Monday, July 30, 2012

मराठशाही, पेशवाई, ब्रिटीश अंमल आणि महार समाज

      ' महार ' या जातीचा उगम वा निर्मिती याविषयी श्री. संजय सोनवणी यांनी आपल्या ' महार कोण होते ? ' या ग्रंथात संशोधनाद्वारे जे काही निष्कर्ष नोंदवले आहेत त्याच्याशी मी संपूर्ण सहमत असल्याने महारांच्या पूर्वेतिहासाविषयी या ठिकाणी अधिक तपशीलवार चर्चा करणार नाही.  
              मराठेशाहीच्या इतिहासाचा  आरंभ शिवाजीच्या स्वराज्यस्थापने पासून होतो. तेव्हा तत्कालीन मराठेशाहीत व त्याच्याही आधीच्या स्वराज्यस्थापनेच्या आधीच्या  काळात महारांची सामाजिक स्थिती किंवा दर्जा हा कोणत्या प्रकारचा होता हे आधी आपण पाहू. 
   स्वराज्यस्थापनेच्या आधीच्या काळात व नंतरच्या काळात देखील   ग्रामीण जीवनात महाराचे स्थान हे पहिल्या प्रतीच्या बलुतेदाराचे होते. त्याशिवाय महार हे वतनदार देखील होते. महार समाजास बेदरच्या बादशाहाने सुमारे 52 हक्कांची सनद दिल्याचा उल्लेख मिळतो. ( स. 1475 ) या 52 हक्कांच्या प्राप्तीसाठी महारांना नेमून दिलेली कामे करणे अनिवार्य बनले. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे व ती म्हणजे बेदरच्या बहामनी बादशहाने जी काही 52 हक्कांची सनद महारांना दिली आहे ती फक्त सोमवंशी महारांना दिल्याचे त्या सनदेत नमूद केले आहे. या ठिकाणी काही प्रश्न उद्भवतात ते असे :- महारांना किंवा इतर कोणत्या जातीला अशा प्रकारचे 52 किंवा त्याहून कमी - जास्त हक्क देण्यात आले होते का ? अशा प्रकारच्या हक्कांची मागणी यावेळी बहामनी बादशहाकडे कोणी केली होती का ? कारण, सनदेमधील भाषा पाहता या हकांसाठी इतरही जाती उत्सुक असल्याचे दिसून येते आणि या 52 हक्कांच्या सनदेच्या पाठीमागे अतिशय भीषण दुष्काळाची पार्श्वभूमी आहे हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. याखेरीज अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे कि, सोमवंशी महार म्हणजे नेमके कोणते महार ? 52 हक्कांची जी सनद बहामनी बादशाहने महारांना दिली ती फक्त सोमवंशी महारांना दिल्याचे त्याच सनदेमध्ये नमूद केले आहे.
                   वरील निष्कर्षावरून काही नवीन प्रश्न उपस्थित होतात व ते म्हणजे (1) 52 हक्कांची सनद हि महारांच्या अस्पृश्यतेचा जर पाया समजली गेली तर ही अस्पृश्यता फक्त सोमवंशी महारांशी संबंधित असायला हवी. पण तत्कालीन व सद्यस्थितीतील वस्तुस्थिती काय आहे ? 
(2) पहिल्या प्रश्नातच दुसरा प्रश्न अंतर्भूत आहे व तो म्हणजे जर ती 52 हक्कांची सनद फक्त सोमवंशी महारांनाच मिळाली असे गृहीत धरले तर आज हे सोमवंशी महार आहेत कुठे ?  महार समाजातील विचारवंतानी आणि अभ्यासकांनी या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. 
                          शिवपूर्वकाळात महारांना ग्रामीण जीवनात महत्त्वाचे स्थान होते हे निश्चित पण ते अस्पृश्य होते असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. 
                   शिवाजीच्या काळात म्हणजेच मराठेशाहीमध्ये महारांचे स्थान हे पूर्ववत राहिले. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीची नोंद घेणे गरजेचे आहे व ती म्हणजे बहामनी बादशहाने सोमवंशी महारांना जी सनद दिली होती, त्या सनदेला वेगवेगळ्या राजवटींकडून वेळोवेळी मान्यता मिळवून घेण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. सामान्यतः वतनदार ज्याप्रमाणे राजवट बदलली कि शासनकर्त्याकडून आपल्या वतनास मान्यता मिळवून घेतो त्यातलाच हा प्रकार ! परंतु, या ठिकाणी हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे कि, बहामनी बादशहाकडून जी सनद सोमवंशी महारांना मिळाली त्या सनदेस परवानगी देताना त्यातील 52 हक्कांमध्ये आणि त्याबदल्यात महारांनी करायच्या कामांमध्ये प्रसंगानुसार बदल झाला असण्याची दाट शक्यता आहे.      
                  शिवाजीच्या लष्करात महारांना प्रवेश होता किंवा शिवाजीच्या सैन्यात महार लोकं होती असे सर्रास सांगितले जाते पण या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे कि शिवाजीच्याआधी देखील महार लोकं लष्करी वा तत्सम  सेवेत कार्यरत होते. जर अशी पूर्वपरंपरा नसती तर शिवाजीने महारांना लष्करात प्रवेशच दिला नसता. शिवाजी हा लोकोत्तर पुरुष होता हे मान्य ! परंतु, त्याच्या विचारातील पुरोगामीपणा अथवा क्रांती हि फक्त राजकीय आणि लष्करी क्षेत्रापुरतीच मर्यादित होती. सामाजिक बाबतीत त्याने फारशी क्रांतिकारक पावले उचलली नाहीत व हा काही त्याचा दोष नाही. तो ज्या काळात, समाजात वावरत होता त्या काळाची, समाजाची बंधने काही प्रमाणात तरी पाळणे त्यास आवश्यक असेच होते. सामाजिक किंवा जातींच्या बाबतीत शिवाजीचे धोरण कसे होते हे आपल्यास शिवाजीच्या अस्सल पत्रावरून अभ्यासता येऊ शकते. { जातींविषयक शिवाजीचे धोरण वा त्याची आज्ञा पुढील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे :- http://sanjaykshirsagar24.blogspot.in/2012/05/blog-post.html } 
                  शिवाजीचे जातींविषयक धोरण पाहिले असता काही शंका मनामध्ये निर्माण होतात. त्यातील प्रमुख म्हणजे शिवाजीला नेमके काय अपेक्षित आहे ? ब्राम्हणांनी आपला अध्ययन, विद्यादान व भिक्षुकीचा परंपरागत व्यवसाय करायचा कि उपजीविकेसाठी मिळेल तो धंदा करायचा ? कारण ; शिवाजीचे कित्येक मंत्री, सरदार हे ब्राम्हण होते. शिवाजीची जातींविषयक आज्ञा पाहता या सर्व ब्राम्हण सरदार - मंत्र्यांनी आपापल्या नोकऱ्या सोडून परंपरागत व्यवसाय करायला पाहिजे होते परंतु, तसे न करता ते क्षत्रियाचे काम करताना दिसतात. शिवाजीनंतर संभाजी छत्रपती बनला. त्याचा विश्वासू सल्लागार कवी कलश हा स्वतःला ' वर्णाश्रमधर्मप्रतिपालक '  म्हणवतो. { कवी कलशचे आज्ञापत्र :- http://sanjaykshirsagar24.blogspot.in/2012/05/blog-post_28.html } यावरून असेही म्हणता येते कि स्वतः संभाजी हा देखील वर्णाश्रमपद्धतीचा पुरस्कर्ता असावा. अन्यथा, त्याच्या सेवकाने अशा अर्थाची उपाधी स्वतःला लावून घेतली नसती, किंबहुना संभाजीने त्याला अशी पदवी धारणच करून दिली नसती ! 
                  यावरून शिवाजी व संभाजीच्या सामाजिक धोरणांतील अर्थ लक्षात येतो. सामाजिक प्रथांमध्ये फारशी ढवळाढवळ न करता व्यवहारात जातींचे फाजील स्तोम माजू न देण्याकडे त्यांचा कल असल्याचे दिसून येते. अव्वल मराठेशाहीत महारांना लष्करात प्रवेश तर होताच त्याशिवाय किल्य्यावर देखील त्यांची नेमणूक केली जात असे. किल्ल्यावरील मेटेकरी म्हणून जो रक्षक वर्ग असे त्यात महारांचा भरणा असे.  किल्लेदारीचे पद त्यांना दिल्याचे उल्लेख काही लेखकांनी केले आहेत पण त्यासाठी आवश्यक तो पुरावा त्यांनी दिला नाही. अव्वल मराठेशाहीमधील पुढील दोन उदाहरणे महारांचा सामाजिक दर्जा काही प्रमाणात स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहेत असे मला वाटते. ती 2 उदाहरणे खालीलप्रमाणे :- (1) औरंगजेब दक्षिणेत आल्यावर मराठ्यांचा व त्याचा दीर्घकाळ लढा जुंपला. या लढ्यात मराठ्यांप्रमाणेच अनेक जातींमधील लोकांनी देखील प्रामुख्याने सहभाग घेतला. यापैकी महार समाजातील शिदनाक या महार सरदाराचे उदाहरण या ठिकाणी पुरेसे आहे. त्याने सजातीय लोकांची एक पलटण उभारून मोगलांशी झुंज दिली. त्याच्या या पराक्रमाची दखल संभाजीपुत्र शाहूने घेऊन त्यास कळंबी हे गाव इनाम दिले. हे गाव त्याच्या वंशात पुढे इनाम म्हणून चालू राहिले. पेशवाईमध्ये देखील त्याच्या वंशजांनी सरकार चाकरी बजावली. खर्ड्याच्या प्रसिद्ध लढाईमध्ये उपरोक्त शिदनाकचा नातू शिदनाक  याने पेशव्यांच्या वतीने युद्धात सहभाग घेतल्याचा उल्लेख मिळतो. यावरून असे दिसून येते कि, पेशवाईअखेर पर्यंत तरी महारांना अस्पृश्य समजण्यात येत नव्हते. अन्यथा एका महार व्यक्तीस शाहू छत्रपतीने गाव इनाम दिलेच नसते. तसेच एका अस्पृश्याकडे पेशव्यांनी, छत्रपती नामधारी झाल्यावर, सदर गाव इनाम म्हणून चालू दिले नसते ! 
(2) वाई प्रांतातील नागेवाडी या गावाची पाटीलकी महार घराण्यात असल्याचा उल्लेख अस्सल कागदपत्रांमध्ये आढळून येतो. यावरून पाटीलकी पदावर फक्त मराठा जातीतील लोकांची नियुक्ती केली जात असे असा जो समज आहे तो निराधार असल्याचे दिसून येते. या दोन उदाहरणांवरून अव्वल मराठेशाहीमध्ये तरी महार अस्पृश्य असल्याचे दिसून येत नाही. 
                          पेशवाईमध्ये देखील महारांच्या स्थानास धक्का बसल्याचे किंवा त्यांची अवनती झाल्याचे दिसून येत नाही. अपवाद फक्त पेशवाई अखेरीचा ! पेशवाईमध्ये लष्करी सेवेत महारांचा दर्जा उंचावल्याचे दिसून येते. त्याकाळात लढाईआमध्ये परक्रम गाजवणाऱ्या व्यक्तीस ' उडत रुमाल ' हा बहुमान दिला जात असे व कित्येक प्रसंगी हा बहुमान महार व्यक्तींनी पटकावल्याचे नमूद आहे. याशिवाय शनिवारवाड्याच्या आत पहारेकरी म्हणून देखील महारांची नियुक्ती केली जात असे. यावरून त्यावेळी महारांची अस्पृश्यतेची कल्पना यावी. 
                           पेशवाईमधील महारांच्या या स्थानास एका नाजूक कारणाने धक्का बसला. शनिवारवाड्यातील एका स्त्रीचा व महार रक्षकाचा संबंध जुळून आला. हि बाब उघडकीस येताच पेशव्याने त्या महार पहारेकऱ्यास देहदंडाची शिक्षा दिली. परंतु एवढे करून पेशव्याचा राग शमला नाही तर पुणे शहरात प्रवेश करताना महार जातीच्या लोकांनी गळ्यात मडके  व कमरेस झाडाची फांदी अथवा खराटा बांधावा अशी त्याने आज्ञा देखील काढली. हि आज्ञा नेमक्या कोणत्या पेशव्याने काढली याचा उलगडा होत नाही. जेव्हा ते आज्ञापत्रक मला उपलब्ध होईल त्यावेळी या ब्लॉगवर ते प्रसिद्ध करण्यात येईल. पेशव्याने महार समाजास उद्देशून जी आज्ञा काढली ती बहुतेक पुणे शहरापुरतीच मर्यादित असावी. जर तसे नसते व हि आज्ञा सबंध राज्यात काढण्यात आली असती तर पेशव्याच्या लष्करातील महारांनी आपापल्या नोकऱ्या सोडून पेशव्यांच्या शत्रूंकडे धाव घेतली असती. नारायणराव पेशव्याने प्रभू लोकांच्या विरोधात अशाच प्रकाराची आज्ञा काढून आपला घात ओढवून घेतला होता हे इतिहासात प्रसिद्ध आहेच !  तेव्हा महारांनी देखील अशा पद्धतीचा एखादा प्रयत्न केलाच नसता असे म्हणता येत नाही. असो, यावरून असे सिद्ध होते कि, महारांना अवमानकारक जी आज्ञा पेशव्यांनी काढली होती ती फक्त पुणे शहरापुरती मर्यादित होती. कदाचित आसपासच्या गावांमध्ये देखील याचे पडसाद उमटले असतील. 
                      स. 1817 - 18 मध्ये इंग्रजांशी पेशव्यांनी जो अखेरचा निर्णायक लढा पुकारला त्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातील अठरापगड जातींनी दोन्ही पक्षांच्या वतीने सहभाग घेतला होता. पैकी महारांच्या बाबतीत बोलायचे झाले तर भीमा - कोरेगावच्या अनिर्णीत लढ्यामध्ये इंग्रजांच्या सैन्यातील महारांनी आपल्या पराक्रमाची शर्थ करून निर्णायक पराभव व त्यानंतर होणारी कत्तल टाळली. रायगडावर इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा किल्ल्याच्या बचावासाठी पेशव्याच्या सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. या संग्रामात महारांनी देखील किल्ला लढवताना आपल्या धन्यासाठी, ब्राम्हण पेशव्यासाठी मरण पत्करले !  
                         पेशवाई नष्ट झाल्यावर इंग्रजाची राजवट सुरु झाली. या राजवटीने महारांच्या पदरात फारसे काही पडले नाही. बहामनी बादशहाने त्यांना दिलेल्या सनदेची ब्रिटीश काळात परत एकदा उजळणी झाली. ग्रामीण जीवनात महार हा पहिल्या प्रतीचा बलुतेदार असून तसाच तो वतनदार देखील होता. वतनदारांच्या बाबतीत शिवाजी आणि इंग्रज यांचे धोरण जवळपास एकसारखेच होते. त्यांनी वतने कायम राखली, वतनदार देखील कायम राखले पण त्यांचे अधिकार काढून घेऊन त्यांना सरकारी नोकर बनवले. इंग्रजांच्या या धोरणामुळे महारांचे अधिक नुकसान झाले असे म्हणता येत नाही. याचे कारण म्हणजे, महारांनी बहामनी बादशहाच्या सनदेस इंग्रजांच्या कडून मान्यता मिळवून घेऊन स्वतःचा घात करून घेतला. यामुळे त्यांना 52 हक्कांच्या बदल्यात काही अनिवार्य कामे करणे बंधनकारक बनले. त्याशिवाय बलुतेदार म्हणून जी काही त्यांच्यावर जी काही जबाबदारी होती ती पार पाडणे,  वतनदार म्हणून सरकारी आणि  गावाची कामे पार पाडणे अशा तिहेरी जबाबदाऱ्या पार पाडणे अनिवार्य असे बनले. एकूण, महारांनी स्वतःच्या हातून स्वतःच्या पायात ' गुलामगिरी ' च्या, ' दारिद्र्याच्या ' शृंखला अडकवून घेतल्या असे म्हणता येते !
             ब्रिटीश काळात महारांच्या सामाजिक दर्ज्यात कमालीची घसरण होत गेली. पेशवाई अखेरीस पुणे शहरात त्यांच्यावर गळ्यात मडके व कमरेला फांदी / खराटा बांधण्याची जी शिक्षा किंवा सक्ती केली गेली होती ती ब्रिटीशकाळात देखील कायम राहिली. इतकेच नव्हे तर या प्रथेची अंमलबजावणी पेशवे काळात फक्त पुणे शहरापुरती मर्यादित होती ती ब्रिटीश काळात सर्वत्र प्रचलित झाली ! ब्रिटीश राजवटीने अशा प्रकारे महारांच्या सामाजिक अवनतीस, त्यांच्या अस्पृश्य होण्याच्या क्रियेस एकप्रकारे हातभार लावला असे का म्हणू नये ? 
   
संदर्भ ग्रंथ :- 
1) महार कोण होते ? :-  संजय सोनवणी 
2) शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास :- अनिल कठारे 
 3) मराठे व इंग्रज :- न. चिं. केळकर 

34 comments:

Anonymous said...

can you please refer as Shivaji Maharaj? It should be easy to make a change.

NITIN DIVEKAR said...

Your theory of illicit relationship of a mahar soldier with a Peshawa lady does not hold any ground since there are proofs that even some Maratha saradar's had illicti relationship with Peshawa ladies and did not make any difference for Maratha's. i.e. Dhanaji Jadhav is considered as biological father of Bajirao.

संजय क्षिरसागर said...

नितीनजी, तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ?

rahul said...

our theory of illicit relationship of a mahar soldier with a Peshawa lady does not hold any ground since there are proofs that even some Maratha saradar's had illicti relationship with Peshawa ladies and did not make any difference for Maratha's. i.e. Dhanaji Jadhav is considered as biological father of Bajirao.
above facts not proved beyond doubt and one can say viceversa also...without any proofs you can say anything as you are free to say anything...

Anonymous said...

अरे.....महाराजाना तू एकेरी नावाने संभोधतो.....मुर्खा....

संजय क्षिरसागर said...

मूर्ख, भेकड माणसे स्वतःच्या नावाने कधीच आपले मत नोंदवत नाहीत.

milind said...

रायगडचा किल्लेदार हा महार होता ..शिवाजी महराजांच्या काळात असे बाबा साहेब एकदा रायगडावरील भेटीत बाबा साहेब बोलेले होते ..!!

संजय क्षिरसागर said...

milind,
कोणत्या बाबासाहेबांविषयी आपण बोलत आहात ? आंबेडकर कि पुरंदरे ??

Rajendra Jadhao said...

सोमवंशी हि महार समाजातील एक पोटजात आहे. हि पोटजात महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, नागपूर हा भाग सोडल्यास उर्वरित भागात सापडते. बौद्ध बनल्यानंतर या पोटजाती आता नष्ट झालेल्या आहेत.

संजय क्षिरसागर said...

Rajendra Jadhao,
माहीती दिल्याबद्दल धन्यवाद…!

Vikas Godage said...

यामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होत नाही.
महार समाज हा पूर्वापार वेशीबाहेरच का राहतो?
अगदी बुद्ध काळात पण वेशी बाहेर राहणारे लोक होतेच तेव्हा पण अस्प्रषता होतीच कि?
अस्पर्षता फक्त मारासाठी नसून ती संपूर्ण भारतात होती त्यामुळे अस्पृशता कधी पासून चालू झाली याचे संशोधन करताना पूर्ण भारताचा वैदिक , सिंधी आणि सगळ्याच संधार्भाचा अभ्यास करावा लागेल

संजय क्षिरसागर said...

Vikas Godage, साहेब, आपले प्रश्न योग्य असले तरी या ठिकाणी गैरलागू आहेत. येथे एक विशिष्ट काल विवेचनासाठी निवडला आहे. आपल्या प्रश्नांची उत्तरे आपणांस योग्य त्या संदर्भ ग्रंथांत मिळतील. मी माझी मते ज्या ग्रंथांच्या आधारे व्यक्त केली आहेत त्यांची नावे लेखाच्या अखेरीस नोंदवली आहेत. ती देखील आपणांस उपयुक्त पडतील.

Rajendra Jadhao said...

विश्वास गोडगे, बुद्धकाळात अस्पृश्यता असण्याचा पुरावा पाली ग्रंथांत सापडत नाहि. असो. लेखकांनी म्हटल्याप्रमाणे तुमचे प्रश्न येथे गैरलागू आहेत.

Rajendra Joshi said...

चोखामेळा, त्यांची पत्नी, मुलगा आणि मेहुणा यांचे अभंग प्रसिद्ध आहेत. भाषेच्या सौंदर्यावरून हे लोक शिक्षणापासून वंचित वाटत नाहीत. त्यांच्या अभंगांत "यातिहीन" असल्याबद्दल खंत आढळते. जन्मतःच / पिढ्यानपिढ्या असलेल्या अन्यायाची जाणीव एखाद्याला असलेली दिसते, पूर्ण कुटुंबाला ती जाणीव / चीड असणे याचा अर्थ - त्यांची "याति" त्यांच्यापासून काढून घेतली असावी का? चोखोबांचा मृत्यू गावकूस बांधायच्या सुलतानी कामावर जबरदस्तीने जुंपले असताना झाला. गावकूस ही भारतीय पद्धत आहे की अरबी / अफगाणी? भारतात गावे नद्यांच्या काठी वसलेली असतात, त्यात गावाभोवती भिंत बांधणे शक्य / आवश्यक दिसत नाही. पण अरबस्तानात गावे पाण्याच्या झऱ्याभोवती असल्यामुळे गावाभोवती भिंत शक्य वाटते. तसे असेल तर ही पद्धत सुलतानी काळात सुरू झाली का? चोखोबांच्या (तोवर लढवय्या असलेल्या) जातीला (इस्लाम न स्वीकारणाऱ्यांना?) शस्त्र सोडून मेलेल्या गुरांचे आणि गावाबाहेर चे काम देण्यात आले असावे का?

संजय क्षिरसागर said...

Rajendra Joshi, प्रतिक्रियेविषयी सर्वप्रथम आपले आभार !
चोखामेळा व त्याच्या कुटुंबियांच्या अभंग रचनेवरून ते साक्षर होते हे तर स्पष्टच आहे. राहिला भाग गावकुस बांधण्याचा तर गावाभोवती तट बांधण्याची पद्धत अस्थिर राजकीय काळात सर्वत्र प्रचलित होती. याला प्राचीन संस्कृत्या देखील अपवाद नाहीत. इस्लाम न स्वीकारलेल्या चोखोबाच्या लढवय्या जातीला शस्त्र सोडून मेलेल्या गुरांचे व गावाबाहेरचे काम दिले असावे का ?, हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचे अर्धे उत्तर तर तुम्हीच दिले आहे. इस्लाम न स्वीकारल्याबद्दल जर चोखोबांच्या जातीला शस्त्र सोडून मेलेल्या गुरांचे व गावाबाहेरचे काम दिले असे जर गृहीत धरले तर मग चोखोबांचे जातवालेच तेवढे हिंदू ठरतात. बाकी धर्मांतरित मुसलमान !

Rajendra Joshi said...

श्री क्षीरसागर, अन्य जातींचे हिंदू लोक आज समोर आहेत, म्हणजे चोखोबांच्या जातीवर इस्लाम स्वीकारण्याची जबरदस्ती (आणि न स्वीकारणाऱ्यांना अस्पृश्यता) झाली नाही, हा तर्क समजला नाही. इस्लामचे राज्य स्थापन करत असताना लढवय्या जमातीबद्दल पहिली असुरक्षितता वाटून त्यांच्यावर प्रथम सक्ती केली जाणे सुसंगत आहे. ज्यांना राज्य करायचे आहे, ते एकदम सर्वांशी थेट शत्रुत्व घेतील का? ज्यांच्या हातात शस्त्र नाही किंवा जे काही प्रकारची ताबेदारी पत्करून / वतनांच्या, नोकऱ्यांच्या मोबदल्यावर खुश आहेत - त्यांना नामोहरम करणे ही सुलतानी आक्रमकांची Priority असणार नाही. पुढे ब्रिटिशांनी देखील बंड करणाऱ्या रामोशी, बेरड अशा जमातींना गुन्हेगार ठरवून कुंपणाआड टाकले होते, ते अशाच कारणामुळे.

संजय क्षिरसागर said...

Rajendra Joshi,
१) इस्लामचे राज्य स्थापन करत असताना लढवय्या जमातीबद्दल पहिली असुरक्षितता वाटून त्यांच्यावर प्रथम सक्ती केली जाणे सुसंगत आहे.
उत्तर :- लढवय्या आणि बिनलढाऊ जाती - जमाती हि अगदी अलीकडची संकल्पना आहे. तेव्हा इस्लामी आक्रमकांनी हिंदूंची अशी विभागणी केली हे गृहीत धरणे चुकीचे आहे.
२) ज्यांना राज्य करायचे आहे, ते एकदम सर्वांशी थेट शत्रुत्व घेतील का? ज्यांच्या हातात शस्त्र नाही किंवा जे काही प्रकारची ताबेदारी पत्करून / वतनांच्या, नोकऱ्यांच्या मोबदल्यावर खुश आहेत - त्यांना नामोहरम करणे ही सुलतानी आक्रमकांची Priority असणार नाही. पुढे ब्रिटिशांनी देखील बंड करणाऱ्या रामोशी, बेरड अशा जमातींना गुन्हेगार ठरवून कुंपणाआड टाकले होते, ते अशाच कारणामुळे.
उत्तर :- ज्यांना राज्य करायचे आहे ते प्रथम प्रस्थापितांना नामोहरम केल्याखेरीज सत्तेवर कसे येतील ? इंग्रजांनी देखील आधी प्रस्थापित राजसत्ता आपल्या अंमलाखाली आणल्या आणि नंतरच बंड करणाऱ्या समुदायांवर गुन्हेगारीचा शिक्का मारला.

Ravindra Sawant said...

काही तरी चुकीचा अर्थ सोनवणी यांनी लावलेला दिसतो आणि महत्वाचे म्हणजे साहेब ५२ हक्क हे समाजाच्या हितासाठी होते स्वतःहून गुलामी स्वीकारली नाही त्या ५२ हक्कात कोणता गुलामी स्वीकारल्याची माहिती आहे अमृत नाक महार याने जेव्हा ५२ हक्क मिळवले तेव्हा सैन्यात त्यांची स्वतंत्र फौज निर्माण केली दुसरी गोष्ट म्हणजे महार हि जात नाही हे समजून घ्या लोह युगाची निर्मिती केली त्या लोकांचा नाव हे महार आहे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत नागवंशी लोकांची ओळख आहे महार हे काही जात नसून एक युगाचा निर्माता आहे आज जे मराठा आहेत त्यांचा सुद्धा बाप हा ,महार आहे याचा पुरावा आहे अनेक ठिकाणी उल्लेख सुद्धा आहे

Sanjay Kshirsagar said...

१) ५२ हक्क समाजाच्या हितासाठी होते, स्वतःहून गुलामी स्वीकारली नाही
या विधानांचा नेमकं अर्थ काय ? या ५२ हक्कांच्या बदल्यात जी कामं करायची होती त्याचे स्वरूप उत्तरोत्तर कसे विकृत बनत गेले हे तुम्हाला माहिती नाही काय ?

२) महार हि जात नाही. लोह युगाची निर्मिती केली त्या लोकांचे नाव हे महार आहे.
हि दिव्य माहिती तुम्हाला कुठे मिळाली ? लोहयुगाचा आरंभ आणि प्रचलित जातींच्या उल्लेखांचे काळ यातील अंतर तरी लक्षात घ्या.

3) आज जे मराठा आहेत त्यांचा सुद्धा बाप मराठा आहे याचा पुरावा आहे.
कमाल आहे ! इतक्या पुरातन गोष्टीचे पुरावे शोधणारा इतिहासकार खरोखरच महान म्हटला पाहिजे.

Tukaram Chinchanikar said...

पेशवाईमध्ये तथाकथित महार समाजावर अन्याय होत होता आणि त्यांच्यावर झाडू, मडकी हे लावली असायची ह्या विधानाला काडीमात्र आधार नाही. आंबेडकर यांनी हे विधान चुकून केले होते आणि नंतर त्यांनी त्याबद्दल माफी मागितली आहे. त्यामुळे पेशवाईबद्दल अकारण खोटे नाटे आरोप करणे बंद करा

Sanjay Kshirsagar said...

Tukaram Chinchanikar, समग्र लेख न वाचता विशिष्ट भाग वाचून प्रतिक्रिया य्याक्त करणे प्रथम बंद करा.

Anonymous said...

बरोबर आहे Sanjay Kshirsagar....

Sanjay Kshirsagar said...

Anonymous धन्यवाद !

Amol Mhaske said...

Blogger Tukaram Chinchanikar said...
पेशवाईमध्ये तथाकथित महार समाजावर अन्याय होत होता आणि त्यांच्यावर झाडू, मडकी हे लावली असायची ह्या विधानाला काडीमात्र आधार नाही. आंबेडकर यांनी हे विधान चुकून केले होते आणि नंतर त्यांनी त्याबद्दल माफी मागितली आहे. त्यामुळे पेशवाईबद्दल अकारण खोटे नाटे आरोप करणे बंद करा

kuthe ullekh aahe yach....

Anonymous said...

६ जुलै १९३६ च्या दैनिक केसरी च्या अंकामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी (य.न. केळकर यांच्या पत्रास ) पत्रोत्तर लिहून मडके व झाडूचा उल्लेख यास लिखित पुरावा नाही, वृद्धांकडून ऐकलेली हि दंतकथा आहे हे नमूद केले आहे.

Anonymous said...

झाडू आणि मडके अशा दंतकथा वृद्धांकडून आपोआपच कशा काय प्रसारीत होतील ? भीमा कोरेगावचा इतिहास सुद्धा अशाच स्थानिकांच्या सांगण्यातून पुढे आला. महारांचा इतिहास कशाला कुणी लिहून ठेवील ? जी गोष्ट घडली आहे त्याबद्दल दंतकथा असणारच. काल्पनिक कथा रचायला महारांकडे काय कारण असेल ? तिला पुरावा नाही म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांनी नोंदी ठेवल्या नाहीत असे म्हणा. बाबासाहेबांनी केसरीत कधी लिखाण केले आहे ? केसरीने त्यांच्या वृत्तपत्राची पेड जाहीरात सुद्धा नाकारली होती. तर मग त्यांचा लेख कसा काय छापला ? त्यांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे वृत्त द्यायलाही नकार दिला होता. पण खूपच गर्दी झाल्याने विपर्यस्त वृत्त छापले. सबब केसरीमधे बाबासाहेबांनी खुलासा दिला याचे पुरावे दिले गेले पाहीजेत. हा कांगावा आहे.

Anonymous said...

भयाण चुका आहेत. निष्कर्ष सुतावरून स्वर्गाला स्वरूपाचे आहेत. वाई इथल्या पाटलांची पाटीलकी सवर्णांनी असूयेने काढून घेतल्यावरून त्यांनी प्रांताधिका-याकडे तक्रार नोंदवली. त्याने वाईजवळील किल्ला जिंकून दिला तर पाटीलकी देतो असा धूर्त खोडा टाकला. महारांनी थोडकी संख्या असूनही किल्ला जिंकला. प्रांताधिका-याने पाटीलकी परत करण्याचा निर्णय घेतला पण गावच्या विरोधामुळे तो फिरवला. आता जर महार अस्पृश्य नव्हते तर विरोधाचे कारण काय असावे ?
शिवाय या एकाच उदाहरणावरून महार अस्पृश्य नव्हते असा निष्कर्ष कसा काय काढला ?
सैन्यात भरती झाले म्हणजे ते अस्पृश्य नव्हते या तर्काला काय आधार ? युद्धाच्या तोंडावर महारांना सैन्यात घेत. युद्ध संपल्यानंतर त्यांना गावी परतावे लागे ही गोष्ट ठाऊक आहे का ?

Rajendra Joshi said...
This comment has been removed by the author.
Rajendra Joshi said...

डॉ. आंबेडकरांनी ६ जुलै १९३६ रोजी केसरीमध्ये असे पत्र लिहिले होते - ही गोष्ट वरील अन्य कोणाच्या कॉमेंटमध्ये आली आहे. हे पत्र त्यांनी ५ जून १९३६ च्या एका वाचकाच्या पत्राला उत्तर म्हणून दिले आहे. गळ्यात गाडगे वगैरेला पुरावा नसल्याचे डॉ. आंबेडकरांनी या पत्रात मान्य केले आहे, पण या सांगोवांगीच्या गोष्टी खऱ्या असल्याचा दावाही केला आहे. राजारामशास्त्री भागवतांनी त्यांच्या पुस्तकात १८८७ रोजी केलेल्या एका विधानाला त्यांनी “आधार” म्हणून दर्शवले आहे. पेशवाई संपल्यानंतर साठ वर्षांनी भागवतांनी "असा हुकूम पेशव्यांनी फिरवला" असे विधान केलेले आहे. आज संपूर्ण पेशवे दप्तर उपलब्ध आहे. असा कोणताही हुकूम त्यात दिसत नाही. डॉ. आंबेडकरांनी या पत्रात दैवज्ञ ब्राह्मण (सोनार) यांच्या जिभा पेशव्यांच्या हुकुमाने कराडच्या ब्राह्मणांनी कापल्या असे विधान केले आहे. अशा आशयाचे कागदपत्र एकाकडे आहे - पण तो ते दाखवायला तयार नाही - हा या विधानाला पुरावा म्हणून दिला आहे. पेशव्यांनी पुण्याला बसून कराडच्या ब्राह्मणांकडून सोनारांच्या जिभा का कापवून घेतल्या असतील? पूर्वी कापण्या तोडण्याच्या शिक्षा सैनिक देत असत ना? कराडचे ब्राह्मण जिभा कापण्याच्या कलेत तरबेज असावेत का? असे कागदपत्र कोणाकडे आहे - त्याची ते दाखवायची तयारी नाही, तर त्या कागदपत्राचे अस्तित्व आणि त्यात काय लिहीले हे कसे कळले? एखादे कागदपत्र मिळत नाही - हा त्यात लिहिले असा दावा केलेल्या वर्णनाचा पुरावा होतो का? पावणेदोनशे वर्षांपूर्वीच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास अशा लिखाणांचे मूळ ध्यानात येईल. यासाठी लोकहितवादी या नावाने लिहिणाऱ्या देशमुखांचे लिखाण हे सर्वात चांगले उदाहरण ठरेल. ब्रिटिश कंपनी सरकार आल्यावरच्या पहिल्या काही दशकातील पुण्यातील देशमुख हे प्रतिष्ठित व्यक्ती होते. प्रतिष्ठित म्हणजे कंपनीसरकार च्या मर्जीतील. पेशवाईच्या नावाने बंड होऊ नये, त्यासाठी लोकाच्या मनांत पेशव्यांबद्दल राग निर्माण व्हावा - हा कंपनीसरकारचा पहिला उद्देश होता. कंपनीविरुद्ध उभे राहणाऱ्याला थेट फाशीवर लटकवायचा तो काळ होता. उदा. उमाजी नाईक. अशा काळात लोकहितवादी यांनी ब्रिटिश राज्य कसे चांगले आहे, त्यातून लोकांची प्रगती कशी होणार आहे अशा गोष्टी लिहिल्या, त्याचबरोबर त्यांनी पेशवाईबद्दल लिहिलेल्या - घटकंचुकी, रस्त्यावरील नग्न शर्यती, नोकरांनी एक लग्न जास्तीचे करून अशी स्त्री पेशव्यांच्या वापरासाठी पुरवणे - अशा अनेक चित्तरकथा आजही अत्यंत आवडीने चघळल्या जातात. कारण स्त्री-विषयक अशा पुरुषी Fantasy कोणत्याही साहित्यात सर्वाधिक आवडीने वाचल्या जातात. आज इंटरनेटवर पोर्नोग्राफी सहज उपलब्ध आहे - त्याकाळी नव्हती. या गोष्टींनाही कसलाही पुरावा नाही. सत्तेवर असलेल्या एखाद्या पेशव्याला जास्तीच्या स्त्रिया उपभोगासाठी हव्या असतील तर असा अन्य कोणी लग्न करून मग त्यांना आणून ठेवण्याचा - डोक्यामागून उलट घास घेण्याची त्याला काय गरज असावी? पण अशी बाष्कळ विधाने पुढे अनेकांनी पुरावा म्हणून वापरली. अगदी प्रबोधनकार ठाकरे यांनीही. त्या काळात लिहिल्या जाणाऱ्या सगळ्याच गोष्टी पुरावे तपासून लिहिल्या जात असाव्यात असे दिसत नाही. राजकीय परिस्थिती याला जबाबदार असावी. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सत्यशोधक म्हणवणाऱ्या अनेकांचा अशा लिखाणांना मोठा हातभार लागलेला आहे. या काळात बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, संस्थानाच्या कारभारात ब्रिटिशांमार्फत हस्तक्षेप करणारे रेसिडेंट ऑफिसर - बहुतांशी अशा लोकांच्या ताब्यात सत्यशोधक समाज होता. ब्रिटिश सरकारचे राजकारण - हा अशा प्रचाराच्या मागे असलेला सर्वात मोठा हेतू होता. काही खरे - आणि पुष्कळ खोटे घेऊन त्याला भावनात्मक बनवणे आणि राजकीय उद्देशाने वापणे - हा पोस्ट ट्रुथ या नावाने आज वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा अर्थ आहे. तेच काम त्या काळात केले गेले आहे.

Unknown said...

क्षिरसागर
इतिहास लिहताना आपल्या उंचीनुसार उल्लेख करावा महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अथवा छत्रपती संभाजी महाराज असो उललेख एकेरी आलाय तो कडा व पुढे चूक सुधार

Unknown said...

महारख्ख या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे महार होय
सातवाहन कालीन राजवटी मध्ये या महारांचे काम म्हणजे गावचे रक्षण करणे हे होते
त्याचप्रमाणे गावात चोरी झाली तर त्याची भरपाई महाराला द्यावी लागे गावतील दळणवळणाचे काम महाराला करावे लागे त्यामुळे महार गावाभाहेर रहायचे तसेच जमिनी विषयक त्यांची साक्ष ही प्रथम ग्राह्य धरली जाई

Ankit said...

संजय क्षीरसागर
आंध्र प्रदेश मध्ये mala नावाने एक कास्ट आहे....मला असे वाटते की ते महार लोकच आहेत...जसे ते जिथे राहत होते त्याला mohariwada mhntat...यावर काही माहिती मिळू शकेल काई

Unknown said...

लेख वाचताना महाराजांना एकेरी संबोधून लेखकाने स्वतःच्या बुद्धी चा व इराद्याचा परिचय करून दिला हे मात्र नक्की.

shubham garud said...

श्री. क्षीरसागर, आपल्या लेखावरून असे माहित होते की, जातीची काही बंधने व त्याविषयीच्या काही सर्वसाधारण धारणा ह्या वास्तवात तत्कालीन लोकांच्या प्रासंगिक गरजांमुळे निर्माण झाल्या व मोडल्याही गेल्या. संक्षेपात सांगायचे तर, व्यावहारिक गरजा ह्या अनेकदा जातीची बंधने तोडण्यात यशस्वी झाल्या असून जातीव्यवस्थेचे पारंपारिक वर्णन हे वास्तवाच्या विरुद्ध आहे. जर असे असेल, तर ज्या इंग्रज काळात पुण्याची मडके रूढ संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाली, त्या सैन्याला विजय मिळवून देणारे युद्ध महार समाजाच्या शौर्याचे प्रतिक म्हणावे की त्यांच्या आगामी दुर्दशेचा पाया म्हणावे? हा प्रश्न पडतो, तसेच आता जो या युद्धाचे अनैतिहासिक चित्रण करण्याचा प्रयत्न चालू आहे, हा जातीवादी इतिहासलेखनात मोडेल का? हाही प्रश्न पडतो. कृपया आपण माझ्या टिप्पणीवर प्रतिक्रिया द्यावी.