शुक्रवार, ३१ मार्च, २०१७

भाउ असेल तर पत्र दर्शनी येणे.






    संक्षिप्त परिचय व पार्श्वभूमी :- स. १७५० मध्ये शाहूच्या मृत्यूनंतर सातारच्या गादीवर बसलेल्या रामराजास ताराबाईने कैद करून सर्व सत्ता आपल्या हाती घेत पेशव्याशी विरोध आरंभला. ताराबाईचे राजकारण तसेच थोडेबहुत अंतस्थ कलह यामुळे पेशव्याचे आप्त व सेवक देखील संशयाच्या भोवऱ्यात येऊन पेशवा त्यांच्याविषयी साशंक असल्याचे या पत्रातून दिसून येते.             







लेखांक [ ७ ]      श्री     संवत १८०७ पौष्य शुद्ध १०
७२ ]                    [ २७ दिसबर १७५० ]
                      
                         राजश्री जयाजी सिदे गोसावी यांसि.
आसिर्वाद उपरी. राजश्री माहादोबासी ( महादजी अंबाजी पुरंदरे ) आम्हासी विमनस्कता तीन वर्शे आहे. सातारियापासून विशेष वृधी पावली. तुमचे पक्षपातामुले अति कष्टी होते. याजमुले आम्हास हरयेक कामात मुरदाड करावे याची तजवीज रामचंद्र बाबा [ सुखठणकर ] [ सदासिवराव ] भाऊकडे राजकारणे पत्रे जात येत असेत. आम्हापासून हरयेक मसलत पुर्ती पायाशुध सेवटास न जावी या भावे भाउकडेच फौज पाठवावी, आम्हास घरी बसउन गोविदरायाचे आज्ञेत वर्तावे. उमाबाईस ( दाभाडे ) राखावे. ताराबाईसी गोविदरायाचे मारफातीने चढवावे. आम्हावर सर्वाचे उपर राखावे. येसा विचार दिसोन आला. तेव्हा आम्ही भाउस साफ लिहिले की जर भाउ असेल तर पत्र दर्शनी येणे. दाभाडियाकडील काम चांगले करा त्यावरून भिडेस पडून आले. दाभाडियाचे काम रगडून आरंभिले. नासरजंग मेला. जप्ती करावी. दहावीस लाख मेलवावे. सरदारही बोलवावे. हिदायेत मोहिदीखानावर जावे. गरमी दाखउन जे मिलेल ते मेलवावे येसा विचार आम्ही केला. याजमुले बाबानी बहुत वाईट मानून घरास गेले. कोणी म्हणतात की ताराबाईकडे जातील परंतु ते कुलीन जुने चाकर हरामखोरी कधी करणार नाहीत असे वाटते. कालगत मात्र न कले. असो. आम्हासी बाबासी तूट पडली. भाउ अर्ध इकडे अर्धे तिकडे. रामचंद्रबाबा बाह्यात्कारे आम्हाकडे. अंतर्यामी बहुत गुप्त रितीने बाबाकडे. येथे बाहेर तो सर्वत्र दाखवितात की खावंदाची मर्जी तेच प्रमाण परंतु अंतरभाव तुम्ही जाणतच आहा. त्रिंबक विनायेक कोनरपंत हे केवल बाबाचे. गंगोबासी ( गंगाधर चंद्रचूड ) त्यासी राजकारण पूर्ण. येथून मल्हारबास लिहितील की खामखा बाबाचा पक्षपात करून आमचे केल मोडावे. मल्हारबा भोला माणूस खामखा येखादे जागी वचनास गुतल्यास आम्हासी तूट मात्र पडेल. आमचे विचारे चालले तर समजाविसी करावी. चालवावे येसे आमचे मनात आहेच. आता जाहाले तरी बरे. न जाहाले तरी पुढेही जो विचार आमचे मनापासून खुलासियाने ठहरेल तोच सेवटास न्यावा. गंगोबानी त्रिंबक विनायेकाचे मारफातीने लिहिले तर साफ जाब करावा कि खावंदासी आम्ही इरे वाढविणार नाही. एसे साफ बोलावे. जे करणे ते आमचे विचारे करावे. या मजकुरावर मल्हारबास कायेम आगोधर करून ठेवणे. असे असता आम्हासी विरुध करितील तर करोत. आमची तवकल ईश्वरावर आहे. तुमचे भरवसियावर असे केले. [ अपूर्ण ]

संदर्भ ग्रंथ :-
१) शिंदेशाही इतिहासाची साधने ( भाग ३ रा ) :- संपादक - आनंदराव भाऊ फाळके

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: