Monday, July 11, 2016

एक बनावट पत्र   
 
    शिवकालीन पत्रसार संग्रह खंड - ३ मध्ये उपरोक्त पत्र तथा जाबता प्रकाशित करण्यात आला आहे. प्रस्तुत कागदावरील तारखेनुसार दि. ६ जून १६७४ रोजी बनवण्यात आला असून आजवर तो शिवकालीन असल्याचे मानले जात होते. निदान प्रस्तुत लेखकाचा तरी समज होता. परंतु नुकतेच श्री. निनाद बेडेकर, श्री. गजानन मेहेंदळे व श्री. रवींद्र लोणकर संपादित ' आदिलशाही फर्माने ' ( डायमंड पब्लिकेशन ) अभ्यासत असताना बनावट फर्मानांविषयीची माहिती वाचनात आली. त्यानुसार विजापुरास दारूलजाफर / दारूज्जफर ( विजयस्थान या अर्थी ) हि उपाधी / नाव औरंगजेबाने विजापूर जिंकल्यावर दिले होते. ( स. १६८५ )
अर्थात, स. १६७४ मध्ये शिवाजी वा त्याचे चिटणीस विजापूरचा दारूलजाफर असा उल्लेख करणे शक्य नाही. तेव्हा प्रस्तुत ताळेबंद हा पूर्णतः बनावट असल्याचे निर्विवादपणे सिद्ध होते.

संदर्भ ग्रंथ :- 

१) शिवकालीन पत्रसार संग्रह, खंड - ३ :- संपादक - शं. ना. जोशी.

२) आदिलशाही फर्माने :- संपादक - निनाद बेडेकर, गजानन मेहंदळे व रवींद्र लोणकर      

No comments: