शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

शिंदे – होळकरांच्या हडपसर युद्धानंतरच्या बाजीरावच्या हालचाली



 ले. २८ सु|| १२०३                 श. १७२४ आश्विन व|| १४

श. १७२४ आश्विन व|| १४ सोम    श्री   इ. १८०२ ऑक्टो. २५  

               
       यादी शके १७२४ दुंदुभी नाम संवत्सरे सन सलास मयातैन

   १ आश्विन व|| १४ सोमवारी येशवंतराव होळकर याची व बाजीराव रघुनाथ प्रधान याजकडील दौलतराव शिंदे याच्या फौजेचे लढाई जाहली. पुणियानजीक वानवडीवर जाली. शिंद्याकडील दाहा हजार फौज पडली. तेच रोजी बाजीराव व बालोजी कुंजर कारभारी पळोन सिंहीगडाखाली डोणज्यास मुकामास आले. आन्नपाणी नाही ऐसी आवस्ता जाली. दुसरे रोजी भोजन करून बीरवाडीस मुकामावर आले. तेथे एकदोन मुकाम होऊन माहाडास गेले. तेथेही च्यारपाच रोज राहून तेथून निघोन पाईचे मार्गांनी [ हरणई ] स गेले. चिमाजी आपाही बरोबर होते. येशवदाबाई माधवराव नारायण यची बायको यासी रायेगडास ठेविली. बाजीराव व चिमाजी आपा याच्या बायका .... गोवा येथे किलावर राहिल्या. पुढे बाजीराव रेवदंड्यास गेले --  ============================================== 



ले. २९ सु|| १२०३                  श. १७२४ कार्तिक शु|| ३

श. १७२४ दुंदुभि कार्तिक शु|| ३  श्री   इ. १८०२ ऑक्टो. २९

                  
    कृतानेक आसीर्वाद विशेष कार्तिक शु|| ३ भृगुवासर जाणून [ येथील ] वर्तमान यथास्थित असे. आपण सुभानजी पवार याजबरोबर पत्र पाठविले ते पावले. वर्तमान लेहून पाठवावे म्हणौन लि|| त्यास रविवारी येक वेलेपासून होळकराचे फौजेचा व शिंदे याची फौज दोन कंपु व लोकं दाहा हजारनिसी येऊन श्रीमंताचे वाड्याभवता गराडा दिल्हा होता. याची लढाई जुफली ते सोमवारी दिपवाली त्रितीये प्रहरपर्यंत लढाई जाली. शिंद्याचे कंपूवर होळकराकडील मान्ये व होळकराकडील सरदार दरेकर [?] होत. या तोंडावर श्रीमंत उभयेता व बालोजीबावा कुंजर ऐसे निघाले ते कंपूचा मोड होताच निघाल ते डोणज्यास येऊन राहिले होते. काल गुरुवारी निघोन मढया घाटचे आनछेत्रास आले. आले ते वेलेस बारा आसामीनिसी आले. साहा राऊत व साहा पाईचे यैसे आले. पाठीमागोन काही पाईचे व काही राऊत ऐसे आनछेत्रास येऊन मिलाले. आज दोन प्रहरा बिरवाडीस येऊन दाखल जाले. श्रीमंत बाजीराव व चिमाजी आप व बालोजी बावा कुंजर व बापु फडके व रामचंद्र गोसावी छेयामियाचे ? नातु ऐसे आहेत. आज संध्याकाली माहाडास जाण्याचा बेत आहे. घोडी कुलपली आहेत. जातील किंवा राहतील हे नकले. याप्र|| वर्तमान आहे. कालपासून बिरवाडीचे लोकाचा मनसुबा होता घरोघर सडे राहिले होते. स्वारी दाखल जाल्यावर ताकीद फिरवली की कोणास भय नाही, पळू नये तेव्हा मनुशास धीर पोहोचला. पाठीमागे काही देशबंधन आल्यास चिंता नाही. पेषबंद आल्यास घर सोडावे लागेल. या प्र|| वर्तमान आहे. कळावे. सदैव पत्री संतोषवीत असावे.

 पौ कार्तिक शु|| ३ भृगुवासर शके १७२४ दुंदुभि नाम संवछरे सन सलास मयातैन व आलफ.


  संदर्भ ग्रंथ :-

१) ऐतिहासिक संकीर्ण साहित्य १० वा खंड

कोकणच्या इतिहासाची साधने :-   संपादक : श्री. शां. वि. आवळसकर   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: