मंगळवार, २७ मार्च, २०१८

प्रकरण २०) सम्राट शिवाजी :- काही दुर्लक्षित बाबी



    शिवाजीच्या कर्नाटक स्वारीनंतर संभाजीचे तुर्की गोटात जाणे  काही काळाने परत येणेहि एक शिवचरित्रातील अत्यंत महत्त्वाची  तितकीच गूढ घटना आहे.
    
    संभाजीच्या या वर्तनामागे कारणीभूत असलेले दोन प्रमुख तर्ककारणपरंपरा प्रथम आपण पाहू  त्यानंतर त्याविषयी सविस्तर चर्चा करू.
    प्रथम पक्षाच्या मतेसंभाजीचे एका वैदिक मंत्र्याच्या घरातील तरुणी सोबत प्रेमसंबंध होते किंवा त्याने तिला जबरदस्ती आपल्या महाली खेचण्याचा प्रयत्न केला अथवा तिच्यावर बलात्कार केलाशिवाजीला हि बाब  आवडून त्याची संभाजीवर गैरमर्जी ओढवली  यामुळेच कर्नाटकात जाण्यापूर्वी शिवाजीनेसंभाजीला रायगडा ऐवजी शृंगारपुरी ठेवण्याचा निर्णय घेतला.
    शृंगारपुरी मुक्कामात संभाजीच्या वर्तनात फारसा फरक पडला नाहीतसेच तो शाक्त पंथीयांच्या नादास लागला  त्याने स्वतःस कलशाभिषेक करवून घेतलाशिवाजीला या बाबी पसंत  पडून त्याने कर्नाटकाहुन येते वेळी तसेच रायगडी परतल्यावरही संभाजीची भेट  घेता त्यांस परस्पर सज्जनगडी रामदास स्वामीच्या भेटीस जाण्याची आज्ञा केलीसंभाजी ती आज्ञा प्रमाण मानून सज्जनगडी गेला  तिथून त्याने तुर्की सेनानी दिलेरखानाच्या गोटात प्रयाण केलेवासीबेंद्रेकमल गोखले  त्यांचे समविचारी अपवाद केल्यास बव्हंशी इतिहासकार याच मताचे आहेत.

     त्याउलट बेंद्रेगोखले प्रभूती द्वितीय पक्षाच्या मतेजिजाबाईच्या मृत्यूनंतर संभाजीच्या जिव्हाळ्याचे राजपरिवारात कोणी राहिले नाहीसोयराबाईच्या मनात यावेळी सापत्नभाव जागृत होऊन ती संभाजीचा दुःस्वास करू लागलीतसेच अष्टप्रधानांतील कित्येक मंत्र्यांशीही संभाजीचे खटके उडू लागलेकारण हे मंत्री लबाडअन्यायी वगैरे होतेपरंतु मंत्र्यांचे तसेच सोयराबाईचे शिवाजीवर अतिरिक्त वजन असल्याने संभाजीचा चांगुलपणाही शिवाजीस गैर वगैरे भासू लागला  त्याने कर्नाटक स्वारीपुर्वी त्यास शृंगारपुरी ठेवण्याचा निर्णय घेतला.
    याच काळात दख्खनमध्ये तैनात असलेल्या तुर्की सुभेदार - सेनानी दिलेरखानाने संभाजी सोबत पत्रव्यवहार करून त्याला आपल्या पक्षात मिळवून घेण्याचा प्रयत्न केलापुढे शिवाजी कर्नाटकातून परत आला पण त्याने संभाजीची भेट  घेता त्यास परस्पर सज्जनगडी जाण्यचा आदेश दिलातेव्हा व्यथितनाराज संभाजी सज्जनगडावरून परस्पर दिलेरखानाच्या गोटात रवाना झालायाचा मुख्य आधार म्हणजे अनुपुराण / परमानंदकाव्यम आणि संभाजीचे बाकरे स्वामीस दि२४ ऑगस्ट १६८० रोजी दिलेले दानपत्र.
दोन्ही पक्षांच्या मतांना बळकटी देईल असा एकही अव्वल दर्जाचा पुरावा सध्या तरी उपलब्ध नाही  या सर्व तर्कांचे मूळ माझ्या मतेसभासद बखरीत शिवाजीच्या तोंडी घातलेल्या राज्याच्या वाटणी विषयक संवादात आहेत्यामुळे त्यास फारशी किंमत देता येत नाही.

    संभाजीच्या तुर्की गोटातील आगमनासंबंधी तिसरा एक पक्ष अलीकडे जोर धरू लागला असून संजय सोनवणी याचे अध्वर्यू आहेतत्यांच्या मतेसंभाजीचे तुर्की गोटात जाणे  परत येणे हि एक शिवाजीची राजकीय चाल होतीपरंतु या मताची अजून सैद्धांतिक मांडणी -- सोनवणी वा त्यांच्या समविचारी मंडळींनी अद्यापि केलेली नाही.

    संभाजीच्या तुर्की छावणीतील प्रयाणामागची कारणपरंपरा समजावून घेण्यासाठी आपणांस सर्वप्रथम त्या घटनेच्या मागे - पुढे घडलेल्या राजकीय घडामोडींची दखल घेणे भाग आहे.

    स१६७६ जूनदिलेरखान दख्खनमध्ये दाखल झाला१६७७ च्या सप्टेंबर पर्यंत त्याने दख्खन सुभेदार बहादूरखानाच्या हाताखाली सेनानीचे काम केलेत्यानंतर बहादूरखान हिंदुस्थानात जाताच १६७७ सप्टेंबर ते ऑक्टो१६७८ पर्यंत त्याने दख्खनच्या सुभेदारीचे कामकाज पाहिले.
    दख्खन सुभेदारीच्या काळात दिलेरखानाने विजापुरातील बहलोलखानाच्या  पठाणी पक्षास आपला पाठिंबा देत त्याच्या मदतीने गोवळकोंड्यावर आक्रमण केले.
    दिलेरच्या गोवळकोंडा स्वारीमागील मुख्य कारण म्हणजे शेख मिनहाज  शिवाजीला पकडून तुर्कांच्या ताब्यात देण्यास कुतुबशहाने केलेली टाळाटाळ.
    पैकीशेख मिनहाजने तुर्की सुभेदारला मिळण्याचे वचन देऊन त्याच्याकडून बरेच द्रव्य उकळले  शेवटी कुतुबशहाचा आश्रय घेतलातर शिवाजी या काळात कर्नाटक स्वारीवर असून मोहिमेच्या आरंभी शिवाजी - कुतुब यांच्यात झालेल्या मैत्रीपूर्ण तह तसेच भेटीची चर्चा सर्वदूर झाली होती.
    दिलेरखानाला गोवळकोंडा स्वारीत पदरी अपयश घेऊन माघार घ्यावी लागलीमाघारीचे मुख्य कारण म्हणजे त्याचा प्रमुख मदतनीस विजापुरी बहलोलखानाचा आजारी पडून झालेला मृत्यू. ( डिसें१६७७ )
    
    बहलोलखानाच्या निधनानंतर विजापूरची सूत्रे सिद्दी मसूद या दख्खनी मुसलमानाच्या हाती गेलीदिलेर सोबत मसूदने तह करत तुर्की आक्रमणापासून आपला बचाव साधण्याचा यत्न केलाया बदल्यात शिवाजीसोबत मैत्री  करणेशिवाजीवरील तुर्कांच्या स्वाऱ्यांत मदत करणे  आदिलशहाची बहिण -- शहरबानू बेगम हिचा विवाह औरंगजेबाच्या शहजाद्याशी करणे अटी मसूदने मान्य केल्या.  

    दरम्यान कर्नाटक स्वारीतून शिवाजी आपल्या राज्यात परतला होताबहलोलचा मृत्यू  मसूदचे अधिकारग्रहण या मधल्या काळात विजापुरातील अव्यवस्थेचा फायदा घेत स्वतःच विजापूर ताब्यात घेण्याचा त्याचा बेत होता  त्याने तसा प्रयत्नही केलापरंतु मसूदने बाजी मारल्याने शिवाजीला हात हलवत रायगडी जावे लागले. ( मे १६७८ )

    सिद्दी मसूदने तुर्कांप्रमाणेच शिवाजीसोबतही मैत्रीचा तह करण्याचा प्रयत्न केलाअर्थात हा गुप्त असला तरी दिलेरला त्याची कुणकुण लागून १६७८ च्या ऑक्टोबरमध्ये त्याने विजापूरवर आक्रमण केलेविशेष म्हणजे याच महिन्यात शहजादा मुअज्जम उर्फ शहा आलमची दख्खन सुभेदार म्हणून नियुक्ती होऊन दिलेर आता मुळच्या -- सुभेदाराच्या हाताखालील सेनानीच्या भूमिकेत आला होता.

    दख्खनमध्ये या राजकीय घडामोडी घडत असताना हिंदुस्थानात काय चालले होते ?

    अफगाण प्रांतात बंडाळी असली तरी तेथील स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली होतीत्यामुळे औरंगजेबास एक नवीन उपद्व्याप करण्याची संधी प्राप्त होऊन येथेच त्याच्या अवनतीस एकप्रकारे आरंभ झाला असे म्हणता येईल.

     स१६७८ च्या १० डिसेंबर रोजी खैबरखिंडीतील जामरुडचा तुर्की ठाणेदार  जोधपुरचा महाराज जसवंतसिंग मरण पावलामिर्झा राजाच्या पश्चात जसवंतसिंग तुर्की दरबारातील राजपुतांचा म्होरक्या असल्याने त्याच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या स्थितीचा --- विशेषतः त्याला औरस वारस नसल्याचा फायदा घेत औरंगने जोधपुर राज्याच्या जप्तीचा डाव आखला  यातून तुर्की - राठोड युद्धाची नांदी झालीज्याची समाप्ती जवळपास तीस वर्षांनी झाली.

    औरंगने मारवाडचे राज्य घशात घालण्यासाठी चालवलेला प्रयत्न जसवंतसिंगच्या सरदारांनी --- विशेषतः दुर्गादास राठोडने तलवारीच्या बळावर उधळून लावलात्याला याकामी मेवाडच्या महाराण्याची सक्रीय मदत झालीयामागील मुख्य कारण म्हणजेजसवंतसिंग मरण पावला त्यावेळी त्याची एक राणी गर्भवती असून ती मेवाडची राजकन्याही होतीतसेच मारवाड जिंकल्यानंतर तुर्कांना मेवाडवर स्वारी करणे सोपे जाणार असल्यामुळे राजकारणाची अपरिहार्य गरज म्हणूनही मेवाडकरांना मारवाडकरांच्या मदतीसाठी रणात उतरावे लागले. ( १६७९ अखेरीस )

     राजपूत युद्धास आरंभ होण्याची चिन्हे दिसत असतानाच औरंगने दि एप्रिल १६७९ रोजी राज्यातील गैर इस्लामींवर जिझिया कर लादल्याची घोषणा केली.

    जिझिया कर घोषणेसाठी औरंगने जी वेळ साधलीत्यासंबंधी थोडी चर्चा आवश्यक वाटते
राजपुतांचे यावेळी दोन मुख्य पुढारी होतेप्रथम मेवाडकर राजसिंग तर दुसरा जसवंतसिंगपैकीजसवंतसिंग हा तुर्की गोटातील राजपुतांचा म्होरक्या होत्यातुर्की साम्राज्याची उभारणीसंरक्षणमजबुती वगैरे सर्व काही म्हणजे हे राजपूतच होतअकबरच्या पश्चात जहांगीरपासून औरंगपर्यंत चढत्या क्रमाने तुर्की सम्राटांनी कितीही धर्मवृद्धीचे तसेच परदेशी तुर्की मुसलमानांना येथे आयात करण्याचे धोरण जोरकसपणे राबवले असले तरी राजपुतांच्या समशेरी हाच तुर्की साम्राज्याचा कणा होताराजपुतांची एकप्रकारे निष्ठा आजमावण्यासाठी औरंगने काशी विश्वेशरचा विध्वंस करून पाहिलाधर्मनिष्ठेबद्दल इतिहासकार राजपुतांचा कितीही गौरव करत असले तरी धर्माचे दृश्य प्रतिक समजल्या जाणाऱ्या मंदिरांचा तुर्की सम्राट विध्वंस करत असताना राजपुतांनी धारण केलेली उदासीन वृत्ती त्यांच्या धर्मनिष्ठेवर प्रश्नचिन्हच उपस्थित करते.   

    या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपणांस प्रथमतः काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे :-
(हिंदू  वैदिक हे दोन स्वतंत्र धर्म होत.
(वैदिक येथे दक्षिण अफगाणिस्तानातून आश्रायार्थ आले होते.
(वैदिक धर्मधर्मप्रसार  धर्मान्तरामुळे येथे आजतागायत जिवंत राहिला आहे.
(वैदिक धर्मात प्रवेशलेल्या हिंदू धर्मगुरूपुजारीगुरव नी आपल्या मूळ धर्मतील व्यवसायांचा त्याग  करता ते तसेच सुरु ठेवलेत्यामुळे लोकांमध्ये हिंदू - वैदिक हा धार्मिक भेद नसून वैदिक हा हिंदू धर्मांतर्गत पंथ असल्याची भावना प्रचलित झाली.
(राजपूत हे मूळ सिथियन शकइथे आक्रमाकाच्या स्वरूपात आले  इथेच स्थायिक झालेत्यांनी येथील हिंदूंची लिंग स्वरूपात शिव तसेच प्रतिमा स्वरूपात शक्तीची उपासना पद्धती स्वीकारली.
(सिथियन शकांनी येथील हिंदूंची उपासना पद्धती स्वीकारली असली तरी त्यांनी येथील धर्माचा स्वीकार केला का ?  केला असल्यास कोणत्या ? हे प्रश्न माझ्या दृष्टीने अद्यापही अनुत्तरीत आहेतकारणराजपुतांच्या उपासना पद्धतीवरून त्यांना उर्वरित जग हिंदू समजत असले तरी ते स्वतःला तसे  समजता वैदिक क्षत्रिय समजतातआणि वैदिक धर्मात यांनी अधिकृतपणे प्रवेश केल्याचे निर्विवाद सिद्ध करणारा पुरावा माझ्या तर दृष्टीस पडलेला नाही.
(राजपूत स्वतःला वैदिक धर्मीय समजत असल्यामुळेच तुर्की औरंगने येथील हिंदूंची मंदिरे पाडलीजिझिया कर लादला तरी त्यांनी त्याचा विरोध केला नाही वा त्यास त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही केला नाही.

    दुर्गादासच्या नेतृत्वाखाली राठोडांनी औरंगविरुद्ध बंडाचा झेंडा उभारलातो मृत जसवंतसिंगची गर्भवती पत्नी प्रसूत होऊन तिच्या पोटी पुत्र -- अजितसिंग जन्मल्या नंतरते देखील औरंगने त्याचा वारसा मान्य करण्याच्या बदल्यात त्यास आपल्या अंतःपुरात वाढवण्याची अट मांडल्यामुळे.
म्हणजे जिझिया आकारणी किंवा हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस या गोष्टी राजपुतांच्या तुर्की सम्राट विरोधी लढ्यास बिलकुल कारणीभूत नाहीत.
ज्ञात इतिहासात जिझिया कर आकारणी विरोधात फक्त शिवाजीनेच औरंगला पत्र पाठवून आपला निषेध नोंदवल्याचे नमूद आहे.

    आता आपण दख्खनमधील शिवाजी - संभाजीच्या याच काळातील हालचाली पाहू.
    स१६७८ च्या मे मध्ये शिवाजी कर्नाटकातून रायगडी दाखल झालामार्गात येते वेळेस किंवा रायगडावरील मुक्कामात त्याने संभाजीची भेट घेतल्याचे वा भेटीस बोलावल्याचे नमूद नाही.
    स१६७६ च्या अखेरीपासून ते १६७९ च्या अखेरपर्यंत म्हणजे -- जवळपास तीन वर्षे राज्याच्या युवराजाची छत्रपती भेट घेत नाहीहि खरोखर आश्चर्याची  तितकीच गूढ बाब आहेपैकीशिवाजीच्या कर्नाटक स्वारीतील काळ जरी वजा केला तरी १६७८ एप्रिल ते डिसेंबर -- साधारण सात आठ महिने पिता - पुत्रांची गाठ नसावीयामागील कारण काय असावे ?

    शिवाजीच्या गैरहजेरीत संभाजी शृंगारपुरास अघोरी तांत्रिकांच्या आहारी गेलातुर्कांशी त्याने संधान बांधले किंवा दिलेरखानाने आपणहून त्याच्याशी पत्रव्यवहार करत त्याला आपल्या पक्षास वळवून घेण्याचा प्रयत्न केला असे म्हणावे तरयुवराज पदावरील व्यक्तीच्या गैरवर्तनाविरुद्ध शिक्षा करण्यास शिवाजीला मे - डिसेंबर इतका वेळ का लागला ? या अवधीत संभाजी त्याच्या पकडीत होतापळून जावे म्हटले तरी त्यास शक्य नव्हतेअसे असतानाही शिवाजी त्याला अटक करत नाहीउलट परळीगडावर -- जो राज्याच्या सीमेवर आहे -- अशा ठिकाणी जाण्याची आज्ञा का करतो ?
    संभाजीला दिलेरखानाच्या गोटातच जायचे होते तर कर्नाटक स्वारीतून शिवाजी परत येईपर्यंत  त्याला परळीगडाकडे जाण्याची आज्ञा देईपर्यंत तो वाट बघत का बसला ? राज्याची त्याला अभिलाषा होती म्हणावे तर शिवाजीच्या गैरहजेरीत त्याला राज्य ताब्यात घेण्याची अत्युत्कृष्ट संधी होतीयाकरता तुर्क अथवा विजापूरकोणतीही सत्ता स्वखुशीने त्याच्या मदतीस आली असतीअसे असतानाही तो शिवाजी परत येईपर्यंत स्वस्थ का बसून राहतो ?
    
    सावत्र आई  मंत्र्यांच्या भीडेमुळे बाप आपल्यावर अन्याय करतो अशी जर संभाजीची समजूत असेल तर त्याची प्रतिक्रिया म्हणून तुर्की गोटात जाणे समजून घेता येऊ शकतेपरंतु तिथेही एक अडचण आहे.
    
    स१६६५ - ६६ - ६७ या तीन वर्षांत तीन वेळा तुर्की मनसबदार म्हणून संभाजीचा तुर्की दरबारात प्रवेश झाला होतायावेळी त्याचे अल्पवय असले तरी शिवाजीने त्याच्या शिक्षणाची केलेली व्यवस्था  तत्कालीन राज्यांची जवळपास एकसारखी प्रशासकीय पद्धती लक्षात घेता१६७८ मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी मर्यादित अधिकारांचे का होईना पण स्वतंत्र असे युवराजपद सोडून मनसबदारी सारख्या अवनत स्थानी जाण्याची अवदसा त्यांस का सुचावी ? तुर्कांची मनसबदारी म्हणजे काय असते हे १६७६ मध्ये रायगडी परतलेल्या नेताजी पालकर कडून त्यास कळले नसेल का ? खुद्द शिवाजीच्या दरबारातील मनसबदारांना कितपत वर्तन स्वातंत्र्य होतंहे प्रतापराव गुजराच्या उदाहरणावरून संभाजीच्या लक्षात आले नसावे का ?

    सारांशस्वतंत्र राज्याच्या युवराजपदाचा मर्यादित अधिकार सोडून कसलेही वर्तनस्वातंत्र्य नसणाऱ्या सप्तहजारी तुर्की मनसबीकरता केवळ बापावरील नाराजीमुळे संभाजी दिलेरखानाच्या गोटात गेलाहे संभवत नाहीशिवायशिवाजी - संभाजी यांची परस्परांवरील नाराजीगैरमर्जी हि केवळ उभयतांची बराच काळ  घडलेल्या भेटीतून जन्माला आलेली कथा आहेतिला अव्वल पुराव्यांचा कसलाही आधार नाहीअसो.

    स१६७८ च्या मे महिन्यात शिवाजी कर्नाटक मोहीम संपवून रायगडी येऊन दाखल झाला.
१६७८ ऑक्टोबर मध्ये शहजादा मुअज्जम उर्फ शहा आलमची दख्खन सुभेदार म्हणून नियुक्ती होऊन १६७९ च्या फेब्रुवारी - एप्रिल दरम्यान तो औरंगाबादेस अधिकारपदावर रुजू झाला.
१६७८ ऑक्टोबरमध्ये दिलेरखानाने औरंगजेबाच्या आदेशावरून विजापूर विरुद्ध मोहीम आरंभली.
१६७८ ऑक्टोबरमध्येच शिवाजीने संभाजीला परळीगडाकडे जाण्याचा आदेश दिला.

    यावेळी  शिवाजीचा मुक्काम कुठे होता याची विश्वसनीय माहिती मिळत नाहीपसासं ले२०७१ या राजापूरकर इंग्रजांच्या सप्टेंबर महिन्यातील नोंदीनुसार शिवाजी पन्हाळ्याला येणार असल्याचा उल्लेख आहेपरंतु शिवाजी पन्हाळ्यास आल्याची नोंद मिळत नाहीशककर्ते शिवरायच्या देशमुखांनी बहुधा याच नोंदीचा आधार घेत आपल्या शिवचरित्रातसप्टेंबर महिन्यापासून शिवाजी पन्हाळ्यावर ठाण मांडून बसला होताअशा आशयाचं विधान ठोकून दिलं आहेपण मग शृंगारपुराच्या एवढ्या नजीक येऊनही शिवाजीसंभाजीला आपल्या भेटीस का बोलवत नाही ? हा प्रश्न त्यांना पडला नाहीअसो

    दि नोव्हेंबर १६७८ रोजी परळी गडावरून संभाजीने सदानंद गोसाव्याच्या इनामाविषयी अण्णाजी दत्तोसं लिहिलेलं पत्र उपलब्ध आहेत्यान्वयेसदर इनामाचा मामला त्याने पूर्णतः अण्णाजीवर सोपवल्याचे दिसून येते.
दि डिसेंबर १६७८ रोजी संभाजी परळी गडावरून दिलेरखानाकडे निघून गेला.
दि१३ डिसेंबर १६७८ रोजी संभाजी - दिलेरखानाची बहादूरगड ( पेडगाव ) जवळ करकंब गावी भेट झाली.

    संभाजीला तुर्की गोटात वळवून घेण्यास दिलेरखानाने १६७७ सप्टेंबर ते १६७८ डिसेंबर पर्यंत प्रयत्न केले असे म्हणता येईलकारण या काळात तो दख्खनचा सुभेदार होता  शत्रूपक्षीयांना फोडण्याचे त्यास औरंगचे आदेशही होते. या अनुषंगाने उद्भवणारा एक प्रश्न म्हणजेदिलेरखान केवळ संभाजीकडेच प्रयत्न करून राहिला असेल का ? ज्या व्यक्तीला शत्रूराज्यात फितूर माजवायचा आहेतो एकाच ठिकाणी गळ टाकून स्वस्थ बसून राहणार नाहीशृंगारपूर खेरीज रायगड तसेच इतरत्रही दिलेरने प्रयत्न केलेच असणारपरंतु त्यांची चर्चा होताना दिसत नाहीअसो

    प्रश्न असा आहे किदिलेर - संभाजीचे सूत्र केव्हा जुळले असावे ? अव्वल पुराव्यांच्या अनुपलब्धतेत याचे उत्तर संभाजीचे शृंगारपुर - परळीगडावरील वास्तव्य हेच द्यावे लागेल.
    संभाजी - दिलेरखान यांच्या गुप्तपत्रव्यवहार वा कारस्थानाची शिवाजीला कल्पना होती का ?
याचे उत्तर निश्चितच होकारार्थी देता येतेयाकरता प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध नसले तरी अप्रत्यक्ष पुरावे भरपूर आहेत.
    गैरमर्जी वा नाराजीस्तव शिवाजीने संभाजीला शृंगारपुर तसेच परळीगडावर ठेवले असो कि एकमताने त्यांनी हा निर्णय घेतला असोपरवाने असल्याशिवाय परराज्यातील व्यक्ती शृंगारपुर वा परळीगडासारख्या स्थळी थेट प्रवेशु शकत नाहीरस्त्यात अनेक चौकी - पहारे असतात.
    शिवाजीच्याच राज्यातील व्यक्तीमार्फत असे गुप्त सूत्र जुळू शकतेपरंतु तिथेही अडचण आहेजर शिवाजीची संभाजीवर गैरमर्जी आहे असे क्षणभर गृहीत धरले तर .. त्याच्याभोवती हेरांचे जाळे विणल्याविना शिवाजी राहिला असेलअसे म्हणवत नाहीम्हणजेच कोणत्याही स्थितीतदिलेर - संभाजी सूत्र शिवाजीपासून लपून राहू शकत नाही.
    संभाजी शाक्त पंथीयांच्या नादाला लागल्याने शिवाजी त्यावर नाराज झाला असाही एक मतप्रवाह प्रचलित आहेपरंतु यात कसलेही तथ्य नाहीतंत्र हे हिंदूधर्माचे एक अभिन्न अंग असून तंत्रांना बदनाम करून वैदिकांनी त्यावर आपल्या धर्माचे कलम केलेज्यामुळे हिंदू धर्म वैदिक धर्म वर्चस्वाखाली जाऊन आपले मूळ स्वरूप बऱ्याच अंशी गमावून बसला आहे.
    शृंगारपुरी संभाजीने जो स्वतःस कलशाभिषेक करवून घेतला त्यास शिवाजीची अनुज्ञा अत्यावश्यक होतीकारणशिवराज्याभिषेकानंतर दि फेब्रुवारी १६७५ रोजी मुंज होऊन संभाजीचा रीतसर वैदिक धर्मात प्रवेश होऊन त्यास क्षत्रिय वर्णाची प्राप्ती झाली होतीअशा स्थितीत तंत्र कलशाभिषेक करणे म्हणजे वैदिक क्षत्रियत्व सोडून हिंदू धर्मात पुनः प्रवेश करण्यासारखे होते  या करता शिवाजीची संमती आवश्यक आहेतसेच कलशाभिषेक करताना जी सामग्री लागली ती परस्पर संभाजीने प्राप्त केल्याचे उल्लेख वा आरोप नाहीतयावरून हि सामग्रीही शिवाजीने त्यास पुरवण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे गृहीत धरावे लागते.
     
    शिवाजीचा तांत्रिक राज्याभिषेक  संभाजीचा कलशाभिषेक या दोन घटना वैदिक वर्चस्ववादास धक्का देणाऱ्या होत्यायानंतरच वैदिकांनी शिवाजीविशेषतः संभाजीव्र कटाक्ष ठेवल्याचे दिसून येतेकारण संभाजीने तंत्रातील जाणकार म्हणून कवी कलशला सोबत बाळगून त्यास उच्च पद नंतरच्या काळात दिले होतेयामुळेच बखरकार -- जे प्रामुख्याने वैदिकच होत -- संभाजी तांत्रिक अनाचारात गुंतल्याचे लिहितात  त्याचीच री पुढे वैदिक तसेच वैदिकधार्जिण इतिहासकारांनी ओढल्याचे दिसून येते.

    संभाजीने शृंगारपूर सोडून परळीगडावर जाऊ राहावेहि शिवाजीची आज्ञाही अभ्यासकांना गोंधळात टाकणारी आहेजर असे गृहीत धरले किसंभाजीवर शिवाजीची गैरमर्जी झाली आहे  त्याच्या तुर्की गोटातील खटपटींचीही शिवाजीस कल्पना आहे तर शृंगारपुर सारखे ठिकाण सोडून तो संभाजीलासरहद्दीवरील परळीगडाकडे कशाला पाठवेल ? उलट या आज्ञेमुळे संभाजीला पळून जाणे अधिक सुलभ होणार होतेहे शिवाजीला समजत नव्हते काय ! तेव्हा याचेही उत्तरशृंगारपूर ते परळी हा पिता - पुत्रांचाच पूर्वसंमत बनाव होता असेच म्हणावे लागते.
    बाकीगृहकलह तोडण्याकरता शिवाजीने रामदासाकडे संभाजीला पाठवले असे म्हणणे मूर्खपणाचेच ठरेलकारणगृहकलह अशा उपायांनी  तुटता प्रत्यक्ष भेटीगाठींनीच संपुष्टात येऊ शकतोहे काय शिवाजीला माहिती नव्हते ? तसेच गृकलह होता असे जरी गृहीत धरले तरी एकट्या संभाजीला रामदासाकडे पाठवून गृहकलह कसा काय तुटणार होता ? गृहकलहात एकाहून अधिक पक्ष असतात  इथे सोयराबाई - संभाजी हे दोन पक्ष गृहीत धरले तर शिवाजी सोयराबाईला परळीच्या किल्ल्यावर का पाठवत नाही किंवा स्वतः घेऊन जात नाही ?
    परळीच्या किल्ल्यावर संभाजीचा महिनाभर मुक्काम होताया अवधीत ना शिवाजी तिकडे फिरकला ना संभाजीचे प्रतिस्पर्धी म्हणून इतिहासात वारंवार निर्दिष्ट केले जाणारे मंत्रीगण  सोयराबाईतेव्हा गृहकलहरामदासाची मध्यस्थी या गोष्टी सर्वथैव त्याज्यच मानल्या पाहिजेत.     

दिलेरखानाच्या गोटात जाण्यासाठी संभाजीने तारीख निवडली दि१३ डिसेंबर १६७८या दिवशी तो परळीगडावरून नजीकच्या माहुली संगमावर जाण्यास निघाला  तिथे गेल्यावर धर्मकृत्य आटोपून किल्ल्यावरून सोबत आलेल्या नोकरांना आपण तुर्की गोटात जात असल्याचे सांगत परत पाठवले  तो स्वतः माहुली जवळ आलेल्या दिलेरच्या माणसांसह निघून गेला.
परळीगडावरील लोकं महुलीवरून परतली  त्यांनी किल्लेदारास वृत्तांत सांगितलात्यावेळी संभाजीच्या पाठीवर किल्ल्यातून एक तुकडी रवाना करण्यात आलीसंभाजीने दिलेरकडे निरोप पाठवून मदत मागितलीतेव्हा याने इखलासखानास चार हजार स्वारांसह मदतीसाठी पाठविलेउभयतांची भेट सुप्याच्या अलीकडे चार कोसांवर झालीसंभाजीच्या सोबत असलेला तुर्की सैन्याचा मोठा जमाव पाहून परळी गडावरील शिबंदी मागे फिरलीयानंतर इखालास सोबत संभाजी दिलेरच्या भेटीस पेडगावी निघालातिकडून दिलेर त्यास पुढे येऊन करकंब येथे भेटलाइथेच संभाजीला सप्तहजारी मनसबदारी प्राप्त झाली.

    संभाजीच्या तुर्की गोटात जाण्याचा हा संक्षिप्त वृत्तांत ' शककर्ते शिवराय ' मधून येथे घेतला आहेथोड्या फार फरकाने हीच माहिती संभाजीच्या अधिकृत चरित्रांतही आढळतेया सर्वांची येथे चिकित्सा  करता केवळ संभाजीच्या पलायनाची येथे चर्चा करायची आहे.

    राज्याचा युवराज परळीगडासारख्या सरहद्दीवरील किल्ल्यात मुक्कामाला असतो आणि त्यासोबत अतिरिक्त फौजअंगरक्षकांची हजार पाचशे सैनिकांची तुकडी असत नाहीहे थोडं संशयास्पद नाही का ? माहुलीपासून पेडगावचे अंतर साधारणतः सव्वाशे किलोमीटर्सच्या आसपास आहेस्वार आणि पायदळ मिळून हे अंतर कापायला कितीही जल्दी केली तरी दोन ते तीन दिवस लागणारम्हणजेच परळीगडावरील शिबंदी जरी संभाजीच्या पाठीवर आली तरी पेडगावास बातमी पोहोचून चार हजार स्वर तयार होऊन सुप्याच्या पुढे येण्यास एकदीड दिवस सहज खर्ची पडणारअर्थातपरळीवरून निघाल्यापासून संभाजी किमान एक दीड दिवस अल्प सैनिकांमुळे तसा असंरक्षितच होतातरीही पाठीवर असलेल्या मराठी सैन्याने त्यास घेरले नाही   इखलास सोबत संभाजीची हातमिळवणी झाल्यावर ते मागे फिरलेहा घटनाक्रम लक्षात घेणे आवश्यक आहे.

    खेरीज संभाजी सोबत तुर्की गोटात कोण गेले हे पाहणे देखील येथे भाग आहे.
बव्हंशी इतिहासकारांच्या मते संभाजी सोबत त्याची दुसरी पत्नी दुर्गाबाई  एक बहिण तुर्की गोटात गेली होतीपरंतु इथेही काही शंकास्थळे आहेत.

    संभाजीचा द्वितीय विवाह कधी झाला याची माहिती मिळत नाहीज्ञात इतिहासात येसूबाईहि एकच संभाजीची पत्नी असल्याचे नमूद आहेमग हि दुर्गाबाई कोण ? उपस्त्रीजी आपली विवाहित स्त्री असल्याचे संभाजीने तुर्कांना खोटेच सांगितले कि.... तुर्की छावणीत असताना तुर्कांचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून खरोखर विवाह करून अंतःपुरात दाखल करून घेतलेली स्त्री ? याचा उलगडा होण्यास अव्वल दर्जाचे साधन नाही.

    या संदर्भात ' ऐतिहासिक फार्सी साहित्य सहावा खंड : औरंगजेबाच्या दरबारचे अखबार ' मध्ये दि२७ नोव्हेंबर १६८१ रोजीची नोंद आहेती पुढीलप्रमाणे :- रुहुल्लाखानाने अर्ज केला कीअहमदनगरचा किल्लेदार मुकीमखान याने मला लिहिले ते असे -- ' सीवाचा मुलगा संभा याची एक बायको  बहिण यांना पूर्वी दिलेरखानाने कैद केले होतेत्यांना ह्या किल्ल्यात ठेवले आहेम्हणून शत्रूचे लोक ह्या किल्ल्याभोवती आलेत्यांचा त्यांना किल्ल्यातून बाहेर काढण्याचा विचार आहेमाझ्या बरोबर लोक थोडे आहेतयाबाबत हुकुम व्हावा. ' हुकुम झाला कीउपर्युक्त खानास त्याने खातरजमा ठेवून सावध असावेअअजमशहाने सय्यिद मुनव्वरखानास तुझ्या कुमकेसाठी नेमले आहेतो पोहोचेलच असे लिहावे. " लेक्र२७६ )
येथे स्पष्टपणे संभाजीची पत्नी  बहिण असा उल्लेख असून त्यांना दिलेरखानाने पकडल्याचे म्हटले आहेपरंतु दिलेरने त्यांना पकडले कधी ? कारण याच ग्रंथातील लेक्र१३३१३५ मध्ये दिलेरखानाच्या गोटातून संभाजी पळून गेल्याचा उल्लेख येतो परंतु त्याची पत्नी  बहिण यांना दिलेरखानाने अटक केल्याचा उल्लेख येत नाहीतसेच लेक्र१३५ - २७६ दरम्यान एकाही नोंदीत दिलेरने संभाजीच्या पत्नी वा बहिणीला अटक केल्याचा उल्लेख नाही.

    दुर्गाबाई हि संभाजीची उपस्त्री असावीहा तर्क  पुराव्याच्या कसोटीवर टिकण्यासारखा नाहीकारणजर दुर्गाबाई संभाजीची उपस्त्री असती तर तिच्या सुटकेसाठी संभाजीला अर्जोजी  गिरजोजी यादव बंधूंची योजना करण्याचे काहीच कारण नव्हते.
    त्याचप्रमाणे दुर्गाबाई हि संभाजीची पत्नी असावी हा तर्क देखील पुराव्याशिवाय स्वीकारणे अवघड आहेकारण क्षणभर असे गृहीत धरले किदुर्गाबाई हि संभाजीची पत्नी होती तर मग पुढील काळात तिच्या वंशजांचे -- मदनसिंह तसेच त्याच्या मुलांचे काय झाले ? हा प्रश्न उद्भवतोचशिवाय येसूबाई सोबत मदनसिंह जेव्हा साताऱ्यास आला त्यावेळी सातार दरबारात त्याचे काय स्थान होतेहे प्रश्न देखील उद्भवतात  त्यांची उत्तरे देण्याइतपत पुरावा सध्यातरी उपलब्ध नाहीअसो.

    औरंगजेबाच्या अटकेत असलेल्या संभाजीच्या बहिणीचा उल्लेखही संशयास्पद आहेसंभाजीला तीन सख्ख्या तर तीन सावत्र बहिणीपैकी सईबाईच्या तीन मुली :- सकवार उर्फ सखुबाईराणूबाई  अंबिकाबाई
सखुबाईचा विवाह फलटणकर निंबाळकर घराण्यात झालाअंबिकाबाई हारजी महाडिकला दिली होती तर राणूबाई जाधव घराण्यात.
संभाजीच्या सावत्र बहिणी :- सकवार बाईची मुलगी कमलाबाईहिचा विवाह नेताजी पालकरच्या मुलासोबत झाला.
सगुणाबाईच्या मुलीला गणोजी शिर्क्यास दिलेतिचे सासरचे नाव राजकुंवर.
सोयराबाईला बाळाबाई उर्फ दीपाबाई नावाची मुलगी होतीजी विसाजीरावास देण्यात आली.
प्रश्न असा आहे किसंभाजीच्या या सहा बहिणींपैकी कोणती बहिण त्याच्या सोबत दिलेरखानाच्या गोटात गेली होती ?
संभाजीच्या उपरोक्त सहाही बहिणी विवाहित होत्यायांपैकी एक जरी संभाजी सोबत दिलेरच्या गोटात गेली म्हणावे तर तिचा मुक्काम प्रथम शृंगारपुरास असणे गरजेचे आहेतेथून परळीगड  मग तुर्की गोटपरंतु असा एकही उल्लेख उपलब्ध साधनांत आढळत नाही.
बरंशिवाजी - संभाजी दरम्यान काही कटुता होती  त्याकरता मध्यस्थ म्हणून त्याची कोणती तरी एक बहिण शृंगारपुर वा परळीच्या किल्ल्यावर गेली म्हणावी तर तशीही सोय नाहीकारणएकतर संदर्भ ग्रंथांत अशा प्रकारची नोंद आढळत नाही दुसरे असे किआपली मुलगी तुर्की कैदेत पडली आहे म्हटल्यावर तिच्या सुटकेसाठी शिवाजीने नक्कीच प्रयत्न केले असतेखेरीज तिच्या सासरची मंडळीही गप्प बसली नसती.
यावरून संभाजीची बहिण म्हणून दिलेरने भलत्याच स्त्रीला अटक केली असावी असे म्हणता येतेअथवा संभाजीही एखाद्या स्त्रीला आपली बहिण बनवून तुर्की गोटात घेऊन जाऊ शकतोपण तरीही प्रश्न उरती कितुर्की छावणीत जाताना सोबत बहिणीचे काय काम ? यावरून मुळातच संभाजीने आपली बहिण म्हणून कोणतीही स्त्री तुर्की गोटात सोबत नेली नव्हती याच तर्कावर विसंबून राहणे भाग आहे.

    आता प्रश्न असा पडतो किसंभाजीने तुर्की गोटात जाऊन नेमके काय साध्य केले ?

दि१३ डिसेंबर १६७८ रोजी संभाजी परळीगडावरून दिलेरच्या छावणीकडे गेला.
दि एप्रिल १६७९ रोजी दिलेर - संभाजीने खानापूर - खरसुंडी जवळचा भूपाळगड जिंकून जमीनदोस्त केला.
याच महिन्यात तुर्की - आदिल जोडसैन्य तिकोट्याजवळ शिवाजी विरुद्ध लढायला जमा झाले होते तर सांगोल्याजवळ शिवाजीची सात आठ हजार फौज यांच्या प्रतिकारार्थ सज्ज होतीपरंतु उभयतांचा सामना यावेळी घडून आला नाही.
१६७९ च्या पावसाळ्यात दिलेरखानाने चढाईचा धाक दाखवत मसूदखानास आदिलशहाची बहिणशहरबानू हिला तुर्की शहजाद्यासोबत लग्न करण्यासाठी दिल्लीला रवाना करण्यास भाग पाडलेखेरीज पावसाळ्यात विजापुरी सरदारांना फितवून आपल्या पक्षास मिळवून घेत १६७९ च्या १८ ऑगस्ट रोजी भीमा ओलांडून विजापुरी प्रदेशावर आक्रमण केले.
सप्टेंबर १६७९ मध्ये दिलेरखानाने मंगळवेढा जिंकून घेत विजापुरास वेढा घालण्यास आरंभ केला.      
नोव्हेंबर मध्ये दिलेरखानाने विजापूरचा वेढा उठवला  परतीच्या मार्गातून दि. २० - २२ नोव्हेंबर रोजी संभाजी दिलेरच्या छावणीतून पळून प्रथम विजापुरास  तेथून डिसेंबर आरंभी पन्हाळ्यास निघून गेला.

    एकूण घटनाक्रम लक्षात घेता सारांशासह निघणारा निष्कर्ष पुढीलप्रमाणे :- 
    बहादूरखानाच्या पश्चात दख्खनची सुभेदारी आलेला दिलेरखान शिवाजीच्या गैरहजेरीचा उपयोग करत काही ना काही उपद्व्याप करणार हे निश्चित. राजाच्या राज्यातील अनुपस्थितीट शत्रूला फितण्यासारखे मुख्य महत्त्वाचे घटक म्हणजे राजपरिवार आणि मंत्रीगण.
    शिवाजीच्या राज्यातील अनुपस्थितीत राजपरिवारात संभाजी सोडल्यास कोणी पुरुष नव्हता. महत्त्वाचे सेनानी कर्नाटक प्रांती असल्याने स्वराज्यात ठिकठिकाणी मोहिमांवर, सुभ्यांवर तैनात अधिकारीच दिलेरखानाचे भक्ष्य ठरू शकत होते. दिलेरखानाने संभाजी सोबत संधान बांधल्याचे दुय्यम दर्जाचे पुरावे आज आपल्यासमोर आहेत. परंतु रायगड वा इतरत्र त्याने केलेल्या प्रयत्नांची आज आपणाकडे कसलीही माहिती नाही. असो.

    स. १६७८ च्या आरंभी शिवाजी घाईघाईने कर्नाटक मोहिमेतून परत स्वराज्यात दाखल होतो. यामागे दोन मुख्य कारणं संभवतात. (१) दिलेरखान दख्खन सुभेदार बनणे (२) विजापूर ताब्यात घेण्याची संधी साधणे. पैकी, दुसरं कारण अधिक सयुक्तिक वाटते. कारण, बहलोलखानाच्या मृत्यूनंतर विजापुरात निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीचा फायदा घेत विजापूर ताब्यात घेण्याचा शिवाजीने प्रयत्न केला होता परंतु त्यात अपयश आल्याने तो रायगडी निघून गेला.

    स. १६७८ चा पावसाळा विजापूरसाठी निर्णायक ठरणार होता. शिवाजी आणि तुर्की दिलेर, हे दोघेही विजापूरचा घास घेण्यास टपून बसले होते.
    साधनसामुग्रीचा विचार केला तर कित्येक महिने वेढा घालून विजापूर जिंकण्याची दिलेरची क्षमता होती. त्याउलट शिवाजीला एकाच आघाडीवर फार काळ गुंतून पडणे शक्य नव्हते. त्यामुळे आकस्मिकरित्या घाला घालून तसेच राजकीयदृष्ट्या आदिलशाहीला एकाकी पाडून तिचा नाश करण्याची शिवाजीला योजना आखणे भाग होते.

     स. १६७८ चे सबंध वर्ष याच तयारीत जात असताना वर्षाखेरीस एक घटना घडते. संभाजी दिलेरखानाच्या गोटात निघून जातो. वरवर पाहता हि आकस्मिक घडलेली घटना असली तरी यामागेही एक योजना असल्याचे दिसून येते.
    
    शिवाजी कर्नाटक स्वारीत गुंतला त्याचवेळी दिलेर - संभाजीच्यात पत्रव्यवहार सुरु झाला होता. परंतु शिवाजी राज्यात येईपर्यंत, आपल्या गैरहजेरीतील व विद्यमान राजकारणाची माहिती घेऊन आपल्या नव्या डावपेचांची आखणी करेपर्यंत संभाजी शांत राहतो. नंतर अचानक शिवाजी, संभाजीला शृंगारपुराहून परळीच्या किल्ल्यावर जाण्याची आज्ञा करतो. राज्याचा युवराज सरहद्दीवरच्या किल्ल्यावर बरोबर फारसा फौजफाटा न घेता निघून जातो. तिथे एक महिना संभाजीचा मुक्काम असतो. संभाजी फितूर असला तरी प्रत्यक्ष तुर्की गोटात जाण्यासाठी तो वाट बघत बसलेला असतो. पण कशाची ?

     दिलेरखानाच्या तात्पुरत्या सुभेदारीची मुदत भरून त्या जागी आता शहजादा मुअज्जमची दख्खन सुभेदार म्हणून नेमणूक झाली होती व तो दख्खनच्या वाटेवर होता. शहजाद्याचे आगमन निश्चित झाल्यानंतर संभाजी परळीगड सोडून दिलेरखानाकडे निघून जातो.

     संभाजी दिलेरच्या गोटात आला त्यावेळी दिलेर विजापुरावर चालून जाण्याच्या बेतात होता. त्यादृष्टीने सैन्याची मांडणीही झाली होती. विजापूरचा मुख्य सूत्रधार सिद्दी मसूद यामुळे घाबरून जाऊन त्याने शिवाजी तसेच आदिलशाहीच्या इतर मित्र राज्यांकडे, जहागीरदारांकडे मदतीची याचना केली. इतरांप्रमाणेच शिवाजीने आर्थिक, लष्करी मदतीचा पुरवठा आदिलशाहीस केला. यावेळी संधी साधून विजापूर शहर, किल्ला ताब्यात घेण्याचा शिवाजीचा बेत होता. त्याचे सैन्य विजापुरजवळील दौलतपूर ( खवासपूर ), खुसरावपूर, जहरपुर इ. उपविभागात शिरून लुटालूट करू लागले. धास्तावलेल्या सिद्दी मसूदने दिलेरकडे मैत्रीचा हात केला. तेव्हा दिलेरखानाने  सांगली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र खरसुंडी जवळील भूपाळगडावर हल्ला चढवला. ( एप्रिल १६७९ )

    तुर्की फौजा भूपाळगडावर चालून गेल्याची बातमी शिवाजीला मिळून तो किल्ल्याच्या बचावासाठी सुमारे पंधरा - सोळा हजारांची फौज पाठवतो. परंतु अतिरिक्त कुमुक येण्यापुर्वीच भूपाळगड शरणागती स्वीकारतो. दिलेरखानाने हा किला एका दिवसाच्या चढाईत वा काही दिवस वेढा घालून काबिज केला याविषयी माहिती मिळत नाही. तरीही किल्ल्याच्या बचावासाठी दहा - पंधरा हजारांची मोठी सेना तिथे येते याचा अर्थ, भूपाळगडावरील हल्ल्याची योजना यापूर्वीच शिवाजीकडे कळवण्यात आली होती, असाच होतो. भूपाळगड ताब्यात आल्यावर युद्ध कैद्यांबाबत दिलेरने आपले तुर्की धोरण अवलंबले. ज्यामध्ये कैद्यांचे हात तोडणे, गुलाम म्हणून विकणे इ. अंतर्भाव होतो. आपल्याच शिपायांना, प्रजेला दिलेर देत असलेली शिक्षा, केवळ आपल्या उद्दिष्टप्राप्ती करता संभाजीला निमूटपणे पाहावी लागते.  
    भूपाळगड हा तितकासा बळकट किल्ला नसल्याने दिलेरखान तो उध्वस्त करतो व तीकोटा येथे आदिलशाही फौजेसोबत हातमिळवणी करतो. यावेळी त्यांचे लक्ष्य असते शिवाजीचे राज्य !
     सांगोल्याला शिवाजीच्या सैन्यातील काही पथके तुर्की - आदिल जोडसैन्याच्या तोंडावर उभी राहतात. परंतु उभय पक्षांचा सामना न होता पावसाळी छावणीसाठी सर्वजण आपापल्या मुख्य तळाकडे परततात.

    स. १६७९ चा पावसाळा पुढील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. दिलेरच्या गोटात संभाजी, सर्जाखानसारखे मुत्सद्दी, लढवय्ये जमलेले असतात. जे अनुक्रमे शिवाजी, आदिल सत्तेतील फितूर असतात. मसूदने तुर्कांशी मैत्रीचे धोरण स्वीकारले असल्याने पावसाळ्यानंतर शिवाजीवर चालून जाण्याच्या बेतात दिलेरखान असतो. संभाजी त्याला पन्हाळ्याचे आमिष दाखवतो. पन्हाळाच का ?

    पन्हाळ्यावर अलीकडच्या काळात शिवाजीने विशेष मजबुती चालवलेली असते. तसेच याच सुमारास कोकणात इंग्रज - सिद्द्यांसोबत शिवाजीचा झगडा जुंपण्याची चिन्हे दिसू लागतात. अशा वेळी पन्हाळा ताब्यात घेऊन कोकणात उतरण्याचा मार्ग ताब्यात घेण्याचा मोह दिलेरला न झाला तर आश्चर्य ! परंतु पुन्हा कुठेतरी सूत्रे फिरवली जातात.
     सर्जाखान मसूदची आज्ञा पाळण्यात कुचराई करतो. त्यामुळे प्रस्तावित शिवाजी विरुद्ध मोहिमेकरता आदिलशाही फौजांच्या तयारीस विलंब होतो. शिवाय याच काळात दिलेर - मसूद संबंधांत वितुष्ट येऊ लागते.
  
      स. १६७९ च्या पावसाळ्यात औरंग आपल्या शहजाद्याकरता आदिलच्या बहिणीला -- शहरबानूला मागणी घालतो. आपला अधिकार व विजापूरचा बचाव साधण्याकरता मसूद राजकन्येचा तुर्की जनान्यात रवाना करतो. यामुळे औरंग चढून जाऊन तो दिलेर मार्फत मसुदकडे पुढील मागण्या करतो :- (१) मसूदने पदाचा राजीनामा देऊन जहागिरीच्या जागी जाऊन स्वस्थ बसावे. (२) विजापूरचा राज्यकारभार तुर्की प्रतिनिधीच्या सल्ल्याने चालावा.
    दिलेरच्या मागण्या मान्य केल्यास विजापूरचे स्वातंत्र्य हिरावले जाते याची मसूदला कल्पना असल्याने तो दिलेरला नकार देत मदतीसाठी पुन्हा एकदा शिवाजी पुढे पदर पसरतो. परिणामी दिलेरची प्रस्तावित पन्हाळा स्वारी रद्द होऊन विजापूर मोहिमेस आरंभ होतो.

    स. १६७९ च्या ऑगस्टमध्ये दिलेरच्या नेतृत्वाखाली तुर्की फौजा विजापूरच्या दिशेने चालू लागल्या. मसूदने मागणी केल्याप्रमाणे शिवाजी, विजापूरच्या बचावाकरता आवश्यक ती सर्व मदत करतो.
   
    दिलेरच्या विजापूर स्वारीची सर्वच अर्थानी वेळ चुकली होती. दख्खन सुभेदार मुअज्जम दिलेरला अनुकूल नसल्याने खानाच्या सैन्यला वेळेवर पगार मिळेना. खेरीज मोहिमेकरता आवश्यक ती मदत पुरवण्यापेक्षा दिलेरची फजिती कशी होईल याकडे मुअज्जमचे अधिक लक्ष होते. शिवाय अंतस्थरित्या मसूद आणि मुअज्जम तसेच शिवाजी - मुअज्जमचे सूत्र जुळल्याने दिलेरचं यावेळी आपटी खाणं निश्चित  होतं व घडलंही तसंच.

    दिलेरखान विजापुरास मोर्चे लावून बसताच शिवाजी तुर्की प्रदेशात शिरून लुटालूट करू लागला. मुख्य सेनापती विजापुरास तळ ठोकून बसल्याने शिवाजीच्या बंदोबस्तास आपण अस्म्र्त असल्याचे मुअज्जमने बादशाहला कळवले. औरंगला मुअज्जम - दिलेरमधील वैरभाव माहिती होता. त्याने आरंभी शहजाद्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. परंतु विजापूरच्या वेढ्यात येणारे अपयश, तुर्की प्रदेशातील शिवाजीच्या वाढत्या कारवाया आणि राजपुताना मोहिमेत शाही फौजांना पत्करावे लागणारे पराभव. यामुळे वैतागून गेलेल्या औरंगने दिलेरवर ठपका ठेवत त्यास विजापूरचा वेढा उठवून तुर्की प्रदेशाच्या रक्षणास जाण्याचे आदेश दिले.

    चरफडलेला दिलेर विजापुराहून माघार घेताना तिकोटा, अथणी येथील निरपराध आदिलशाही जनतेवर अत्याचार करतो. लुटमार, गुलाम विक्री, बलात्कार वगैरे. यामुळे संभाजी व सर्जाखान नाराज होतात. त्यांचे दिलेरशी भांडण देखील होते आणि पुढील मुक्कामासाठी दिलेर ऐनापुराच्या वाटेवर असताना संभाजी व सर्जाखान  तुर्की गोटातून पळून विजापुरास जातात.
    
    दिलेरला संभाजी, सर्जाखानाच्या पलायनाची बातमी मिळताच तो अब्दुल रजाकला विजापुरास पाठवून पाठोपाठ सर्व सैन्यानिशी विजापुरास येऊन धडकतो. अब्दुल रजाक विजापुरास पोहोचताच संभाजी तेथून पन्हाळ्यास दाखल होतो. ( डिसेंबर स. १६७९ )

    या सर्व घटना घडत असताना शिवाजी नेमका कुठे होता ? काय करत होता ? हे पाहण्यापूर्वी एका मुद्द्याची चर्चा मी आवश्यक समजतो व ती म्हणजे, संभाजी दिलेरखानाच्या छावणीतून नेमका कधी पळाला ?

    पसासं मधील ले. क्र. २१४२ या घटनेची तारीख दि. १६ ऑक्टोबर १६७९ पूर्वीची देतो. शककर्ते शिवरायचे विजय देशमुख या घटनेची तारीख २२ नोव्हेंबर अशी देतात तर सर जदुनाथ सरकार २० नोव्हेंबर १६७९ हि तारीख देतात.
    पैकी, देशमुख आणि सरकारांची तारीख नोव्हेंबर महिन्यातील असून त्यात दोन दिवसांचा फरक आहे. मात्र पसासं ले. क्र. २१४२ राजापूरकर इंग्रजांची नोंद असून त्यात हि घटना ऑक्टोबर महिन्यात नमूद केली आहे. अशा वेळी कोणती नोंद खरी मानावी ? खरे जंत्री नुसार पसासंची तारीख चुकली नसल्याचे सिद्ध होते. मग हि नोव्हेंबर महिन्यातील नोंद कुठून आली ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे साधन सध्या तरी माझ्याकडे नसल्याने तूर्तास प्रश्न उपस्थित करून पुढील चर्चेकडे वळत आहे.

पसासं ले. २१४२ :-  " काही दिवसांपूर्वी दिलेरखान, सर्जेखान व संभाजी राजा यांनी अथणी लुटली. पुढे त्यांनी ते शहर जाळून काही लोक कैदहि केले. या शेवटच्या बाबतीत सर्जेखान व संभाजी यांचे मत अनुकूल नव्हते. कैदी सोडावे असा त्यांचा विचार पडला आणि दिलेरखानाशी मतभेद होऊन त्या दोघांना विजापुराकडे पळून जावे लागले. त्यानंतर संभाजीराजा कोल्हापुराकडे ३०० घोडे व १००० पायदळ घेऊन आला आहे. इकडे येण्यात त्याचा हेतू काय आहे ते कळले नाही. परंतु आपल्या बापाने [ शिवाजीने ] बोलाविल्यामुळे तो आला आहे अशी लोकांची समजूत आहे. "


    स. १६७९ च्या ऑगस्टमध्ये दिलेर ज्यावेळी विजापुरावर चालून जातो, त्यावेळी शिवाजीच्या मनात एक राजकारण शिजलेलं असते. त्यानुषंगाने त्याच्या यापुढील हालचाली होतात.
    मसूदने अपेक्षेप्रमाणे कुमकेची मागणी करताच शिवाजी त्याला लष्करी मदत पुरवतो. त्यानंतर विजापुरास वेढा घालून बसणाऱ्या दिलेरवर हल्ले न चढवता थेट तुर्की प्रदेशात चाल करून जातो. धरणगाव, चोपडा, जालनापूर इ. शहरांची लुटमार केली जाते. 
औरंगाबाद हे दख्खन सुभ्याचे मुख्य स्थान. सुभेदाराचा मुक्काम या शहरात असायचा. शिवाजीच्या धामधूमीवेळी शहजादा मुअज्जमचा औरंगाबादेस दख्खन सुभेदार म्हणून मुक्काम होता. त्यापासून अवघ्या ८० - ९० किमी अंतरावर असलेल्या जालन्यात शिवाजीने चार दिवस मुक्काम ठोकत लुटीचा धुमाकूळ घातला. जालन्यातील त्याच्या या लुटीचे वर्णन बव्हंशी शिवचरित्रांत आल्याने त्या संदर्भात तपशीलवार लिहित नाही. परंतु शहजादा नजीक असताना खासा शिवाजी जालन्यात चार दिवस तळ काय म्हणून ठोकतो ? कारण जालना हे काही सुरते इतके धनाढ्य शहर वा व्यापारी केंद्र नव्हते, ज्याच्या लुटीकरता शिवाजीने चार दिवस घेत आपला जीव धोक्यात घालावा. मग अशी कोणती बाब, प्रलोभन होतं कि ज्याच्या प्राप्तीकरता शिवाजी चार दिवस जालन्यात तळ ठोकून राहिला ?

    पसासं ले. क्र. २१९४ हा दि. १२ डिसेंबर १६७९ चा आहे. यानुसार शहजादा मुअज्जम शिवाजी सोबत हातमिळवणी करून बादशाही तख्त ताब्यात घेण्याच्या विचारात होता. धामधुमीच्या काळात अशा अफवा निर्माण होणे, पसरणे स्वाभाविक असले तरी या काळातील घटनाक्रम पाहता यात थोडंफार तथ्य असल्याचे लक्षात येते.
पसासं ले. क्र. २१८५ दि. २९ नोव्हेंबर १६७९ चा आहे. यानुसार विजापुरास दिलेरने शिवाजीचा पराभव केल्याने तो पळून पट्टागडाच्या आश्रयास आला आहे.
    वस्तुतः जालन्यातील लुट घेऊन परत येत असताना तुर्की सैन्याने शिवाजीला घेरल्याने आडमार्गाने त्यास पट्टागड जवळ करावा लागला होता. यावेळी शिदोजी निंबाळकर या सरदाराने आपले प्राण वेचून एका समयी तीन दिवस तुर्की सरदारांना थोपवून धरण्याचे कार्य केले तर आडवाटांनी पट्टागडास शिवाजीला पोहोचवण्याची जबाबदारी बहिर्जी नाईकने पार पाडल्याचे सांगितले जाते.
    जदुनाथ सरकारांच्या मते दि. २२ नोव्हेंबर रोजी शिवाजी पट्टागडास पोहोचला.

    वरवर पाहता या सर्व घटना असंबंद्ध असल्या तरी कुठेतरी त्या एका सूत्राने जोडलेल्या आहेत. त्यानुसार ----- दिलेरला विजापुरात गुंतवण्याची जबाबदारी संभाजीवर होती. विजापूर दिलेरच्या हाती पडू न देण्यासाठी शिवाजी बाहेरून झटणार होता. मसूद दख्खनी मुसलमान असल्याने व मुअज्जम त्यास अनुकूल असल्यामुळे विजापूर सहजासहजी दिलेरच्या हाती पडणार नाही याची शिवाजीला खात्री होती.

    दिलेर विजापुरात अडकून पडल्यावर पद्धतशीरपणे शिवाजीने औरंगाबाद भोवती आपले लष्कर पेरत लुटीचे थैमान घातले. पसासं ले. क्र. २१९४ मधील शहजादा - शिवाजी युती संबंधी मजकूर अफवा होती असे जरी गृहीत धरले तरी शिवाजीचा चार दिवसांचा जालन्यातील मुक्काम, शहजाद्याची निष्क्रियता या गोष्टी कशाचे द्योतक आहेत ? 

    स. १६७९ अखेर जोधपुरकरांच्या मदतीला उदेपूरकर रणभूमीत उतरल्याने औरंगची मारवाड मोहीम रेंगाळण्याची चिन्हे दिसत होती. शिवाय या मोहिमेत औरंगच्या तुर्की सैन्याला कुठेही निर्णायक विजय प्राप्त होत नव्हता. अशा स्थितीत औरंग पासून दूर असलेला कोणताही शहजादा, शिवाजीसारखा बलवान साथीदार सोबत असल्यास बंडाळी करण्यास का उद्युक्त होणार नाही ?

    औरंगजेबचे सिंहासन उलथवून टाकण्याची हि योजना नेमकी कोणाची ? हे स्पष्ट करणारी साधने याक्षणी उपलब्ध नसली तरी या योजनेच्या पुर्तेतकरता शिवाजी - संभाजीने आपले प्राण वारंवार धोक्यात घातले. पुढे संभाजीचा जो अमानुष खून औरंगने घडवून आणला त्यामागील मुख्य कारण हेच आहे.

    शिवाजीच्या या राजकारणाचा संबंध औरंग - राजपूत युद्धाशी जोडता येतो. राजपुतांच्या उरावरील दडपण कमी करण्यासाठी दख्खनमध्ये तशीच एखादी मोठी क्रांती वा बंडाळी घडवून आणणे आवश्यक होते. ज्यामुळे औरंगला एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढणे भाग पडावे. खेरीज या काळातील देशभर पसरलेल्या तुर्की साम्राज्यातील घटनाही अशाच एखाद्या जोरकस राजकारणाकडे निर्देश करतात.
अफगाण प्रांतात बंडाळी असल्याने तिथे तुर्कांचे एक मोठे सैन्यदल अडकून पडले आहे. मारवाड, चितोड विरोधात औरंगने युद्ध पुकारल्याने राजपुताना त्याच्यावर नाराज आहे. शिवाय पंजाबातील शीख, बुंदेले - राजपूत, जाट, दख्खनी मुसलमान असे राज्यातील एकूणएक प्रमुख घटक औरंगने आपल्या धार्मिक तसेच साम्राज्यविस्तार धोरणातून दुखावून सोडल्याने ते औरंग अडचणीत सापडल्यास त्याचा लाभ घेण्यास चुकणार नव्हते.
    या दृष्टीने पाहता शहजादा मुअज्जमला शिवाजीने आपल्या योजनेस -- किमान बादशाही तख्त प्र्ताप्तीकरता अथवा दख्खनमध्ये स्वतंत्र होण्याकरता फितवून घेतल्यास नवल नाही. कारण, मुअज्जम, आजम, अकबर या औरंगच्या विद्यमान राजकारणात असलेल्या तीन शहजाद्यांपैकी मुअज्जम तुलनेने सौम्य होता. अशी व्यक्तीच तख्तावर बाहुले म्हणून बसवण्याची शिवाजीची योजना दिसते.
    पुढील काळातील वारसा युद्धाचा वृतांत पाहिला असता शिवाजीची निवड अचूक असल्याचे दिसून येत असले तरी मुअज्जमच्या मनोरचनेचा त्याला पुरता अंदाज न आल्याचेही येथे नमूद करणे भाग आहे.
    मुअज्जम उर्फ शहाआलमला बादशाही तख्त हवं असलं तरी त्याकरता आप्त स्वकीयांचा रक्तपात घडवून आणणं मान्य नव्हतं. त्यामुळेच शक्य तो गोष्टी निकरावर न आणता सामोपचाराने निकाली निघाव्यात याकडे त्याचे जास्त लक्ष असल्याचे दिसून येते. तुलनेने आजम, अकबर अगदीच प्रखर होते. त्यामुळेच अकबर हाल अपेष्टा सहन करत रानोमाळ भटकला पण परत बापाकडे गेला नाही. असो.

     जालन्यातील मुक्काम आटोपता घेत असताना शिवाजीला घेरण्यासाठी जे तुर्की सरदार धावून आले त्यात केसरीसिंगसारखे शिवाजीचे मित्रही होते. त्यांच्याच अंतस्थ सूचनेवरून शिवाजी, आपल्या भोवती तुर्की सैन्याचे कडे निर्माण होण्यापूर्वीच तेथून निसटून पट्टागडावर निघून गेला.
    शिवाजीचे जालन्याकडे जाऊन तिथून पट्टागडाकडे जाणे व त्याच सुमारास दिलेरच्या गोटातून संभाजीचे पळून जाणे यात योगायोगापेक्षा पूर्वसंकेताचाच भाग अधिक दिसतो.
    
    दिलेरच्या गोटातून पळालेला संभाजी थेट पन्हाळ्यास न जाता प्रथम विजापुरी जातो. तिथे अब्दुल रजाक आघाडीची तुर्की पथके घेऊन येईपर्यंत संभाजीचा मुक्काम असतो. अब्दुल रजाक नजीक येताच व दिलेर विजापूरच्या मार्गावर असल्याचे समजताच संभाजी पन्हाळ्यास जातो. यावेळी पन्हाळ्यावर शिवाजी हजर नसतानाही संभाजीला गडावर प्रवेश मिळतो. यावरून यासंबंधी शिवाजीच्या आज्ञा गडकऱ्यांना आधीच पोचल्याचे दिसून येते.
     विजापूरचा नाद सोडलेल्या दिलेरला पुन्हा त्याच भानगडीत गुंतवत संभाजीने, शिवाजीचा पन्हाळ्याला येण्याचा मार्ग एकप्रकारे सुकर केला. त्यानंतर स. १६८० च्या जानेवारीत पन्हाळगडावर शिवाजी - संभाजीच्या भेटी घडून आल्या.  
   
    सारांश, संभाजीला तुर्की गोटात पाठवून शिवाजीने एक अकल्पित राजकीय डाव खेळून पाहिला. या खेळीचे फलित, परिणाम याची तपशीलवार चर्चा आपण पुढील प्रकरणी करू. 

                                                       ( क्रमशः )   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: