मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३

श्री. संजय सोनवणी यांचे सामाजिक इतिहास लेखनाचे कार्य

                
                   आजपर्यंत राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासावर रग्गड इतिहास लेखन झाले आहे. परंतु, सामाजिक इतिहासावर म्हणावे तसे लेखन झाल्याचे दिसून येत नाही. सामाजिक इतिहास लिहिताना नेहमी वर्गकलह आणि त्याअनुषंगाने लोकप्रिय असणाऱ्या आर्यआक्रमण पासून मुलनिवासी थियऱ्यांचा भरपूर मारा करण्यात येतो. त्यामुळे होते काय कि, वाचकवर्गाची स्वतःची विचार करण्याची क्षमता एकप्रकारे ठार मारली जाते. अर्थात, हे विधान सरसकट सर्वच लेखकांना लागू नसून, त्यास काही सन्माननीय अपवाद आहेत व त्यांपैकी एक म्हणजे श्री. संजय सोनवणी !
अलीकडे श्री. सोनवणी यांनी सामाजिक इतिहास लेखनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. “ आम्ही येथील मूळ रहिवासी होतो ” असे वारंवार गळे काढणाऱ्या आणि “ आम्ही आर्यांनी हा आर्यावर्त पादाक्रांत केला “ अशी दर्पोक्ती करणाऱ्यांपेक्षा वेगळ्या अनवट वाटेने जात सोनवणी यांनी जातीसंस्थेची निर्मिती कशी झाली आणि जातीअंताच्या दिशेने आपण कसे जाणार याविषयी एक अतिशय अभ्यासपूर्ण अशी लेखमालिका आपल्या ब्लॉगवर लिहून प्रसिद्ध केली. त्या ब्लॉगचे संकेतस्थळ पुढीलप्रमाणे :- http://sanjaysonawani.blogspot.in/search/label/जातिसंस्थेचा%20इतिहास
 
केवळ यावरच आपले लेखनकार्य न थांबवता त्यांनी विविध जातींच्या उगमाचा इतिहास शोधण्याचा देखील एक यशस्वी प्रयत्न केला आहे.
http://sanjaysonawani.blogspot.in/search/label/जातींचा%20इतिहास

सोनवणी यांच्या या लेखनकामगिरीमुळे जातींच्या उगमाकडे / इतिहासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन तर वाचक व अभ्यासकांना मिळाला आहेच, पण त्या सोबत हे लेख वाचत असताना वाचक स्वाभाविकपणे अंतर्मुख होतो आणि आजवर जे काही त्यास जातींच्या निर्मितीविषयी ज्ञान देण्यात आले होते त्याची आणि सोनवणी यांच्या संशोधनाची तुलना करून स्वतःच्या बुद्धीला पटेल असा निष्कर्ष तो काढू शकतो. माझ्या मते, एका सामाजिक इतिहास लेखकाचे याहून मोठे यश काय असेल ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: