Sunday, February 12, 2012

 या ब्लॉगवरील पानिपत विषयक लेखमालेचे पुस्तकांत रुपांतर करावे असे कित्येक वाचकांचे मत होते, आग्रह होता. त्यानुसार व श्री. संजय सोनवणी यांच्या प्रयत्नांमुळे आणि आग्रहामुळे, या लेखमालेचे पुस्तकांत रुपांतर करण्याचे मी ठरवले आहे. कित्येक दिवस त्याच कामात व्यस्त असल्यामुळे ब्लॉगवर नवीन पोस्ट टाकण्यास वेळ मिळत नाही. पानिपत विषयी जे पुस्तक मी लिहित आहे, ते या ब्लॉगवरील लेखांचा जरी संग्रह असले तरी त्यातील निष्कर्ष नव्याने उपलब्ध झालेल्या पुराव्यांमुळे मी बदलले आहेत. जवळपास या पुस्तकाचे काम पूर्ण होत आले असून बहुतेक मार्च किंवा एप्रिलच्या सुमारास हे पुस्तक प्रकाशित होईल असे दिसते. प्रकाशन समारंभाची वेळ, ठिकाण याची माहिती या ठिकाणी मी देईनचं. माझी एवढीचं विनंती आहे कि, त्या कार्यक्रमाच्या दिवशी आपण सर्वांनी हजेरी लावावी.