गुरुवार, ३ मार्च, २०१६

स. १६८० च्या आरंभी संभाजीचे मोगल प्रदेशातील आक्रमण




    दिलेरखानाच्या गोटातून परतल्यावर संभाजी पन्हाळ्यावर होता हे सर्वाना माहिती आहे. परंतु पन्हाळ्यावरील त्याच्या मुक्कामाविषयी मात्र दोन मतप्रवाह आढळतात. संभाजी पन्हाळ्यावर नजरकैदेत असल्याचा एक मतप्रवाह असून दुसऱ्या गटाच्या मते, संभाजीवर शिवाजीने यावेळी मोगलांविरुद्धच्या लढ्याची एक आघाडी सोपवली होती. संभाजीचे चरित्रकार श्री. वा. सी. बेंद्रे यांनी हि बाब संभाजीच्या रीत्रात पुराव्यांसह मांडली खरी, परंतु या मांडणीत आत्मविश्वास नसल्याने बेंद्रयांचे मत काहीसे दुर्लक्षित राहिले. डॉ. वि. गो. खोबरेकरांनी हीच बाब पुन्हा एकदा आपल्या ग्रंथात संदर्भासह मांडली असून त्याचे स्क्रीनशॉट सोबत जोडत आहे. 











संदर्भ ग्रंथ :-

१) श्रीछत्रपती संभाजी महाराज :- वा. सी. बेंद्रे
२) महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड ( भाग १ ) :- डॉ. वि. गो. खोबरेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: