सोमवार, १ जुलै, २०१३

शोध संजय सोनवणींच्या जातीचा ….!

                                               प्रास्ताविक        
                        झंझावाती वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. संजय सोनवणी यांची जात शोधण्याचा हल्ली कसोशीने प्रयत्न चालला आहे. याविषयी अनेकांनी शोध घेऊन निबंध लिहिले आहेत व लिहिले जात आहेत. असाच एक प्रस्तुत विषयाला वाहिलेला श्री. अं. बा. काळे यांचा शोधनिबंध माझ्या वाचनात आला. तो याठिकाणी मी देत आहे. ऐतिहासिक कागदपत्रेचं काय पण साधे पुस्तक वा निबंध देखील जपून न ठेवण्याची एक प्रवृत्ती मराठी माणसामध्ये आहे. प्रस्तुत शोध निबंध याच प्रवृत्तीचा बळी असल्याने आरंभीचा मजकूर असलेली पृष्ठे तसेच अखेरची पाने देखील गहाळ असल्याचे आढळून आले. परंतु,  संशोधकाने या निबंधासाठी जे संदर्भग्रंथ वापरले होते त्यांची सूची मात्र मिळाली असून ती निबंधाच्या अखेरीस देण्यात आली आहे. प्रस्तुतचा निबंध गहाळ कागदांमुळे अर्धवट आणि अद्याप अप्रकाशित असला तरी भविष्यात नव्या दमाचे संशोधक या शोधनिबंधामुळे प्रोत्साहित होऊन सोनवणी मजकूर यांची जात नक्कीच शोधतील अशी माझी आशा आहे. 

                         … …… … …. ….   धनगर, महार, सिंधी, अहिर, शिंपी, मातंग, चांभार इ. जातींमध्ये श्री. संजय सोनवणी यांचा समावेश आजवर करण्यात आला आहे. परंतु त्यांची नेमकी जात कोणती याचा कोणालाही १००% खात्रीपूर्वक शोध घेता आला नाही. तेव्हा विविध दुर्मिळ ग्रंथ धुंडाळून आणि ऐतिहासिक दप्तरे चाळून त्यांच्या जातीचा शोध घेण्याची जबाबदारी नाईलाजाने आम्हांस घ्यावी लागली. त्यावरून जे सत्य आमच्या अल्प व मंद बुद्धीस गवसले ते येथे मांडत आहे. 

१) श्री. संजय सोनवणी हे सिंधी समाजाचे असावेत असा एक समज आहे. सिंधी लोकांमध्ये ' अडवाणी - कृपलानी ' प्रकारची बरीच आडनावे प्रचलित आहेत. त्यात ' सोनवणी ' हे नाव चपखल बसत असल्याचे आडनाव / उपनाम तज्ञांचे मत आहे.

२) श्रीयुत सोनवणी हे धनगर असल्याचा देखील मोठ्या हिरीरीने दावा केला जातो. खुद्द सोनवणी यांनी देखील धनगरी पोशाखात फोटोसेशन करून यात तथ्य असल्याची कबुली दिली आहे. मात्र धनगरांप्रमाणे मेहनत व कष्ट न करण्याची त्यांची प्रवृत्ती पाहता ते धनगर असल्याच्या समजात काही तथ्य नसल्याचे आमचे मत आहे.

३) श्री. सोनवणी महार समाजाचे असावेत असाही एक प्रवाद आहे, परंतु ते शैवधर्माचा पुरस्कार करत असल्याने आणि त्यांच्या घरात बाबासाहेबांचा फोटो नसल्याने त्यांना महार किंवा नव बौद्ध म्हणता येत नाही. 

४) आपल्या विरोधकांना शब्दरूपी जोड्यांनी मारण्याचा सोनवणींचा आवडता छंद पाहता ते चांभार असण्याची दाट शक्यता आहे. पण सोनवणी यांनी आपल्याला शाब्दिक जोडे हाणल्याचे अद्याप कोणी जाहीररीत्या व खाजगीरीत्या कबूल न केल्याने हा तर्क सध्या कुतर्कचं आहे. 

५) विविध प्रकारचे पोशाख परिधान करण्याचा व त्यावर फोटोसेशन करण्याचा सोनवणींचा छंद पाहता ते शिंपी समाजाचे असावेत असाही एक तर्क आहे. परंतु कात्री या शब्दाचेचं नव्हे तर शस्त्राचे देखील त्यांना वावडे असल्याचे पाहता या तर्कात केसभरदेखील तथ्य नाही.

                 आतापर्यंत सोनवणी हे कोणत्या जातीचे आहेत हे सिद्ध करण्याचे जे प्रयत्न झाले, त्यांपैकी काहींची दखल वरील मुद्द्यांत घेण्यात आलेली आहे. आता सोनवणी नेमके कोणत्या जातीचे आहेत हे सिद्ध करणारे आमचे संशोधन आम्ही मांडीत आहोत :- 

१) श्री. सोनवणी यांच्या घराण्याचे मूळ पार अश्मयुगीन काळापर्यंत जाऊन पोहोचते. वांशिक शुद्धतेमुळे पिढ्यांपिढ्यांचे पारंपारिक ज्ञान गुणसूत्रांमधून त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे. यामुळेच त्यांना शेकडोचं काय पण हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासातील तथ्य आणि मिथक फरक लगेच समजतो. 

२) वैदिक कालखंडात सोनवणींचे पूर्वज जटा वाढवून आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करत होते. आपल्या पूर्वजांचे ते महान कार्य संजय सोनवणी आज पुढे चालवत असल्याचे दिसून येते. त्यामुळेचं कि काय कधी - कधी त्यांच्या मस्तकावरील केशसंभारातून डोकावणाऱ्या एखाद्या जटेचे ( बटेचे ? ) दर्शन घडून येते. 

३) सोमरसाचे प्राशन फक्त यज्ञप्रसंगीच करण्याचा आपल्या महान पूर्वजांचा क्रम आजही सोनवणी नेमाने पाळत असल्याचे दिसून येते. यज्ञ तेच, फक्त काळानुसार नावांत बदल फरक इतकाच ! 

४) यज्ञप्रसंगीच सोमरस पिण्यात जसे सोनवणी परंपराप्रिय आहेत त्याचप्रमाणे घरातील अग्नी विझू न देण्याचा त्यांचा जो अट्टहास आहे तो अंगिरस ऋषीला देखील खाली पाहायला लावणारा आहे. अग्नीविषयक या व्यक्तीचे वेड अंगिरस वा भृगुपेक्षाही अधिक असल्याचे प्रस्तुत शोधकर्त्याच्या नजरेस आले. घरातून बाहेर पडताना सोनवणी आपल्या सोबत सतत अग्नी बाळगत असतात. मग तो माचिस  असो कि सिगारेट ! पण अग्नी हा असतोच !! 

५) सोनवणींची न्यायाप्रती असलेली श्रद्धा व निष्ठा हि सर्वांच्या परिचयाची आहे. मात्र याचे नेमके कारण आजवर कोणासही उलगडता आले नव्हते, ते आम्ही शोधून काढले. यांचे एक पूर्वज पेशवेकाळात रामशास्त्र्यांच्या हाताखाली सहाय्यक न्यायाधीशाचे काम करत होते. सोनवणींचे पूर्वज देखील रामशास्त्र्यांइतकेच न्यायनिष्ठुर व सत्यप्रिय असल्याचे आम्हांस आढळून आले. आपल्या या महान पूर्वजाचा गुणधर्म सोनवणींच्या नसानसांतून खेळत असल्याचे आपणांस आजही दिसून येते. 

६) आपल्या महान पूर्वजांप्रमाणेच सोनवणी हे देखील देववाणी तथा गीर्वाणभाषेत पारंगत असल्याचे आम्हांस दिसून आले. संस्कृत भाषा किती प्राचीन आहे यावर सध्या त्यांचे संशोधन सुरु असून एकेकाळी पृथ्वीतलावरील डायनासोर देखील संस्कृत भाषेत रचलेल्या ऋचांचे पठण करत असल्याचा मौलिक शोध त्यांनी लावला आहे. अलीकडे प्राकृतातून संस्कृत भाषेचा जन्म झाल्याचा जावईशोध लावणाऱ्यांचे दात, त्यांच्याच घशात घालणारा हा शोध आहे. श्री. सोनवणींच्या या महान संशोधनाविषयी आम्ही अधिक विचारले असता ते म्हणाले की, डायनासोरच्या हाडांची मी, माझ्या खास प्रयोगशाळेत वैज्ञानिक तपासणी केली असता वारंवार वैदिक ऋचांचे पठण केल्याने त्यांच्या हाडामांसी रुजलेल्या काही ऋचा मला त्या हाडांवर रुजल्याचे स्पष्ट दिसून आले. ' सध्या तरी त्यांनी याबाबतीत एवढाच खुलासा केला आहे. 

                 सर्व पुरावे अभ्यासता आम्हांस असे आढळून आले की, श्री. सोनवणी हे कट्टर वैदिक ब्राम्हण आहेत. अर्थात जाहीरपणे याची त्यांनी अजून कबुली दिलेली नाही.  पण,  लवकरचं याबाबतीत ते अधिकृतरित्या घोषणा करणार असल्याचे आम्हांस आतल्या गोटातून खात्रीलायकरित्या समजले आहे. सोनवणींच्या जातीचा शोध घेताना आम्हांला आणखीही काही महत्त्वाची आणि मनोरंजक अशी माहिती प्राप्त झाली ती खाली देत आहोत :- 
          वयाच्या २० व्या वर्षी सोनवणी यांनी वे. शा. सं. ह. सा. वेदशास्त्री यांच्याकडून अग्निहोत्राची दीक्षा घेतली. श्री. वेदशास्त्री हे अहोरात्र विविध स्वरूपात अग्नी प्रज्वलित ठेवून त्याच्या साक्षीनेचं सर्व कार्य करत असतात. याखेरीज विविध यज्ञ कसे करावेत आणि यज्ञ करत असताना कोणत्या क्षणी सोमरसाचे प्राशन करावे इ. चे शिक्षण देखील शास्त्री मजकुरांनी आपल्या प्रिय शिष्यास दिल्याचे समजते. वेदांमधील ऋचा रचण्याच्या कार्यात सोनवणींचे पूर्वज सहभागी असल्याने त्यांना संस्कृत भाषेचे ज्ञान तर आहेचं.  पण,  त्या ज्ञानाला नवी व आधुनिक झळाळी प्राप्त करून देण्याचे कार्य देखील उपरोक्त शास्त्रीबोवांनी पार पाडले आहे. शास्त्रीबोवा हे जसे परंपराप्रिय आहेत तसेच आधुनिक आणि खुल्या विचारसरणीचे देखील असल्याने शुद्ध संस्कृतातील अस्सल अपविशेषणांचा खजिनाचं त्यांनी आपल्या परमशिष्याच्या हवाली केला आहे.  आपल्या गुरूंनी दिलेल्या खजिन्याची उधळण श्री. सोनवणी मुक्त कंठाने करत असून त्याचा अनुभव खुद्द आम्हांस व आमच्यासारख्या कित्येकांस प्रसंगोत्पात आलेला आहेचं ! विशेष म्हणजे अपविशेषणांचा हा खजिना समृद्ध करण्याचे कार्य शास्त्रीबोवांचे मित्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी पार पाडल्याचे आम्हांस खात्रीलायकरित्या समजले आहे.  
              असे असले तरी सोनवणी हे वैदिक ब्राम्हणचं आहेत असे ठासून सांगणे आम्हांस थोडे अवघड वाटते. कारण, सोनवणींचा गौर वर्ण, अचाट बुद्धीमत्ता, ताडमाड उंची, काळे - पिवळे - तपकिरी नसलेले डोळे पाहता ते शुद्ध आर्यवंशीय असल्याचा आम्हांस दाट संशय आहे.  …… … …. …  
                                                                                  ( पुढील पृष्ठ गहाळ ) 
संदर्भ ग्रंथ सूची :- 
(१) सोनवणींचा प्राचीन - अर्वाचीन इतिहास :- अतर्कतीर्थ जोशी
(२) वैदिक कालीन सोनवणी :- आ. दी. वासी  
(३) मध्ययुगीन आर्य :-  ख. रा. केळकर 
(४) पेशवेकालीन सोनवणी :- म. म. अं. बा. काळे 
(५) आधुनिक ब्राम्हण :- वि. वि. काटे 
(६) शोध सोनवणींचा :- संजय सोनवणी 

८ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

ha ha ha! good one!

sanjay kshirsagar म्हणाले...

Thank's Koham !

udayk म्हणाले...

वेड्यांचा बाजार !

Parag charal Divekar म्हणाले...

ha ha ha.... lai bhaari :D

vharadi Katta म्हणाले...

ase vactana ase vate ki ugch manv mahun janm ghetla

अनामित म्हणाले...

copy paste...

Unknown म्हणाले...

संजय सोनवनी सर यांची जात काढायची कोणाला काहीच गरज नाही. त्यांची जात कोणती याचा शोध घेन्या पेक्षा तुम्ही त्यांचे जे लिखान केलेले आहे त्याचा विश्लेषण करा मग त्यावर टिका करा. तुम्हाला स्वातंत्र्य आहे की तुम्ही त्यांनी केलेले लेखन तपासा, त्या विषयी बोला. आणि तेवढी तुमची लायकीच नसेल तर कमीत कमी एक विद्यार्थी म्हणून त्याचा अभ्यास करा. आणि ज्याने हा लेख लिहिला त्याची शेवटी बुद्धिमत्तेचि पात्रता त्याने दाखवलीच शेवटी. ज्याने हा लेख लिहिला त्या व्यक्तीची बुद्धिची मला अगदी कीव येते. कारण अगदी स्पष्ट आहे, कि तुम्ही या समाजात एखद्याची जात विचारने म्हणजे तुमचे बौधिक दलिंद्री आहे. आणि कोणत्याही व्यक्तीच्या जाती विषयी शेरेबाजी ही कायद्याने बेकायदेशीर आहे. तरीसुद्धा समजा असे मानले कि या लेखकचा हेतू हा विनोदाचा आहे तरीसुद्धा या लेखकाने संजय सोनवनी यांच्या बद्दल सिगारेट, आग, दारू आणि सोमरस हे असले शब्द वापरन्याची तर अजीबातच गरज नव्हती. आणि त्यांच्या बद्दल इतक्या व्यक्तिगत बाबी मध्ये हस्तक्षेप करायचे नसती उठाठेव कशाला....?? आणि जास्त न बोलता एवढेच सांगतो की, फक्त संजय सोनवनी सर च नाही तर समाजातील कोणत्याही व्यक्ती बद्दल इतक्या वैयक्तिक पातळीवर हे असले विनोदी लेख लिहून लोकांचे मनोरंजन होत असेल किव्हा लोक त्यांची टवाली करत असतील तर हे असले लेखांचे कागद हे, "लहान बाळाची शी पुसन्यासाठी वापरन्याच्या लायकीचे आहेत."

sanjay kshirsagar म्हणाले...

UdayK, Parag Diwekar प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

Vharadi katta , chandrashekhar bhujbal लेखाचा आशय आणि विषय अजिबात जाणून घेता तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच आपल्या आणि आपल्या समविचारी मित्रांसाठी या ठिकाणी एक गोष्ट नमूद करतो व ती म्हणजे प्रस्तुत लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी मी तो श्री. सोनवणींना वाचण्यास दिला होता आणि त्यांच्याच संमतीने तो प्रसिद्ध करण्यात आला आहे.