मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

वसईच्या तहानंतरचे एक महत्त्वाचे पत्र



ले. ३४                     श्री      श. १७२४ फाल्गुन व. १
No. 99                            इ. १८०३ मार्च ९
            नकल
 यादी कलमे ठराऊन द्यावयाची सु|| सलास मयातैन व अलफ
१ श्रीमंत आमृतराव साहेब याची
   १ सरंजाम दाहा लाख रुपयाचा हिंदुस्थान कर्नाटक मिळून लाऊन द्यावा
   १ त्यास व त्याचे पदरचे व त्याजपासी तूर्त प्रकर्णात राहिले आसतील त्यास उपसर्ग करू नये व                                                       त्याजवल तूर्त होते त्याजकडे सरकारातून पेशजी कैलासवासी माधवरावसाहेब याचे कारकीर्दीत आसाम्या वतने गावे वगैरे चालत आले आसेल त्याप्रमाणे चालवावे येविसी बाहादारी हजरती व इंग्रजांची आसावी.
   १ किले दोन चांगले आसतील ते देऊन तेथील बेगमीचा सरंजाम लाऊन द्यावा.
 -------
    

१ श्रीमंत मातुश्री येशवदाबाईसाहेब यास पेशजी गोपिकाबाई गंगापुरास राहून सत्कात्ल घालविला त्याप्रमाणे  यास तेथे ठेऊन पेशजी बाईकडे सरंजाम वगैरे सवस्थानाकडे दानधर्म कन्यादानाब|| चालत होता त्याप्रमाणे चालवावा.

होळकरसमंधे
  खंडेराव होळकर यास आणून स्वाधीन करावे आणी त्यांस सरदारीची वस्त्रे देऊन तुकोजी होळकर याजकडे मुलुख होता तो त्याजप्रो|| खंडेरावयाजकडे द्यावा.
 शिंद्याकडे वाटनीचा मुलुख येने त्यास पेशजीपासून वाटनी होत आली आसेल त्या चालीप्रमाणे द्यावी.
 नगरचा किला होळकरास द्यावा आथवा सरकारांत माघारा शिंद्यानी द्यावा
-----

फडणीसासमंधे
 नाना फडणीस यास दत ( दत्तक ) द्यावा आणि त्याचे हाते काम घ्यावे
 मोरोबा दादा फडणीस यास कोनेवीसी उपसर्ग लागू नये
 १ फडणिसीसमंधे दरक कानू कायेदे चालत आल्या प्रमाणे चालवावे. फडणीसाकडील व दप्तरसमंधे कारकुनास उपसर्ग लागू नये
 नाना फडणीस याजकडे स्वाराचे बेगमीस सरंजाम चालत होता त्याप्रमाणे करार करून द्यावा आणि त्यास दतपुत्र द्याल त्याजकडे चालवावा
 १ फडणीसाकडील इनाम गाव व बाग घर वाडे वगैरे जफ्त आसेल ते सोडून द्यावे. वख्तसीर प्रयोजेन पडल्यास पेशजीपासून किले त्याजकडे दिल्हे आहेत ते ठेवावे
-----

बाबा फडके समधे जाबसाल
 १ जातीचे खर्चास वगैरे सरंजाम प्र|| उमरखेड गंगातीर येथे हा माहाल द्यावा. स्नानसंध्या करून राहू.
 १ पदरचे कारकून वगैरे यास कोनेविसी उपसर्ग लागू नये.
 १ इनामगाव वतने आसाम्या पेशजीपासून चालत आले आसेल त्याप्रमाणे चालवावे.
 १ सरंजाम पेशजीपासून माहालगाव वगैरे आहेत त्याप्रमाणे चालऊन पंथ वगैरे चाकरीस होते ते त्याप्रमाणे येक बंधु आथवा पूतने घेऊन राहातील.
 सुवर्णदुर्गचा सुभा पेशजीपासून चालता आहे त्याप्रमाणे करार करून देऊन चालवावा.
-------
 

१ पागे व सरकारचे पथकी व सिलेदार वगैरे हुजरातीत पेशजीपासून नौकर त्याचा मान वगैरे सरंजाम पेशजीपासून चालत आल्याप्रमाणे चालवावे. कोनेविसी आकस कोसी करून उपसर्ग करू नये.
१ पेशजी राजकारणाचे घालमेलीमुळे श्रीमंत बाजीरावसाहेब याची बेमर्जी होऊन सरकारचे व फडणीसाकडील वगैरे ग्रहस्त कैद करून आज सांत सालात ठेविले आसतील व गायेकवाड यानी आबा सेलूकर कुटुंबसुधा कैद करून ठेविले आहेत ते सारे मोकले करावे. यानी आपले घरी राहून श्रीमंत आज्ञा करतील त्याप्रमाणे वर्तनूक करावी. पेशजी पासून तैनाता वगैरे चालत आले आसेल त्याप्रमाणे सरकारातून चालवावे. खातरजमा जसी ज्याची पडेल त्याप्रमाणे चाकरी घ्यावी.
A true copy Henry Rassell
                                     हेन्री राशेल सेक्रेटरी 


टीप :- प्रस्तुत पत्राच्या संपादकांनी या पत्रातील मजकुराविषयी पुढील माहिती दिलेली आहे :-   
As per the treaty of Vasai arrangements are to be made concerning Amritrao – a brother of Bajirav  II , Yashodabai, the widow of Sawai Madhavrao, Khanderao Holkar, heirs of Nana Phadnavis, Morobadada Phadnavis, Baba Phadake and Aba Shalukar.               



संदर्भ ग्रंथ :-
१)      भारत सरकारच्या केंद्रीय ( दिल्ली ) दफ्तरखान्यांतील ऐतिहासिक मराठी साधने :- संपादक - प्रा. गणेश हरी खरे, शंकर नारायण जोशी       

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: