बुधवार, ९ जानेवारी, २०१३

इतिहास प्रेमींचा मित्रमेळा

दिनांक १३ जानेवारी २०१३ रोजी दुपारी साडे तीन वाजता आयोजित केलेल्या मित्रमेळ्याचे स्थळ पुढील प्रमाणे आहे.

स्थळ: पनवेल कल्चरल सेंटर
आशीर्वाद बिल्डींग, काळे हॉस्पिटल शेजारी.
पनवेल.
कार्यक्रमाची वेळ - दुपारी साडेतीन ते संध्याकाळी साडे सात 
       मित्रमेळा दुपारी साडे तीन ते साडे सात या दरम्यान नियोजित स्थळी घडेल. चहापान, नाश्ता आणि हॉल यांचा खर्च प्रत्येकी अंदाजे रुपये ५०/- (पन्नास फक्त) असेल.

हा परिसंवाद आहे, व्याख्यान नाही. अजून पर्यंत किमान पाच ते सहा लोकांनी आपापल्या आवडीच्या विषयावर एक लहानसा talk देण्याचे कबुल केले आहे..

श्री. राजेशजी खिलारी - मोडीलिपी आणि तिचे महत्व आणि संवर्धन.
श्री. सौरभजी वैशंपायन - थोरले बाजीराव आणि त्यांनी पालखेड मोहीम अधिक शिवछत्रपतींचा दक्षिण दिग्विजय
श्री. अजयजी देशमुख - प्राचीन आणि मध्ययुगीन समुद्री मार्ग आणि व्यापार उदीम
श्री. संजयजी क्षीरसागर - पानिपत
श्री. अंबरीशजी फडणवीस  - थोडेसे पाकिस्तान विषयी..

वरील वक्ते जरी बोलणार असले तरी हा एक मुक्त परिसंवाद आहे. भारतीय बैठकीत सगळे बसतील आणि प्रत्येकाला जसजसे मुद्दे सुचतील तसतसे त्यांनी बोलावे. गोष्टी जितक्या informal असतील तितके बरे. तसेच कुणालाही बोलावेसे वाटले तर ते बोलू शकतात. डिजीटल प्रोजेक्टर चा बंदोबस्त देखील होत आहे. तरी कुणालाही स्लाईड बनवून दाखवायच्या असतील तर ती देखील सोय आहे.

रस्ता न सापडल्यास संपर्क साधा -
चिराग पत्की- ९७७३१०७९८२

परिसंवादाविषयी इतर कुठलेही प्रश्न असतील तर संपर्क साधा
अंबरीष फडणवीस - ९००४९४६९१५

तरी या मेळाव्यास यावे हे आग्रहाचे आमंत्रण !!!

धन्यवाद,
या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत श्री. अंबरीषजी फडणवीस. त्यांच्याच कल्पनेतून इतिहासप्रेमींचा एक मित्रमेळा आयोजित केला जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: