प्रस्तुत लेखांत आपण इतिहास
म्हणजे काय व
त्याची व्याप्ती कुठवर आहे,
हे पाहणार आहोत.
इतिहासाची व्याख्या आजवर अनेकांनी,
अनेक अंगांनी केली
आहे. त्यांपैकी प्रचलित
व्याख्या येथे न
घेता प्रथम आपण
इतिहास हि संकल्पना
समजावून घेऊ. सामान्यतः
भूतकाळात घडलेली घटना, कृत्य
इ. चा अंतर्भाव
इतिहासात होतो. अगदी क्षणाक्षणाने
उलटून जाणारा प्रत्येक
क्षणही इतिहासात जमा होतो.
उदाहरणार्थ - प्रस्तुत लेखाची आरंभीची
वाक्यंही !
इतिहासाचा विचार करताना आपण
प्रामुख्याने मानवी इतिहासाचाच विचार
करतो. आता काहीजण
भौगोलिक, प्राणी - वनस्पती जीवनाचाही
इतिहास अभ्यासत आहेत. एकूण
इतिहासाची व्याप्ती, आवाका वाढत
चालला आहे खरा,
पण त्याचवेळी एक
शास्त्र म्हणून त्याच्या उपयुक्तेवर
तसेच अभ्यासावरही अनेकजण
प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अर्थात,
हा आक्षेप मानवी
जीवनाच्या धार्मिक, राजकीय इतिहासाशी
प्रामुख्याने संबंधित असतो. या
आक्षेपांचं निरसन करण्यापूर्वी आपण
इतिहास व इतर
शास्त्रं यांचे परस्पर संबंध
पाहू.
गणित, विज्ञान इ. शास्त्रांतील
विधानं, प्रमेयं सिद्ध करता
येतात, तो प्रकार
इतिहासात नाही असं
म्हटलं जातं. वास्तविक गणित,
विज्ञान हे तरी
काय आहे ? गणितातील
सर्व सिद्धांत, विज्ञानातील
नियम व शोध
हे तसेही भूतकाळात
घडलेले, नमूद केलेलेच
आहेत ना ? मग
एकप्रकारे ते देखील
इतिहासातच जमा होतात.
किंबहुणा असेही म्हणता येईल
की, सर्व शास्त्रं
ही इतिहासाच्या मुख्य
शाखेच्या उपशाखा आहेत ! विधान
धाडसी असलं तरी
अविचारी बिलकुल नाही.
गणित - विज्ञानातील इद्धंत
प्रयोगाअंती सिद्ध करता येतात.
इतिहासात तसं असतं
का ?
सिद्धांत वा गृहीतक
मांडण्याची इतिहास तसेच गणित
- विज्ञानातील अभ्यासपद्धती जवळपास सारखीच आहे.
प्रथम एक गृहीतक
मनाशी बाळगावे. त्या
अनुषंगाने प्रयोगास उपयुक्त अशी
सामग्री गोळा करावी.
तिचे परीक्षण करून
मग विश्लेषण करावे
व अंती निष्कर्ष
मांडावा. या सर्व
पायऱ्यांत समानता असली तरी
इतिहासात विश्लेषण वा निष्कर्ष
या विभागांत कित्येकदा
पुराव्याने सिद्ध होणारे अनुमान
मनाला, पूर्वग्रहाला पटत नसल्यामुळे
न स्वीकारण्याचा प्रघात
बराच जुना आहे.
त्यामानाने याचे प्रमाण
गणित - विज्ञान इ. शास्त्रांत
अल्प आहे.
इतिहासाचं दुसरं वैगुण्य म्हणजे
इतिहासलेखकाच्या मनोविकारांचा पूर्णतः प्रभाव त्यावर
पडत असतो. परिणामी,
इतिहासाचं विकृतीकर्ण अटळ ठरतं.
हा दोष गणित
- विज्ञानांत आढळत नाही.
इतिहासाचं आणखी एक
वैगुण्य मानलं जातं व
ते म्हणजे ' खरा
इतिहास ' कधीही मांडता येत
नाही वा लिहिला
जाणं शक्य नाही.
इतिहासावरील हा आरोप
चुकीचा आहे असं
म्हणता येत नाही.
याचं प्रमुख कारण
म्हणजे इतिहास हा मानवी
मनोव्यापाराचा खेळ असल्यानं
' अमुक प्रसंगी ती व्यक्ती
अशीच का वागली
? ' वा ' हि घटना
अशीच का घडली
? ' याचं समाधानकारक उत्तर देणं
शक्य नाही. अर्थात,
२ + २ = ४
हे तरी कुठं
सिद्ध करण्यासारखं आहे
? २ या संख्येने
नेमकं काय प्रतीत
होतं ? २ म्हणजे
२ चं कि
अडीच, तीन वा
आणखी काही ?
तात्पर्य, परिपूर्ण असं कोणतंही
शास्त्र नाही. प्रत्येक शास्त्र
मानवरचित असल्याने व ते
त्याच्याच हिताकरता राबवले जात
असल्याने त्यावर मानवी विकारांचा
प्रभाव हा राहणारचं
!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा