शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

येक स्वराज्य कायेम तरच सर्वाचे कल्याण नाही तरी आपलाहि प्रांत नीट नाही



      

      यशवंतराव होळकरचे सदाशिव माणकेश्वर यांस पत्र                    
     



ले. ९४                             श. १७२७ ज्येष्ठ शु. १२
No. 547          श्री म्हाळसाकांत    इ. १८०५ जून ८
                           नकल
   
   राजश्री सदाशिवपंत (सदाशिव माणकेश्वर -- दु. बाजीराव पेशव्याचा कारभारी ) गोसावी यांसी   
       छ अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य ---------------- ** येशवंतराव होळकर दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित जावे विशेष तुम्हाकडोन पत्र येऊन वर्तमान कळत नाही त्याशी वरचेवर पत्र पाठऊन तोषवीत जावे इकडील वर्तमान परभारे सर्व कळण्यात आलेच असल स्वामीसेवा वडिलांनी केली त्याचे मागें मनोभावे आधिकोतरी घडावी हे लक्ष मनात वागून देशी आलो इकडील मनोधर्म होते त्याप्रमाणे काही एक न घडता त्याचे ठाई कल्पविकल्प मनस्वी वाढून विश्वास न धरिता स्वारी समुद्रतीरी गेली तेव्हा तैसेच इकडे आलो दिवसंदिवस शत्रूचा जोर होऊन स्वराज्याचा आभिलाश करावा हा त्याचा इरादा यास्तव आजपरियेंत त्याच्या व इकडील लढाया जाल्या नाश करण्यात कमी केलीच नाही परंतु कोन्हीकडून उपर न जाला यामुळे लांबणीखाले गोष्ट पडली सोबती ( शिंदे ) याजलाहि पुर्तेपणे समजण्यात आले की येक स्वराज्य कायेम तरच सर्वाचे कल्याण नाही तरी आपलाहि प्रांत नीट नाही हे मनात येऊन तेहि आनकूल जाले यावर स्वामीकडील मात्र खंबीर पका होऊन सेवकास आज्ञा यावी तदनुसार येकविचारे सर्वाचे आनुमोदन पडल्यास शत्रूसहि संकट पडून ते आपला विचार करून पाऊल टाकतील तुम्ही प्रसंगी आहां स्वामीस विनंती करून उभैतास विचाराचे मार्गे आज्ञा करणे ती होत जाऊन स्वामीसेवकाचे धर्म वागे ते करावे इकडील विचाराच धर्मावेगळा दुसरा नाही ** छ रबिलावल सु|| सीत मयातैन व अलफ बहुत काय लिहिणे हे विनती. 




संदर्भ ग्रंथ :-
१)      भारत सरकारच्या केंद्रीय ( दिल्ली ) दफ्तरखान्यांतील ऐतिहासिक मराठी साधने :- संपादक - प्रा. गणेश हरी खरे, शंकर नारायण जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: