शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१३

विठोजी होळकराची कैद



            विठोजी होळकराच्या कैदेविषयी श्री. य. न. केळकर यांनी आपल्या ‘ काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे ‘ या ग्रंथात प्रकाशित केलेल्या दोन नोंदी खालीलप्रमाणे :-
  
    १)      ..... ..... त्यावरून बापू गोखल्याकडे एकटा विठोजी होळकरच कैद झाला नव्हता तर त्याचा कुटुंब कबिलाही हस्तगत झाला होता. त्यासंबंधी छ ३ जिल्हेजच्या पेशवे रोजकिर्दीतील १७ – ४ – १८०१ च्या दफाते ( दिलेली इनामे, वर्षासन ) पत्रात अशी नोंद आहे
    “ बापूजी गणेश गोखले याचे नावे जाब की तुम्ही छ २७ जिल्कादिचे विनंती पत्र पाठविले. ते प्रविष्ट जाले. विठोजी होळकर वगैरे आसामी
  १ विठोजी होळकर यास बेडीसुद्धा
  १ बायको रेवा
  १ राख बनाम रमी
  १ २ मुले रमीची
     १ मुलगी मैना ७ वर्षांची
     १ मुलगा हरी ५ वर्षांचा
   -------
    
एकूण ५ आसामी तुम्ही बाबाजी विष्णू कारकून व मैराळजी साठे व माहादजी सोनवणी खिजमतगार याजबरोबर व गाडदी देऊन पाठविले ते सरकारांत पोहोचले असेत.”

    २)      दुसरी एक नोंद छ २९ जिल्हेज म्हणजे १३ मे १८०१ ची दफाते पत्रातील आहे ती अशी, “ विठोजी होळकर याची माणसे बायको रेवा, राख रमी व मुले ही सिंहीगडास अटकेस ठेवावयास पाठविली असत. पोटास शिधा मध्यम प्रत देणे म्हणून नारो गोविंद मामलेदर सिंहीगड याचे नावे सनद.”

 संदर्भ ग्रंथ :-
   १)      काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे :- य. न. केळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: