Friday, November 30, 2012

भीमा - कोरेगावच्या लढाईतील ब्रिटीशांच्या कागदी विजयामागील रहस्य !

    भीमा - कोरेगाव येथील स्मारक स्तंभावरील पाट्यांचे सचित्र विश्लेषण :-  
 छायाचित्र क्रमांक १) इंग्रजी मजकूर 
  ( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. ) 
            या पाटीवरील मजकुराची पहिली ओळ अतिशय महत्त्वाची आहे. या ओळीचा असा अर्थ आहे कि, कोरेगावच्या लढाईत बचाव केल्याबद्दल स्मारक बनवण्यात येत आहे. या बचावात्मक लढाईत ज्यांनी वीर मरण पत्करले त्यांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आल्याचे पुढील मजकुरात नमूद केले आहे. महत्त्वाचे म्हणजे भीमा - कोरेगाव येथील लढाईत ब्रिटीशांचा विजय झाल्याचा अजिबात उल्लेख करण्यात आला नाही. 

 छायाचित्र क्रमांक २) मराठी मजकूर 
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
      छायाचित्र क्रमांक १)  मध्ये जो इंग्रजी भाषेत मजकूर आहे त्याची हि मराठी आवृत्ती असून या पाटीचे  शीर्षकच मुळी ' जयस्तंभ ' आहे. त्याशिवाय खालील मजकुरात कोरेगावच्या संग्रामाची त्रोटक माहिती असून त्यात इंग्रजी लोकांचा विजय झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

छायाचित्र क्रमांक ३) इंग्रजी मजकूर 
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
  वरील पाटीमधील इंग्रजी मजकुरात भीमा - कोरेगाव युद्धातील जखमी - मृत वीरांचा नामोल्लेख केला आहे. पण या लढाईमध्ये इंग्रज जिंकले असे चुकूनही लिहिले गेलेलं नाही. 

छायाचित्र क्रमांक ४) 
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
  छायाचित्र क्रमांक ३) मधील इंग्रजी मजकुराचा हा मराठी अनुवाद आहे. भीमा - कोरेगाव संग्रामातील मृत - जखमी वीरांची नावे यात दिलेली आहेत. उदाहरणार्थ, मुंबई सरकारच्या दुसऱ्या ग्रेनेडीयर रेजिमेंट मधील मृतांची नावे :-  बापू सिंदा जमातदार, गणोजी गोरे जमातदार, कानसिंग हवालदार, इटमेतखाळमेतर नाईक, सोननाक कमळनाक नाइक, रामनाक येसनाक नाइक, प्रसादशिंग सिफाइ, लक्ष्मण व (ब ?) दोसा सिपाई, बाबु सावंत सिपाई, गोंदनाक कोठे (?)नाक सिपाइ, रामनाक येसनाक सिपाइ, लक्ष्मण कुकडा सिपाइ, भागनाक हरनाक सिपाई, राघोजी मोद्रे सिपाई इ. 
       उपरोक्त नावे वानगीदाखल दिलेली आहेत. या पाटीवरील मजकुरातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पातीच्या आरंभी स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे कि, ' मौजे कोरेगाव येथे इंग्रजी लोक लढाईत जय मेळउन पडले व जखमी जाले त्यांची नावे ' छायाचित्र क्रमांक ३) मधील इंग्रजी मजकुरात या अर्थाची वाक्ये अजिबात लिहिली गेली नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि, भीमा - कोरेगावच्या युद्धात इंग्रजांचा विजय झाला हे लोकांच्या मनी ठसवण्यासाठी इंग्रजांनी मुद्दाम एतद्देशीय भाषेत बनवलेल्या पाटीत - आपण कोरेगाव येथे विजयी झालो - असे खोदवून घेतले.   

   
    विवेचन :-    भीमा - कोरेगावची लढाई इंग्रजांनी जिंकली असाच सर्वांचा समज आहे. परंतु, प्रत्यक्षात ती लढाई ना इंग्रजांनी जिंकली ना पेशव्यांनी ! तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धातील ती एक अनिर्णीत लढाई असल्याचे मी मागील लेखात साधार स्पष्ट केले आहे. ( पहा अथवा पाहू नका :- http://peshwekalinitihas.blogspot.in/2012/06/blog-post.html ) परंतु, असे असले तरी भीमा - कोरेगाव येथील संग्रामात इंग्रजांचा विजय झाला हा लोकांचा समज अजूनही दृढचं आहे. यामागील कारणांचा शोध घेतला असता असे दिसून आले कि, इंग्रज अधिकाऱ्यांनी बनवेगिरी करून, आपण भीमा - कोरेगावचे युद्ध जिंकले असे बळेच उठवून दिले होते. चतुर इंग्रज यावरच थांबले नाहीत तर भीमा - कोरेगाव येथील स्मारक स्तंभाचे त्यांनी जयस्तंभात देखील रुपांतर केले. 
           या स्मारकावर इंग्रजी व मराठी भाषेत  मजकूर खोदलेल्या दोन पाट्या तत्कालीन इंग्रज सरकारने लावल्या आहेत. पैकी इंग्रजी पाटीवरील मजकुरात ते लिहितात कि, भीमा - कोरेगाव येथील संग्रामात बचाव केल्याबद्दल हे स्मारक उभारण्यात येत आहे. अर्थात, त्यावेळी इंग्रजांची भाषा इतद्देशियांपैकी कितीजणांना समजत  होती ? त्यामुळे हाच मजकूर मराठी भाषेत लिहिण्यात आला पण तो लिहिताना एक छोटासा फेरबदल करण्यात आला. त्यानुसार भीमा - कोरेगाव येथील स्मारकस्तंभ ' जय स्तंभ ' बनून भीमा - कोरेगावच्या लढाईत इंग्रजांचा विजय झाल्याचे लिहिण्यात आले. यामागील इंग्रजांचा हेतू उघड होता. 
       पेशवाईचा अस्त नुकताच झाला असला तरी या देशावर, विशेषतः महाराष्ट्रावर,  इंग्रजांची म्हणावी तशी अजून पक्की पकड बसली नव्हती. ( उमाजी नाईकांनी याच काळात इंग्रजांच्या विरोधात उठाव केला होता. ) मराठी संस्थानिक अजून जिवंत होते आणि महत्त्वाचे म्हणजे सातारकर छत्रपतींचा जनसामान्यांमध्ये अजूनही नावलौकिक होता ! तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धात पेशव्यांनी छत्रपतींचे बळकावलेले राज्य सोडवून परत छत्रपतींना देणार असल्याची घोषणा इंग्रजांनी केली होती. या पार्श्वभूमीवर स. १८१९ मध्ये जेव्हा सातारकर व इंग्रजांमध्ये तह घडून आला तेव्हा सातारकरांना पेशव्यांच्या अंमलाखालील असलेले संपूर्ण राज्य न मिळता काही जिल्ह्यांचे नाममात्र स्वतंत्र राज्य मिळाले. बरे, सातारकर आता स्वतंत्र राजे न राहता इंग्रजांचे मांडलिक देखील बनले ! 
        हि घटना लक्षात हेऊन भीमा - कोरेगावच्या स्मारकस्तंभांवरील मराठी भाषेतील मजकुराकडे पाहावे लागेल. इंग्रजी अंमल देशी संस्थानिकांनी किंवा लोकांनी सुखासुखी मान्य केला नव्हता. इंग्रजांचे राज्य तलवार  आणि राजकीय संधिसाधूपणा / धूर्तता यांवर टिकून होते. एतद्देशीय संस्थानिक / लोक आपल्यावर चिडून आहेत हे इंग्रज जाणून होते. त्याचप्रमाणे ते एकसंध नसल्याने व त्यांच्यावर आपली दहशत असल्याने ते गप्प असल्याचे त्यांना माहिती होते. देशी संस्थानिकांवरील / लोकांवरील  इंग्रज सरकारचा हा वचक / जरब असाच कायम राहावा यासाठीच माझ्या मते त्यांनी भीमा - कोरेगाव येथील स्मारकावरील मजकुरात खोडसाळपणा केला. या व्यतिरिक्त मला दुसरे काही सयुक्तिक कारण दिसत नाही.
    या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेले फोटो मला उलपब्ध करून देण्याचे कार्य श्री अनिल सुरवासे व श्री. अनिल वळसे यांनी केले आहे. त्यांच्या या सक्रीय सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.   

10 comments:

Anonymous said...

brahmanshahine sarv deshache vatole kele........ tu nakkich brhaman asava ..mhanun tu tya smarkache sanshodhan karat ahe, are pan ka ?.. jhete jhete BABASAHEBANCHE naav ale re ale tumhala te sahanch honar nahi... are lapun chapun ka blog tayar karta .tya na news peparla .. mag kalel yacha parinam kay hoto te...nidan tumcha javai hota he tar lakshat ghya.. tyach bhima koregav chya uddhat 500 umaharanni 25000 peshvyanna gajar muli sarkhe kaple hote visarlas ka........ kahihi lihitaana vichar purvak lihit ja... nahitar parat ekda bhimakoregav karayala vel lagnar nahi.............

Real Vidrohee said...

इ.स. १८०० पर्यंत भारतावर ब्रिटिशांचे राज्य आले होते - महाराष्ट्रावर ब्रिटिशांचे राज्य यायला १८१८ पर्यंत उशीर झाला तो पेशवाई राज्यातील नाना फडणवीस सारख्या कार्यक्षम लोकांमुळे. १८१८ मध्ये ब्रिटिशांचे राज्य आले तरीही लोकांच्या मनात छत्रपती आणि त्यांचे पेशवे यांच्याबद्दल प्रेम होते. ब्रिटिशांना सतत त्याची धास्ती होती. यासाठी ब्रिटिशांनी जी योजना बनवली तिचे दर्शन त्यांच्या १८५० नंतरच्या कारवायांमध्ये दिसते. या योजनेचे ०३ मुख्य भाग दिसतात -

१) हिंदू लोकांमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडणे. हिंदू संस्कृती / इतिहास / व्यवस्था यांच्याबद्दल द्वेष पसरवणे. हिंदू धर्माला जाणीवपूर्वक ब्राह्मणी धर्म (Brahminical Religion) असे नाव देणे - अस्पृश्यतेसारख्या मुख्यत: इस्लामी शासनकाळात सुरू झालेल्या (उदा. मुस्लिम व्हायला नकार देणाऱ्या लढाऊ जमातीला गावकुसाबाहेर ढकलणे, त्या जातीचे रक्षणाचे काम काढून घेऊन चामड्याचे काम देणे, अशाच कारणासाठी मूळ ब्राह्मण असलेल्या एका जमातीला मैलासफाईचे काम करायला भाग पाडणे इ.) प्रथेसाठी हिंदूधर्माला दोषी ठरवणे. ब्रिटिशांशी निष्ठा असलेल्या लोकांना शिक्षण, प्रोत्साहन देऊन त्यांना हिंदूधर्म आणि ब्राह्मण यांच्यावर टीका करायला - द्वेष पसरवायच्या कामाला लावणे. पेशवाईचा संबंध वर्णव्यवस्था आणि अन्याय यांच्याशी जोडून “ब्रिटिशांनी यातून आपली मुक्तता केली” असा समज लोकांच्या मनात बसवणे.

२) ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे - हिंदू धर्मापासून वरील प्रकारे बाजूला पडलेल्या, द्वेष करू लागलेल्या लोकांना ख्रिस्ती करणे, ज्यामुळे लोकांच्या मनात ब्रिटिशांबद्दल परकेपणाची भावना राहणार नाही. अहमदनगर जिल्हा हा या प्रयोगासाठी सर्वप्रथम निवडला गेला. - तिथे सिंथिया फेरार या मिशनरी महिलेमार्फत विशेषत: महार या जातीला ख्रिस्तीकरणासाठी लक्ष्य बनवले गेले. वर उल्लेख केलेल्या एका ब्रिटिशनिष्ठ समाजसुधारकाने या महिलेला मदत केल्याचे उल्लेख त्यांच्या लेखनात येतात.

३) ब्रिटिशांशी निष्ठावान रहाणे कसे फायद्याचे हे लोकांना दाखवत रहाणे – भारतीय संस्कृतीला नावे ठेवणाऱ्या, जातींमध्ये फाटाफूट / द्वेष पसरवणाऱ्या लोकांचे सत्कार, त्यांना किताब / पदव्या देणे, सरकारी कामांचे ठेके / कंत्राटे देणे. एक मोठे उदाहरण म्हणजे कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ, १८१८ साली पुणे शहर ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर छत्रपती प्रतापसिंह यांना सुरक्षित साताऱ्याला पोचवण्यासाठी पेशव्यांचे सैन्य चाकणकडून सासवड घाटमार्गे साताऱ्याला जाताना ब्रिटिशांच्या मद्रासी सैनिकांची एक तुकडी त्या मार्गाने शिरूरहून पुण्याला जात होती. मराठी सैन्य मोठे असल्यामुळे या तुकडीने कोरेगाव भीमा या गावात घुसून आडोश्याने या सैन्यावर गोळीबार केला. हा गोळीबार मराठा सैन्यापैकी थोड्या लोकांनी अंगावर घेऊन दिवसभरात पूर्ण सैन्य सासवड घाटाच्या दिशेने निघून गेले. यात ब्रिटिशांच्या मद्रास रेजिमेंटचे काही सैनिक आणि काही मराठी सैनिक मारले गेले. या चकमकीला जवळजवळ ३३ वर्षे होऊन गेल्यावर ब्रिटीशांनी विजयस्तंभ उभारला. त्यांवर स्पष्ट लिहिले आहे – (ब्रिटिश) “सरकारशी निष्ठा बाळगणाऱ्या लोकांचे बहुत काळपर्यंत नाव व्हावे म्हणून हा स्तंभ उभारला आहे”. पुढे यालाच “शोषितांचे अन्यायी संस्कृतीशी झालेले युद्ध” असे धडधडीत खोटे रूप देऊन लोकांना दरवर्षी ०१ जानेवारीला या स्तम्भापाशी जाऊन ब्रिटिशांचा विजय साजरा करायला प्रोत्साहन दिले गेले. प्रत्यक्षात शिवाजी महाराजांपासून मराठी सैन्यात सर्वजातींचे सैनिक लढत असत हा इतिहास आहे – तो इथे लपवला गेला. महाराष्ट्रातील काही महान समाजसुधारकही या फसवणुकीला बळी पडले होते.

हे लिहिण्याचे कारण – आजही या तीनही प्रकारची फसवणूक भारतीय – मराठी लोकांच्या लक्षात आलेली नाही. ब्रिटिश गेले तरीही स्वत: मराठी माणूस कधी पुरोगामित्वाच्या नावाखाली तर कधी समतेच्या नावाखाली स्वत:च्याच सांस्कृतिक ओळखीपासून दूर जात आहे - जन्माधारित जातिद्वेषालाच शहाणपणा समजतो आहे. जी गोष्ट ब्रिटिशांच्या फायद्याची होती – तीच आज भ्रष्ट राजकारण्यांच्या फायद्याची आहे. मतदानाचे गणित जाती-जातींना फोडून सोपे होते – लोक देशाच्या हिताला सहज विसरतात.

Anonymous said...

anonyms- khar bolalyawr mirchi lagli ka? ani dhmkya kslya detos re..... tuzyakdun je hoeil te kr

Abhay Datar said...

An interesting article. Mounstuart Elphinstone's comment on the behaviour of the European and Indian troops at Koregaon make interesting reading. It is as follows-
Our men could not be got to storm. The Europeans
talked of surrendering. The native officers behaved
very ill ; and the men latterly could scarce be got,
even by kicks and blows, to form small parties to
defend themselves, . . . Most that I have seen tried to
excuse themselves, and are surprised to find that they
are thought to have done a great action : yet an action
really greater has seldom been achieved — a strong
incitement never to despair.
Ref James Sutherland Cotton's book on Elphinstone
Regards,
Abhay Datar

संजय क्षिरसागर said...

Abhay Datar,
माहिती निश्चित उपयुक्त आहे.

Anonymous said...

संजयजी
बुद्धीभेद करणारा लेख वाटला. लढाई १८१८ साली झाली असं मराठी शिलालेख दाखवतो. स्तंभ १८२२ साली बनवला गेला. १८५७ ला पेशव्यांनी कुठल्या सत्तेविरुद्ध उठाव केला ? महात्मा फुले यांनी इंग्रजी सत्तेकडे गा-हाणे मांडले ते पेशव्यांच्या काळात शक्य झाले असते का ? त्यांच्या विलासी आयुष्याची, अन्याय अत्याचाराची वर्णनं पुरेशी असताना त्यांच्याबद्दल सामान्य जनतेत प्रेम होतं असा संदेश या लेखातून जातो. इंग्रजांच्या इतर ठिकाणच्या स्तंभांची छायाचित्रं तुलनेसाठी आहेत का ?

इंग्रजीत जयस्तंभ म्हटले नाही याऐवजी स्थानिक भाषेत जयस्तंभ म्हणणे हे जास्त इमानदारीचे वाटते. स्थानिकांना इंग्रजांनी केलेला क्लेम पसंत नसता आणि पेशव्यांचा बीमोड झाला नसता तर त्या जयस्तंभास उखडून फेकणे अशक्य होते का ?

संजय क्षिरसागर said...

Anonymous,

प्रस्तुत लेखाचा विषय स. १८१८ मध्ये झालेल्या कोरेगाव येथील युद्धाशी निगडीत आहे. त्यामुळे या लेखात फक्त त्या घटनेपुरता काळ येथे विचारात घेतला आहे. महात्मा फुलेंचा तुम्ही उल्लेख केला पण त्यांचा जन्मचं मुळी स. १८२७ चा आहे, हे तुम्ही विसरत आहात. स. १८५७ चा आणि या लेखाचा तसा दुरान्वये देखील संबंध येत नाही. तसेच पेशव्यांच्या विषयी जनतेला प्रेम होते असा चुकून देखील संदेश या लेखातून दिला गेलेला नाही. उलट छत्रपतींच्या सत्तेविषयी तशा आशयाचा उल्लेख केला गेला आहे. पेशव्यांचा उदो उदो करायचा असता तर उमाजी नाईकांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केला असे लिहिण्याची मला काही गरज नव्हती. जी काही वस्तुस्थिती मला उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आढळून आली ती मी मांडली.
राहता राहिला प्रश्न त्या जयस्तंभाला सामान्य जनतेने का उखडून फेकले नाही याचा तर त्याचे उत्तर माझ्यापेक्षा तुम्ही शोधणे अधिक योग्य होईल. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव का केला ? त्यांचे हे क्रांतीकार्य त्यांच्या मुलांनी तुकोजी व महाकाल यांनी पुढे कसे नेले ? त्यांचे पुढे काय झाले ? खरे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक असताना तो मान वासुदेव फडके यांना का देण्यात येतो याचा तुम्ही शोध घ्या. त्यासाठी जी काही मदत करता येईल ती करण्यात मी तयार आहे.

Anonymous said...

ईंग्रजानी शिलालेख ईंग्रजी आणि मराठी भाषेत लिहिला आणि त्यात ईंग्रजी भाषेत विजया संबधी काही लिहिल नाही यावर तुमचा हा संशयशोध रचला गेला आहे. समजा ईग्रजानी जर मराठी ऐवजी ईंग्रजीच विजयाच वर्णन केल असत तर तुम्हाला मान्य झाल असत का? आणि मुळात हि लढाई अनिर्णित होती तर मग पेशवे गप्प का राहिले? त्यानी पुन्हा चढाई का केली नाही? हे प्रश्न निरुत्तर रहातात.

संजय क्षिरसागर said...

प्रिय
Anonymous,

तुम्ही आपल्या नावाने जर प्रतिक्रिया दिली असती तर प्रत्युत्तर देण्यास मला अधिक आनंद झाला असता. असो, पहिली गोष्ट अशी कि, हा काही संशयशोध नाही. प्रस्तुत विषयावर याच ब्लॉगवर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मी लेख लिहिला आहे आणि त्यात दोन्ही पक्ष निर्णायक विजय मिळवण्यापासून कसे वंचित राहिले तेच दिले आहे. राहता राहिले प्रतिक्रियेच्या अखेरीस असलेले प्रश्न तर त्यांची उत्तरे सर्वांनाच माहिती आहेत. तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धातील हि एक लढाई होती पण निकाली न निघाल्याने ती निर्णायक बनली नाही. तसेच या संग्रामानंतर ना पेशवा गप्प बसला ना इंग्रज ! त्यांच्या या नंतर देखील कित्येक लढाया घडून आल्या आहेत.

Rajendra Joshi said...

कोरेगाव भीमाच्या स्तंभावर स्पष्ट लिहिले आहे की ब्रिटिश सरकारवर लोकांची निष्ठा राहावी म्हणून हा स्तंभ उभारला आहे. ब्रिटिशांच्या पगारी सैन्याच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या तुकडीला (महार रेजिमेंट नाही) शिरूरहून पुण्याकडे जाताना, जुन्नरकडून दक्षिणेकडे जाणारे मोठे मराठा सैन्य दिसले, म्हणून त्यांनी कोरेगाव भीमा गावातील घरांमध्ये घुसून तिथून या सैन्यावर गोळीबार सुरू केला. मराठा सैन्याच्या एका तुकडीने या गोळीबाराला प्रत्युत्तर देत एकीकडे पूर्ण सैन्याची वाटचाल सुरू ठेवली. पूर्ण मराठा सैन्य पुढे जाताच ही चकमक संपली. या चकमकीला एका विषम लढाईत छोट्या सैन्याने मिळवलेल्या विजयाच्या दंतकथेचे रूप या स्तंभाच्या मदतीने दिले गेले. ब्रिटिश पगारी तुकडीत जेवढे महार सैनिक असतील त्याच्या अनेकपटीने महार सैनिक मराठा सैन्यात असतील. पेशव्यांचे सैन्य म्हणजे चाळीस हजार लढणारे ब्राह्मण असावेत अशी बालिश कल्पना असलेले लोक महाराष्ट्रात असावेत हा महाराष्ट्राचा अपमान म्हणावा लागेल. त्यातूनच उद्भवलेली - पंचवीस महारांनी चाळीस हजार पेशवा कापला - अशी खुळचट विधाने आज सर्रास केली जातात. या चकमकीला राजकीय कारणांसाठी "अनेक शतकांच्या अन्यायी व्यवस्थेविरुद्ध मिळवलेला विजय" असे बेफाट रूप देऊन दलितांना फसवले जाते. हा स्तंभ उभारला त्याच काळापासून ख्रिस्तीकरण मोहीमदेखील याच भागात सुरू केली गेली हा योगायोग आहे की हे एका योजनेचे भाग होते हे नोंदवले गेलेले नाही - त्यासाठी मिस सिंथिया फेरार या अमेरिकन मिशनरी महिलेला सर्वप्रकारे मदत केली गेली. आज अहमदनगर जिल्ह्यातील मोठ्या ख्रिस्ती लोकसंख्येचे मूळ या इतिहासात आहे.