचा ग्रंथ
आटोपला होता.
आता या
घटना लक्षात घेता
आणि राणीच्या जाहिरनाम्यानुसार
इंग्रज सरकारला विशिष्ट मुदतीच्या
आत शरण न
जाता रावसाहेब थेट
नेपाळांत येतो आणि
तिथे काही दिवस
म्हणा, वर्ष म्हणा
राहतो व अचानक
स. १८६२ मध्ये
हिंदुस्थानात येतो. याचे कारण
म्हणजे, रावसाहेब पेशवा हा
नानासाहेब पेशव्याच्या सल्ल्यानेच हिंदुस्थानात
परतला होता हे
होय. त्याखेरीज रावसाहेबाच्या
हिंदुस्थान आगमनाची कारणपरंपरा उलगडत
नाही. रावसाहेब हा
नेपाळात नानासाहेबास भेटला. हिंदुस्थानातील
बंड शमले होते.
इंग्लंडच्या राणीकडे -- पर्यायने ब्रिटीश
पार्लमेंटकडे हिंदुस्थानची सत्ता आल्याने आता रावसाहेबास
माफी मिळण्याची नानासाहेबास
आशा वाटली. सत्तांतरानंतर
इंग्रज सरकार कमीत कमी
रावसाहेबास तरी जीवनदान
देईल अशी नानाची
अटकळ होती. कारण,
रावसाहेबाने इंग्रजांच्या विरुध्द युद्धे
वजा केल्यास त्यांची
कुठेही कत्तल केली नव्हती
वा त्याच्या उपस्थितीत
असा प्रकार घडला
नव्हता. त्याउलट नानासाहेबाच्या शिरावर
कानपूरच्या कत्तलीचे ओझे होते.
असो, रावसाहेबावर राणीच्या
जाहीरनाम्यानुसार इंग्रज जनतेच्या खुनात
सहभाग असल्याचा आरोप
नसणे, बंडाचा पूर्णतः
बिमोड होणे आणि
हिंदुस्थानवर ब्रिटीश पार्लमेंटची सत्ता
असणे या गोष्टी
लक्षात घेऊन नानासाहेबाने
रावसाहेबास हिंदुस्थानात परतण्याचा सल्ला दिला.
कारण आता त्याच्या
जीवाला आता काही
धोका उरला नव्हता.
त्यामुळेच नेपाळ सारखे सुरक्षित
ठिकाण सोडून रावसाहेब
हिंदुस्थानात परतला पण त्याच्या
दुर्दैवाने इंग्रज सरकारने त्यास
माफी अथवा प्राणदान
न देता फासावर
चढवले.
तात्पर्य, रावसाहेब प्रकरणाची
इतक्या तपशीलवारपणे चर्चा करण्याचे
कारण म्हणजे नानासाहेब
पेशवा स. १८६२
पर्यंत जिवंत असल्याचे सिद्ध
करणे हे होय.
नानाच्या सल्ल्यानेच रावसाहेब हिंदुस्थानी
परतला. अन्यथा त्यास इथे
येण्याची काहीच गरज नव्हती
हे उघड आहे.
यावरून निदान स. १८६२
पर्यंत तरी नानासाहेब
जिवंत असून नेपाळांत
असल्याचे सिद्ध होते. त्यापुढे
त्याचे काय झाले
याची माहिती तत्कालीन
नेपाळी अधिकाऱ्यांनाच असू शकते.
कारण, नेपाळच्या जंगबहाद्दरने
इंग्रज सरकारशी मैत्री राखत
नानासाहेबाच्या पश्चात ( मृत्युच्या अफवेनंतर
) त्याच्या परिवारास नेपाळांत स्थायिक
होऊ दिले होते
आणि हाच मोठा
नानासाहेब जिवंत असल्याचा पुरावा
आहे. नेपाळ लौकिकात
जरी इंग्रजांचा मित्र
असला व प्रत्यक्षात
मांडलिक असला तरी
तो इंग्रजांचा काही
सुखासुखी मित्र बनला नव्हता
हे लक्षात घेतले
पाहिजे. त्यामुळेच इंग्रजांच्या दृष्टीने
मेलेल्या नानासाहेबास नेपाळने आश्रय
देण्यात काहीच गैर वा
अशक्य नव्हते. यावरून
सहजसिद्ध होते की,
स. १८६२ नंतर
नानासाहेबाचे नेमके काय झाले
किंवा तो कधी
मरण पावला याची
माहिती फक्त नेपाळ
सरकारच देऊ शकते.
ती इतरत्र मिळणे
शक्य नाही.
संदर्भ ग्रंथ :-
१) सन अठराशे
सत्तावन्न :- श्री. ना. के.
बेहरे
२) मराठी रियासत ( खंड
८ ) :- श्री. गो. स.
सरदेसाई
३) ब्रिटीश रियासत ( खंड
२ ) :- श्री. गो. स.
सरदेसाई
४) १८५७ चा
जिहाद :- श्री. शेषराव मोरे