गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१३

यशवंतराव होळकराचे समशेरबहाद्दरास पत्र



ले. ५९                             श. १७२५ फाल्गुन शु. ११
No. 319      श्री म्हाळसाकांत        इ. १८०४ फेब्रुवारी २१    
                राजश्री समशेर बहादूर ( प. बाजीरावचा पणतू )
                  गोसावी यांसी
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मी आलंकृत राजमान्य -------------- ** येशवंतराव होळकर रामराम विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये लिहीत जावे विशेष तुम्हाकडून पत्रे आली ते पाऊन त्याची उतरे पाठऊन इकडूनहि सर्वानी येक दिल होऊन मसलतीस उपयोग घडावा या आन्वये पत्राच्या रवानग्या केल्या ते पावलीच असतील जलचेराचा प्रसर बहुत जाला श्रीमंत व उभयता सरदारानी जसा प्रसंग पाहिला तैसे केले परंतु जे आलग आहेत त्यानी विचार करून बल पाडल्यास काही येक जडभारी पडावे असे नाही इकडील दरोबस्त राजेरजवाडे आनकूल करून घेणार परंतु आपले सरदार लाहाण ... ....... ... आपलाले जमावानसी येकत्र आल्याखेरीज मसलतीस जीव पडत नाही इकडून परभारे येमुना पार जाऊन त्याचा मुलुक ताराज करून घ्यावा ऐसा विचार केला होता परंतु कोण्हास कोण्ही मिलोन परस्परे उपयोग घडावा हे होत नाही याजमुले ते हावभरी होऊन चाल करितात त्यास हर तऱ्हेने तिकडे येऊन सर्वास सामल करून घेऊन सर्वानुमते पोख्त विचार करणे तो करावा असे ठेराऊन हे पत्रलेखन केले असे तरी तुम्ही हिमत धरून आपसात नीट वांकडी असतील ते मसलतीवर नजर देऊन कांही न मोजता येकदिल होऊन जथ पाडून कोणाचे वचनात आथवा बसात न येत आलग राहून हुशारीने आसावे इकडून आम्ही दर कूच येऊन पोहोचतो ज्यात जाग्याचे संरक्षण होऊन सर्वानुमते स्वराज्याचा बंदोबस्त घडून हिंदुधर्म राहील तोच विचार घडेल र|| छ ९ जिल्काद सु|| आर्बा मयातैन व आलफ बहुत काय लिहिणे हे विनंती 




संदर्भ ग्रंथ :-
१)      भारत सरकारच्या केंद्रीय ( दिल्ली ) दफ्तरखान्यांतील ऐतिहासिक मराठी साधने :- संपादक - प्रा. गणेश हरी खरे, शंकर नारायण जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: