बुधवार, ५ एप्रिल, २०१७

माळव्याच्या वाटणी संदर्भात दोन पत्रे





पत्र. क्र. ८७

धार संस्थांचा इतिहास, लेखक }                          { २६ मे १७२८
लेले. ओककृत, भाग २ रा, पृ. २९ }                               
                                    श्री
             म|| अनाम देशमुख व देशपांडे प||
                       रतलाम सुबे मालवा यांसी
     बाजीराऊ बलाळ. प्रधान सुहूरसन तिसा आशरेन मया व अलफ प|| मजकूर पेशजीच्या मुकाशियाकडून दूर करून हल्ली चिमणाजी बलाळ यांजकडे दिला आहे त्यांणी आपले तर्फेने मुकासा वाटून दिला बी|| ----
राजश्री उदाजी पवार                       राजश्री मल्हारजी होळकर
याजकडे प|| .||.                            याजकडे प|| निमे .||.
  येणेप्रमाणे निमे निम दोघाजणास मुकासा दिला आहे ; तरी तुम्ही यांशी रुजू होऊन मुकास बाबेचा वसूल सुरळीत यांजकडे देणे छ २७ सवाल आज्ञा प्रमाण.









पत्र क्र. ८९                      चिमाजीचे बाजीरावास पत्र

पे. द. १३ }                                    { पैवस्ती १० - १० - १७२९
पृ. ४९, प. ५६ }

पा| ( पाठवले ) छ २७ रा|वल
संध्याकाल
                                श्री
पु|| ( पुरवणी पत्र ) अपत्ये चिमणाजीने कृतानेक नमस्कार उपरी. येथील क्षेम ता| ( तागाईत ) छ २६ रबिलोवल यथास्थित असे. पहिल्या तहानामियात पवारास मालवा तिजाई ( तिसरा हिस्सा ) मोकासा होता त्याप्रमाणे आम्ही त्यास द्यावयास सिध आहो. येसे असता हाली त्यानी निमे मालवा मोकास द्यावा येसा आड घातला आहे. त्यास सुभेदाराचेहि ( मल्हारराव होळकर ) विचारे त्यास निमे मालवा मोकास द्यावा यैसे आहे. परंतु आमचे विचारास हे गोस्ट येत नाही. परंतु सुभेदारादेखता आम्ही स्वामीस पत्र ( दुसरे पत्र ) लिहिले आहे त्याचे उतर पस्ट येक स्वामीनी ल्याहावे जे तिजाई मालवा जो पहिले मुकासा आहे त्या प्रमाणे हाली देऊ, जाजती देत नाही. आणि हवाला ( मुखत्यारी, अधिकार ) अगर येक रुपया नख्त द्यावयासी मिलत नाही येसे ल्याहावे व पोकळ समाधानाच्या थोरपणाच्या गोष्टी ज्या लिहिणे त्या कागदात ल्याहाव्या. परंतु कारभाराचा जाब पष्ट ल्याहावा. तो त्यास दाखऊ व स्वामीचे विचारे निमे मालवा कबूल करावा येसेच आले तर ते पत्र निरालेच आम्हास ल्याहावे. मग जैसा विचार बनेल तैसा करू. पैकीयाची गोष्ट तो स्वामीनी मान्य केलीच आहे. परंतु त्यास दाखवावयाचे पत्र ल्याहाल त्यात येक रुपया द्यावयास अनकूल पडत नाही येसे ल्याहावे. ये गोस्टीचा विचार तात्यास बोलाऊन करणे. विचार तो करून उतर पाठवावे.  


संदर्भ ग्रंथ :-
१) साधन परिचय अर्थात महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास :- संपादक - द. वि. आपटे, रा. वि. ओतुरकर  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: