रविवार, १७ ऑगस्ट, २०१४

पेशवाईतील फर्मानबाडीचे समारंभ


    सन १७९२ मध्ये महाजी शिंद्याने सवाई माधवराव पेशव्याच्या नावे   मोगल बादशाहकडून मिळवलेल्या वकील - इ – मुतलकी पदाचा व नालखीचा बहुमानाचा स्वीकार करण्यासाठी फर्मानवाडीचा पुण्यामध्ये समारंभ आयोजित करण्यात आला होता. पेशवाईमधील हा जणू काही पहिलाच समारंभ असल्याचे अनेक इतिहासकार सांगत होते आणि माझाही असाच समज होता. परंतु यापूर्वीही असे तीन प्रसंग होऊन गेले होते, त्यांची माहिती खालीलप्रमाणे :-

१) सन १७४५ मध्ये नानासाहेब पेशव्याचा भेलशा येथे मुक्काम असताना फर्मानवाडीचा पहिला दरबार झाला. दिल्लीतील पेशव्याचा वकील हिंगणे याने मोगल बादशाहकडून आणलेल्या बहुमानाचा नानासाहेब पेशव्याने स्वीकार  केला. [ राजवाडे खंड ६,लेखांक १७५ ]

२) सन १७५४ मध्ये रघुनाथरावाने मोगल बादशाकडून नालखीचा सन्मान मिळवला. [   शिंदेशाही इतिहासाची साधने खंड -२, लेखांक २, संपादक - आनंदराव फाळके  ]

 ३) सन १७७२ साली विसाजी कृष्ण बिनीवाले याने नारायणराव पेशव्याकरिता मीरबक्षीगिरीचा बहुमान मोगल बादशाकडून मिळवला. [ मराठी राज्याचा उत्तरार्ध - य. वा. खरे ] 


            या वरून हे निर्विवादपणे सिद्ध होते कि, सन १७९२ च्या आधीपासून पेशवाईत मोगल बादशाहतर्फे मिळालेले बहुमान स्वीकारण्यासाठी फर्मानवाडीचा समारंभ करण्याची प्रथा प्रचलित होती.

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

अरे शहाण्या माणसा. एवढ्या कर्तबगार लोकांना अरे-तुरे म्हणतोस. सुधार स्वतःला.

sanjay kshirsagar म्हणाले...

Anonymous
अहो विद्वान महाशय, कमीत कमी स्वताच्या नावाने तरी कमेंट टाका.