शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

सवाई माधवराव पेशव्याचा अपघात वा आत्महत्येचा प्रयत्न ?




 नं. ३६४४                        ता.  २६ ऑक्टोबर १७९५
                        श्री
           श्रीमंत राजश्री बाळासाहेब स्वामींचे सेवेशी
 विनंती सेवक धोंडो बापूजी जोशी. दोन्ही कर जोडून त्रिकाळ चरणांवर मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना तागायत आश्विन शु. १३ तिसरा प्रहरपावेतो सेवकाचे वर्तमान यथास्थित असे. विशेष. इकडील सविस्तर पेशजी चंदा सांडणीस्वार याजबरोबर लिहून पाठविले होते. दसऱ्याच्या सुमारे येऊन पावला असेल. श्रीमंत राजश्री रावसाहेब यांजला शरीरी समाधान नव्हते. आश्विन शु. १२ रविवारी दोन तीन घटका दिवस सुमारे श्री गणपतीचे दिवाणखान्यावर माडीवर राव निजत होते तेथून पूर्वेचे अंगचे कवाड उघडून खाली उडी टाकिली. खाली कारंज्याचा हौद होता त्यांत पाडले. दातांस व हातांस व गालास व पाय इतके लागले. परंतु पाय भारी दुखावला. आणतील हाड मांडीजवळ मोडले. कांबी लावून बांधिले. फार पायाचे दुःख आहे. हे सर्व मजकूर राजश्री बाळाजी विष्णु सहस्त्रबुद्धे विसाजी नारायण वाडदेकर याणी वाड्यांत जाऊन रूबरू राव याजला पाहून वडिलांकडे वर्तमान कच्चे लिहून पाठविले असेल. राव यांची प्रकृति ठीक नाही. दैवी मानवी उपाय बहुत होत आहेत. श्रीहरी आरोग्य करील. बहुत काय लिहिणे सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना.         

 संदर्भ ग्रंथ -
१) ऐतिहासिक लेखसंग्रह भाग - ९ :-  वासुदेव वामन खरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: