सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

शिवाजी व कुडाळकर सावंतांमधील तहनामा





ले. १ ]                       [ श. १५८० फा. व. ७  
(४११) ]                      [ ता. ५ मार्च १६५९
                     श्री
सन १०६८ फसली                   फेरीस्त नंबर
       
 तहनामा राजश्री खेम सावंत व लखम सावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पीतांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला सुरु सन तिस्सा खमसैन अल्लफ

प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा, निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी. खांसा जातीने येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे होईल तेव्हां येत असावे.                           कलम १

किल्ले फोंडे प्रांत तालुका घेऊन हुजर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावे.       कलम १

स्वराज्य साधनाच्या ठायी वकीलापाशी मध्ये राहून तुरुक लोकांचे साधन करावे.                               कलम १

प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजुरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणूकीबद्दल हुजूर अमल पैकी पावते करावे.                                     कलम १

प्रांत मजकूरची देशकत वतने तुमची व बहादूर किताब अजरा [ मऱ्हा ] मत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणी तुमच्या स्वाधीन केली आहेत. तेथे दस्तान करून जतन करावी. तेथे हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे.                       कलम १

शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७. एकूण पांच कलमे करार करून तहनामा दिला असे " मोर्तब. "


टीप :- पत्र जसे छापले आहे तसे उतरवण्याचा प्रयत्न केल्याची नोंद घ्यावी.

संदर्भ ग्रंथ :- काव्येतिहास संग्रहांत प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रें यादी वगैरे लेख
संपादक :- गो. स. सरदेसाई, या. मा. काळे व वि. स. वाकस्कर.         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: