सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी ( निवडक उतारे , अंक – ३ )
सवाई माधवराव पेशव्याच्या दरबारात एक विचित्र प्रकरण ( आजच्या समाज मान्यतेनुसार ) निवाड्याकरीता आले होते. ज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्या ब्राम्हणाने आपला विवाहविधी पार पाडवा अशी कोरीगडाच्या आसपास राहणाऱ्या काही महारांनी मागणी केली. त्यावेळच्या नियमानुसार त्यांनी हि मागणी त्या भागातील कमावीसदाराकडे केली असता त्याने महारांच्या वतीने निकाल दिला. परंतु, ज्योतिष्याचा व्यवसाय करणाऱ्या ब्राम्हण व्यक्तीस हा निकाल न आवडल्याने त्याने या निर्णयाविरोधात पेशवे दरबारात दाद मागितली. त्याविषयीचा तत्कालीन लेखांतील वृत्तांत व त्यावरील विश्लेषण खालीलप्रमाणे :-
११३२ ( ८९० ) सीत समानीन मया व अलफ साबान ६
रघुनाथ जोतिषी बिन त्रिंबक जोतिषी, व कृष्ण जोतिषी बिन दामोदर जोतिषी, मामले पाल पंचमहाल यांणी हुजूर विदित केले की, तर्फ कोरबरशे उर्फ पौडखोरे येथील जोतिष, उपाध्यपण, व धर्माधिकाऱ्याची वृत्ति पुरातन आमची आम्हांकडे चालत आहे, त्यांत महारांची लग्ने तर्फ मजकुरी जोतिष्यांनी लावण्याची चाल पुरातन नाही ; व आजपर्यंत लाविली नसतां सन अर्बा समानीनांत आपाजी कृष्ण कमावीसदार, तर्फ मजकूर दिंमत आनंदराव भिकाजी, यांजकडे तर्फ मजकूरचे महार फिर्याद होऊन आपली लग्ने जोतिषी यांणी लावावी ते लावीत नाहीत म्हणोन सांगितल्यावरून, पुर्ती चौकशी न करितां, पेशजी रखमाजी वाकडे हवालदार कोरीगडास होते त्यांचे वेळेस किल्ल्याचे चाकरमान्या महाराचे लग्न लावण्याचे होते, ते समयी लग्न लावणार मेढ्या महार हा हजर नव्हता, सबब किल्ले मजकूरचे हवालदार व सबनीस यांणी आमचा बाप भाऊ विनायक जोतिषी दहा पंधरा वर्षांचा अज्ञान होता, त्याजवर निग्रह करून महाराचे लग्न लावविले. त्यास अजमासे पंचावन वर्षे जाहली. तेवढ्याच दाखल्यावरून महारांची लग्ने जोतिषांनी लावीत जावी म्हणोन कमावीसदारांनी महारास भोगवटियास पत्र करून दिल्हे ; त्याजवरून लग्न लावण्यास अतिशूद्र आम्हांजवळ ब्राम्हण मागों लागले तो न दिल्हा, याजकरितां कमावीसदारांनी आम्हांस दहा रुपये मसाला करून महाली नेऊन महारांची लग्ने करावायाविशी निग्रह केला, त्यास अतिशूद्रांचे लग्नास आम्ही मुहूर्त मात्र सांगत असतो, पूर्वापार लग्ने लाविली नसतां नवीन चाल होणार नाही, ऐसे आम्ही उत्तर केले. त्याचा कमावीसदारांनी विषाद मानून पूर्वी या प्रांतांत धनगर नव्हते, अलीकडे नवे वस्तीस आले आहेत त्यांची व इतर जात परदेशी व गुजराथी वगैरे नूतन येतील त्यांचीही लग्ने तुम्ही लाऊ नयेत म्हणोन कमावीसदारांनी आक्षेप ( आक्षेप – मागणे, तक्रार, आशंका ) करून, जबरदस्ती आमचे वतनाची जफ्ती करून, वृत्तीचे कामकाजास नवा गुमास्त ठेविला आहे. येविशी कमावीसदारांस ताकीद होऊन महारांस भोगवटियास पत्रे करून दिल्ही आहेत, ती माघारी घेऊन आमच्या वृत्ती आम्हांकडे चालवावयाविशी आज्ञा होऊन, जफ्तीमुळे वृत्तीचा ऐवज व मसाला महाली घेतला आहे, तो माघारा देविला पाहिजे म्हणोन ; त्याजवरून येविशीची चौकशी करून दाखले मनास आणतां महारांची लग्ने जोतिष्यांनी लावावयाची चाल फार करून नाही, कोठे कोठे लावीतही असतील, परंतु कोकण प्रांती महारांची लग्ने जोतिषी लावीत नाही, त्यांचे जातीमध्ये मेढे महार आहेत तेच लावितात, याप्रमाणे तळकोकणचे जमीदार व जोतिषी हुजर आहेत त्यांणी विदित केले ; व वेदमूर्ती रंग जोशी जुन्नरकर यांणीही लिहून दिल्हे की, शहर जुन्नर बरहुकूम पेठा सुद्धां व तर्फेचे गांव पाऊणशे व शिवनेर वगैरे किल्ले पांच या ठिकाणी जोतिषपणाची वृत्ति परंपरागत आपली आहे, परंतु आपले वृत्तींत अतिशूद्रांची लग्ने आम्ही लावीत नाही , अतिशूद्रांचे जातीत ढेगोमेगो ( महारांचे गुरु ) आहेत तेच त्यांची लग्ने लावीत असतां, पूर्वी एक वेळ किल्ल्याचे चाकरमाने व प्रांतांतील दोन चार हजारपर्यंत महार मिळोन गवगवा करोन जोतिष्यांनी आपली लग्ने लावावी म्हणोन, आवरंगजेब पादशाहा याजवळ फिर्याद केली, तेव्हां त्यांणी पुरातन चाल मनास आणून, जोतिषीयांणी महारांची लग्ने लाऊ नयेत असा ठराव केला, त्याप्रमाणे हा कालवर चालते. म्हणोन याप्रमाणे दो प्रांतीचे दाखले गुजरलेल्याप्रमाणे तर्फ मजकुरींही जोतिष्यांनी महारांची लग्ने लावावयाची चाल पुरातन नसतां, मागे कोरीगडचे हवालदाराने जोतिष्याचे मुलापासून बलात्कारे एक वेळ महाराचे लग्न लाविले असल्यास तेव्हढ्याच दाखल्यावरून महारांची लग्ने जोतिष्यांनी लावीत जावी म्हणोन तुम्ही महारांस नवीं पत्रे करून देऊन जोतिषी यांजवर लग्ने लावावयाविशी निग्रह करून त्यांजपासून मसाला घेऊन त्यांच्या वृत्ती जप्त केल्या, हे ठीक न केले. मागे मोगलाई अमलांत ही पुरातन चाल मोडून नवे केले नसतां स्वराज्यांत तुम्ही आग्रह करून नवीन चाल करणे अनुचित. यास्तव तर्फ मजकुरी महारांची लग्ने पुरातन जोतिषी लावीत नाही, त्याप्रमाणे पुढेही लाऊ नयेत, याप्रमाणे ठराव करून हे पत्र तुम्हांस सादर केले असे. तरी तुम्ही महारांस नूतन पत्रे करून दिल्ही असतील ती माघारी घेऊन जोतिषीयांजवळ देणे, आणि जोतिषी यांचे वतन जप्त केले आहे ते मोकळे करून जफ्तीमुळे ऐवज जमा जाहला असेल तो, व यांजपासून मसाला घेतला आहे तो माघार देणे. अतिशूद्र खेरीज करून सर्व जातींची लग्ने पुरातन जोतिषी लावीत आल्याप्रमाणे लावितील. तुम्ही नवीन आक्षेप न करणे. या पत्राची नक्कल घेऊन हे अस्सल पत्र दाखल्यास जोतिषी यांजवळ परतोन देणे म्हणोन, आपाजी कृष्ण कमावीसदार, तर्फ पौडखोरे दिंमत आनंदराव भिकाजी यांचे नावे चिटणीसी. पत्र १
सदरहूअन्वये समस्त महार तर्फ कोरबारसे उर्फ पौडखोरे यांस आपाजी कृष्ण यांजपासून पत्र करून घेतले आहे, ते जोतिषी यांजवळ माघारां देणे. तुमचे जातीमध्ये मेढे महार लग्ने लावीत आल्याप्रमाणे लावितील. याउपरी जोतिषी यांशी खटला केल्यास मुलाहिजा होणार नाही म्हणोन. पत्र १
विश्लेषण :- वरील उतारा सवाई माधवराव पेशव्याच्या रोजनिशीमधील असून त्या उताऱ्याची तारीख मुस्लीम कालगणनेनुसार दिलेली आहे. प्रस्तुत ठिकाणी या उताऱ्याची नेमकी तारीख शोधणे तितकेसे महत्त्वाचे नसल्यामुळे स. माधवराव पेशव्याचा काल हा स. १७७४ ते १७९५ असा २० – २१ वर्षांचा आहे व या उताऱ्यात आलेला प्रसंग याच २० – २१ वर्षांच्या काळातील आहे एवढे लक्षात घेतले तरी पुरेसे आहे. या उताऱ्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यापूर्वी याचा थोडक्यात सारांश आधी आपण पाहू.
१) कोरीगडाच्या आसपासच्या गावातील महारांनी आपल्या जातीतील व्यक्तींचे लग्न ज्योतिष व्यवसाय करणाऱ्या ब्राह्मणाने लावावे असा आग्रह धरला.
२) यासाठी त्यांनी सुमारे ५० – ५५ वर्षांपूर्वीचा एक दाखला दिला. त्यानुसार ५० – ५५ वर्षांमागे कोरीगडावर काम करणाऱ्या महाराचे लग्न लावण्यास महार जातीतील उपाध्याय हजर नव्हता. तेव्हा गडाचा हवालदार रखमाजी वाकडे याने, उपरोक्त उताऱ्यातील तक्रारदार रघुनाथ जोतिषीच्या वडील ( भाऊ ? ) यास जबरदस्तीने महाराचा लग्नविधी करण्यास भाग पाडले होते.
३) कोरीगडावरील या प्रसंगाचा दाखला प्रस्तुत प्रसंगी महारांनी पौड खोऱ्याचा कमावीसदार आपाजी कृष्ण यास देऊन आपले लग्नविधी ज्योतिष व्यवसाय करणाऱ्या ब्राम्हणाने, म्हणजेच या निवाड्यातील मुख्य तक्रारदार रघुनाथ जोतिषी याने करावेत अशी मागणी केली. तेव्हा आपाजी कृष्ण याने महारांच्या बाजूने निकाल दिला.
४) रघुनाथ जोतिषीला आपाजी कृष्णाचा निकाल पसंत पडला नाही व त्याने आपली तक्रार पेशवे दरबारात मांडली. तसेच आपली बाजू मांडताना त्याने असेही सांगितले कि, अतिशूद्रांच्या लग्नाचे मुहूर्त मात्र आम्ही सांगतो पण त्यांची लागणे लावत नाही. कारण अशी पूर्वपरंपरा नाही.
५) या निवाड्यात पेशवे दरबाराने रघुनाथ जोतिषीची बाजू उचलून धरली. मात्र रघुनाथ जोतिषीच्या बाजूने निकाल देताना दरबाराने ज्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, त्या गोष्टींचा / मुद्द्यांचा अतिशय काळजीपूवर्क अभ्यास करणे आवश्यक आहे.
(१) ज्योतिष्याचा व्यवसाय करणाऱ्या ब्राम्हणांनी महारांची लागणे लावण्याची चाल फारशी प्रचलित नाही व काही ठिकाणी ती असूही शकते अशा आशयाचे मोघम विधान केले आहे. महार समाजातील लग्नविधी लावण्याचे कार्य त्यांच्याच जातीतील मेढे, ढेगोमेगो नामक पुरोहित पार पाडतात.
(२) प्रस्तुत खटला कोकण भागातील असल्याने त्या प्रांतातील पेशवे दरबारी हजर असलेल्या जमीनदार, ज्योतिषी यांचीही या बाबतीत साक्ष घेण्यात आली. त्यांचेही मत रघुनाथ जोतिषी प्रमाणेच असल्याचे दिसून येते. याशिवाय तत्कालीन वेदमूर्ती रंग जोशी जुन्नरकर यानेही नमूद केले कि, जुन्नर प्रांतातील सुमारे ७५ गावे व शिवनेरी धरून ५ किल्ल्यांची ज्योतिष सांगण्याची परंपरागत वृत्ति आपल्या घराण्यात आहे व अतिशूद्रांची लग्ने लावण्याचे कार्य आपल्या किंवा आपल्या पूर्वजांच्या हातून घडलेले नाही.
(३) औरंगजेबाच्या काळात देखील महारांनी याच आशयाचा त्याच्याकडे अर्ज केला होता. परंतु पूर्वपरंपरा लक्षात घेऊन औरंगजेबाने महारांच्या विरोधात निकाल दिला.
(४) या ठिकाणी असाही एक प्रश्न उद्भवतो कि, ब्राम्हणांनी आपले लग्नविधी पार पाडावेत यासाठी औरंगजेबाच्या काळापासून महार का प्रयत्न करत होते ? ( हे विधान या उताऱ्यातील माहितीच्या आधारावर केले आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.) त्यांच्या जातीतही लग्नविधी पार पाडणारे पुरोहित हजर असताना ब्राम्हणांनीच आपले लग्नविधी पार पाडावेत हा आग्रह कशासाठी ? त्या काळात कोणकोणत्या जातींची लग्नविधी लावण्याचे कार्य ब्राम्हण करत होते ? कारण, केवळ अनुकरणातून जर महारांनी हा आग्रह केला असेल तर तत्कालीन जातींमधील विवाहपद्धती व त्यांचे विवाह लावणारे पुरोहित — मग ते सजातीय असोत कि ब्राम्हण अथवा इतर जातीय —- त्यांचीही माहिती मिळवून प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
(५) या ठिकाणी औरंगजेबाच्या काळातील उदाहरणाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखावरून असे दिसून येते कि, केवळ महारांची लग्ने ब्राम्हणांनी लावावीत अशी पूर्वपरंपरा नसल्याने महारांचा अर्ज औरंगजेबाने फेटाळून लावला. परंतु, अशी पूर्वपरंपरा — मग भलेही ती खंडित झालेली का असेना — असल्याखेरीज महार जातीचे लोक अशा प्रकारची मागणी औरंगजेबाकडे करतील का ?
(६) रघुनाथ जोतिषीच्या बाप ( भाऊ ? ) याजकडून कोरीगडाच्या हवालदाराने महाराचे लग्न जबरदस्तीने लावून घेतले. प्रस्तुत उताऱ्याची तारीख निश्चित करणे मला शकत नसले तरी हि घटना ५० – ५५ वर्षे इतकी जुनी म्हणजे शाहू छत्रपतीच्या काळात घडलेली आहे हे निश्चित ! महाराचे लग्न लावण्याचे कार्य पार पाडल्याबद्दल — ते देखील अशी पूर्वपरंपरा नसताना — रघुनाथ जोतिषीच्या वडिलांवर ( भावावर ? ) बहिष्कार पडल्याचा किंवा या कृत्याबद्दल त्यांनी प्रायश्चित्त घेतल्याचा उल्लेख या ठिकाणी येत नाही हे विशेष. दुसरे म्हणजे, गडाचा हवालदार हे कृत्य घडवून आणण्यात पुढाकार घेत आहे याचा अर्थ प्रचलित लोकरुढींच्या विरोधात आपण कार्य करत आहोत अशी त्याची भावना असल्याचे दिसून येत नाही. जरी तो सरकारी नोकर असला व गडाचा हवालदार असला तरी लोकभावनेला दुखावणे किंवा रुढींच्या विरोधात जाऊन कार्य करणे अथवा घडवून आणणे तितकेसे सोपे नसते. याचे प्रत्यंतर आजच्या काळात देखील आपल्याला दिसून येते.
(७) अतिशूद्रांच्या जातीतील लग्ने लावण्याचे कार्य त्यांच्याच जातीतील पुरोहित पार पाडतात असा उल्लेख या उताऱ्यात आला आहे. याचा अर्थ असा होतो कि, त्यावेळी प्रत्येक जातीचा स्वतंत्र असा एक पुरोहित वर्ग अस्तित्वात होता. याची कितीतरी उदाहरणे तत्कालीन कागदपत्रांमध्ये आढळून येतात कि, तत्कालीन कित्येक उच्च समजल्या जाणाऱ्या जातींमध्ये लग्न लावण्याचे कार्य त्या त्या जातीतील पुरोहितच पार पाडत. त्यासाठी ब्राम्हणांची गरज पडत नसे. आणि महत्त्वाचे म्हणजे, लग्न लावण्यात ब्राम्हण हजर असलाच पाहिजे असा काही दंडक नव्हता व ब्राम्हणाशिवाय इतरांनी लावलेले लग्न देखील अधिकृतच समजले जात होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा