बुधवार, ८ जुलै, २०१५

अयोध्येतील रामाच्या सुवर्णमूर्तीची स. १७९० मधील चोरी




प्रख्यात इतिहास संशोधक श्री. सदाशिव आठवले संपादित ‘ हिंगणे दफ्तर : तिसरा खंड ‘ चाळत असताना स. १७९० मधील दोन पत्रांत अयोध्येच्या मंदिरातील रामाच्या सुवर्णमूर्ती चोरीस गेल्याचा उल्लेख वाचनात आला. त्या संदर्भातील पत्रांचा मजकूर जरुरीपुरता उतरवून घेत येथे देत आहे :-



पत्र क्रमांक – ३६



पौ| छ १६ शवाल सके १७१२                   श. १७१२

आधिक आषाढ व||                           इ. १७९०

                      श्री

पु|| तीर्थरूप राजश्री तात्यासाहेब वडिलाचे सेवेसी विज्ञापना यैसिजे आयोध्येस श्रीरामचंद्रजीच्या मूर्ती सुवर्णाच्या होत्या दिवसारात्री कुळूप लागत होते त्यास माघ शुध्ध येकादसी मूर्ती गुप्त जाल्या कवाडाचे कुळूप लागलेच राहिले व भिंती कायेम असोन मूर्ती मात्र गेल्या पुजाऱ्यानी बहुत शोध केला परंतु कोठे ठिकाण लागले नाही तेव्हा चोराने नेल्या हे स्थापून दुसऱ्या मूर्ती सुवर्णाच्या करून स्थापन केल्या परम दुःश्चिन जाले ईश्वर कृपा करो ........ ...... ...... .............. ...........




पत्र क्रमांक – ३७



सु|| रमजान १४

[ तारीख मथुरेहून आलेल्या पत्राची ] श. १७१२ ज्येष्ठ वाद्य १ (?)

                              इ. १७९० मे २९ (?)

                   श्रीगजानन

 मथुरेहून पत्रे छ १४ रमजानची छ ६ शवाली आली  ....... ....... ......... .................. ........ ....... आयुध्येस श्रीरामचंद्रजीच्या मूर्ती सुवर्णाच्या होत्या दिवसा रात्री कुलूप लागत होते त्यास माघ शुध ११ मूर्ती गुप्त जाल्या कवाडाचे कुलूप लावलेच राहिले व भिती का(येम) आस्ता मूर्ती मात्र गेल्या पुजाऱ्यानी बहुत शोध केला परंतु कोठे ठिकाण लागले नाही तेव्हा चोराने नेल्या हे स्थापून दुसऱ्या मूर्ती सुवर्णाच्या करून स्थापना केली परम दुःश्चीन्त जाले ईश्वर कृपा करो म्हणून लिहिले आहे बहुत काय लिहिणे हे विनति  



संदर्भ ग्रंथ :-

१)      हिंगणे दफ्तर : तिसरा खंड :- संपादक – श्री. सदाशिव आठवले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: