गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१३

यशवंतराव होळकरचे परशुरामपंत प्रतिनिधीस पत्र



ले. ३८                               श. १७२४ फा. व. १०
No. 178           श्री म्हाळसाकात     इ. १८०३ मार्च १८
   No. 2                       
              श्रीमंत राजश्री ------------------- पंतप्रतिनिधि स्वामी शे शेवेसी
      विनंती सेवक येशवंतराव होळकर ** दंडवत विनंती येथील क्षेम त|| फालगुण वद्य १० परियेत येथास्थीत आसे विशेष आलीकडे पाचसात वर्षात आपसातील कलहामुळे दौलती पेचात येऊन मुलकाची खराबी जाहाली परराष्ट्रास उमिदी होऊन चाली दिसो लागल्या यामुळे देसी आलो श्रीमंत राजश्री पंतप्रधान याजला विनती करून त्याचे मनांतील संशये दूर करून आपसातील कलह तोडून सर्वांनी एकदिल व्हावे म्हणजे स्वराज्याचा बंदोबस्त होईल परराष्ट्राच्या चाली न घडता आपलाली ठिकाणी विरून जातील या विचारे यावयाचे केले परंतु तो आर्थ येकीकडे राहून जे प्रकार घडलेत ते आपले माहीतगारीतच आहेत अद्यापहि येविशईचा विचार न जाल्या परराष्ट्राचा प्रसार होऊन राज्य त्याचे घरात जाऊन कोणाचेही माणुसपण राहात नाही श्रीमंताचे येणे घडून सर्वांची एकवाक्यता व्हावी या अर्थी श्रीमंत राजश्री --------- रावसाहेब ( अमृतराव पेशवे ) बाहेर निघाले आम्हीहि पुण्याहून कूच करून चांदवडचे सुमारे गेलो सर्वांनी येक होऊन स्वराज्याचा आळा पडावा यात सर्वोपरी चांगले प्रसंगास आपलेहि येणे घडावे यास्तव विनंती लिहिली आहे तरी स्वामीनी या प्रसंगी सरंजामासह यावयाचे करून ज्या गोष्टीनी सर्वाची येकदिली होऊन परराष्ट्रावर दाब पडून स्वराज्यात त्याचा प्रसर न होये तो आर्थ केला पाहिजे सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना

पत्र ता. ५ ला निघून २४ एप्रिल १८०३ ला आले
Poona         



संदर्भ ग्रंथ :-
१)      भारत सरकारच्या केंद्रीय ( दिल्ली ) दफ्तरखान्यांतील ऐतिहासिक मराठी साधने :- संपादक - प्रा. गणेश हरी खरे, शंकर नारायण जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: